Reaction | तैमूरला चक्क स्थळ आलं? करिनाची तगडी प्रतिक्रिया!

बॉलिवूड सुपरस्टार सैफ अली खान (Saif Ali Khan) आणि अभिनेत्री करिना कपूर खान (Kareena Kapoor khan) यांचा मुलगा तैमूर अली खान (Taimur Saif Ali Khan) बर्‍याचदा चर्चेत असतो.

Reaction | तैमूरला चक्क स्थळ आलं? करिनाची तगडी प्रतिक्रिया!

मुंबई : बॉलिवूड सुपरस्टार सैफ अली खान (Saif Ali Khan) आणि अभिनेत्री करिना कपूर खान (Kareena Kapoor khan) यांचा मुलगा तैमूर अली खान (Taimur Saif Ali Khan) बर्‍याचदा चर्चेत असतो. त्याच्या ‘क्यूट स्टाईल’ला लोकांनी पसंती दिली आहे आणि म्हणूनच इन्स्टाग्रामवर त्याची छायाचित्रे नेहमी व्हायरल होत असतात. करिना आणि सैफही त्याचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत असतात. माध्यमांच्या कॅमेराची नजरही तैमूरवर नेहमीच असते. मात्र, आता चक्क एका बॉलिवूड अभिनेत्रीने तैमूरसोबत लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. (Actress Nora Fatehi wanted to marry Taimur Ali Khan)

बॉलिवूड चित्रपटांमध्ये तिच्या डांन्सने सर्वांना वेड लावणारी अभिनेत्री नोरा फतेहीने (Nora Fatehi) तिच्या डांन्सने चाहत्यांची मने नेहमीच जिंकते. यामुळेच आज नोरालाच्या हातात अनेक चित्रपट आहेत. मात्र, आता नोराने लग्नाबद्दल विचार करण्यास सुरूवात केली आहे. होय, हे अगदी खरे आहे, नुकताच नोराने तैमूर अली खानशी (Taimur Ali Khan) लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. करीना कपूर खानच्या (Kareena Kapoor khan) चॅट शोमध्ये नोराने तिच्या मनातली इच्छा बोलून दाखवली आहे.

नोरा म्हणाली की, तैमुर मोठा झाला की, मी त्याच्यासोबत लग्न करणार आहे. हे नोराचे बोलणे ऐकून करिना आश्चर्यचकित झाली, करिना म्हणाली की, ठिक आहे पण तैमूर आता फक्त 4 वर्षाचा आहे त्याला लग्न करायला अजून बराच वेळ आहे. त्यावर नोरा हसत म्हणाली की, हरकत नाही तरीपण मी त्याच्यासाठी थांबेल.

नोरा फतेहीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झालेतर रेमो डिसूझाच्या ‘स्ट्रीट डांसर थ्रीडी’ चित्रपटात ती दिसली होती. अलीकडेच ती गुरु रंधावाच्या म्युझिक व्हिडिओ सिंगल ‘नाच मेरी राणी’ मध्येही दिसली. नोरा फतेही सध्या अभिषेक दुधैय्या यांच्या ‘भुज: द प्राइड ऑफ इंडिया’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची तयारी करत आहे. या चित्रपटात नोरा अजय देवगन, संजय दत्त, सोनाक्षी सिन्हा, शरद केळकर सारख्या कलाकारांसोबत काम करण्याची संधी मिळाली आहे.

संबंधित बातम्या : 

ना नावात कपूर ना खान, तरीही बॉलीवूडमध्ये दाणादाण, वाचा केजीएफ स्टारची प्रेरणादायी गोष्ट!

Kangana Ranaut | कंगना रनौत कोर्टाच्या आदेशाच आज तरी पालन करणार का?

(Actress Nora Fatehi wanted to marry Taimur Ali Khan)

Published On - 10:52 am, Fri, 8 January 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI