पतीने डोक्यावरुन हात फिरवला, कपाळाला किस केले; शेफालीचा शेवटचा व्हिडीओ
अभिनेत्री शेफाली जरीवाला हिचे वयाच्या 42 व्या वर्षी निधन झाले आहे. शेफालीवर मुंबईतच अत्यंसंस्कार करण्यात आले आहेत.

Shefali Jariwala Final Rites : काटा लगा फेम अभिनेत्री शेफाली जरीवाला हिचे वयाच्या 42 व्या वर्षी दु:खद निधन झाले. शवविच्छेदनानंतर तिच्यावर ओशिवरा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. शेफालीचा काल रात्री (27 जून) हृदयविकाराचा झटका आला होता. दरम्यान, तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले, त्याआधीचा काळीज पिळवटून टाकणारा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत आपल्या पत्नीला म्हणजेच शेफालीला शेवटचा निरोप देताना पराग त्यागी भावूक झाला आहे. अंत्यसंस्काराआधी पराग त्यागीने आपली पत्नी शेफालीच्या चेहऱ्याला प्रेमाने कुरवाळले आहे. डोक्यावर कीस करून त्याने आपल्या पत्नीला अखेरचा निरोप दिला आहे.
प्राथमिक तपासात काय आढळले?
शेफाली जरीवालाच्या निधनानंतर बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली आहे. शेफाली जरीवाला हिच्या मृतदेहाचे मुंबईतील कूपर रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर तिचा मृतदेह तिच्या कुटुंबीयांकडे सोपवण्यात आला. दरम्यान, शेफालीचा मृत्यू कसा झाला, याची पोलीस चौकशी करत आहेत.पोलिसांनी सांगितले की प्राथमिक तपासात काहीही संशयास्पद आढळलेले नाही. फॉरेन्सिक रिपोर्ट आणि पोस्टमॉर्टम रिपोर्ट आल्यानंतर शेफाली जरीवलचा मृत्यू नेमका कसा झाला हे समजणार आहे.
पोलिसांनी अनेकांचे जबाब नोंदवले
सध्या पोलिसांनी या प्रकरणात अनेक लोकांचे जबाब नोंदवले आहेत. शेफालीच्या मृत्यूमागे अनेक कारणं सांगितली जात आहेत. या सर्व शक्यतांना लक्षात घेऊन पोलिसांकडून तपास सुरू आहे.
हिंदुस्तानी भाऊने काय प्रतिक्रिया दिली
सोशल मिडिया मीडिया एन्फुएन्सर हिंदुस्थानी भाऊ आणि शेफाली जरीवाला यांच्यात भाऊ-बहिणीचं नातं होतं. अंत्यसंस्काराच्या वेळी हिंदुस्थानी भाऊ उपस्थित होता. शेफाली जरीवाला यांच्या निधनानंतर हिंदुस्थानी भाऊला मोठा धक्का बसला आहे. हिंदुस्थानी भाऊ म्हणाले की बॉलिवूडला माहीत नाही पण माझे खूप मोठे नुकसान झाले आहे, ती माझी बहीण होती.
View this post on Instagram
व्हिडीओ पाहून अनेकांनी व्यक्त केली हळहळ
दरम्यान, पराग त्यागीचा हा व्हिडीओ पाहून सोशल मीडियावर हळहळ व्यक्त केली जात आहे. पराग त्यागी या व्हिडीओत शेफालीच्या मृतदेहाजवळ बसल्याचे दिसत आहे. त्याच्या बाजूला शेफालीची आई बसलेली आहे. पराग त्याच्या पत्नीला प्रेमाने कुरवाळत असल्याचे दिसत आहे. हे हृदयविदारक दृश पाहून अनेकांच्या डोळ्यात आश्रू आले आहेत. अनेकांनी शेफालीच्या अकाली जाण्याने हळहळ व्यक्त केली आहे.
