शिल्पा शेट्टीच्या घरात कोरोनाचा विस्फोट, चिमुकल्या समिशासह संपूर्ण कुटुंबाला कोरोनाची लागण

बॉलिवूडमध्ये सध्या कोरोनाचा कहर वाढत आहे. बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) यांच्या घरी असलेले सर्व लोक आणि कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले आहे.

शिल्पा शेट्टीच्या घरात कोरोनाचा विस्फोट, चिमुकल्या समिशासह संपूर्ण कुटुंबाला कोरोनाची लागण
शिल्पा शेट्टी आणि कुटुंब

मुंबई : बॉलिवूडमध्ये सध्या कोरोनाचा कहर वाढत आहे. बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) यांच्या घरी असलेले सर्व लोक आणि कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले आहे. शिल्पा शेट्टी यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन ही माहिती दिली आहे. या कोरोनाच्या विळख्यात शिल्पाची अवघ्या वर्षाची लेक समिशा देखील अडकली आहे (Actress Shilpa Shetty Family tested Corona positive).

इंस्टाग्रामवर तिच्या शेअर केलेल्या पोस्टमध्ये शिल्पाने म्हटले आहे की, “गेले 10 दिवस आमच्या कुटुंबासाठी खूप कठीण होते. माझी सासू कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले होते. त्यानंतर समीशा, विवान, माझी आई आणि आता राज. याक्षणी सर्व मार्गदर्शक सूचनांचे पालन करत नियमांनुसार ते आपापल्या खोल्यांमध्ये विलगीकरणात आहेत आणि डॉक्टरांच्या सल्ल्याचे पालन करत आहेत. इतकेच नाही तर आमच्या घरातील दोन कर्मचारीही कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले असून, त्यांच्यावर वैद्यकीय सुविधेत उपचार सुरू आहेत.”

पाहा शिल्पाची पोस्ट

या सगळ्यात शिल्पा मात्र कोरोनाची लागण होण्यापासून बचावली आहे. आपला कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्याचे अभिनेत्रीने सांगितले आहे. शिल्पाने पुढे लिहिले ‘भगवंताच्या कृपेमुळे सर्वजण लवकर बरे होत आहेत. माझी टेस्ट निगेटिव्ह आली आहे. सर्व नियमांनुसार, सर्व खबरदारी घेतली जात आहे आणि आम्ही बीएमसीच्या सर्व अधिकाऱ्यांच्या मदतीबद्दल आभारी आहोत, हे सर्व आपल्या सर्वांच्या मदतीनेच शक्य झाले आहे. तुमच्या सर्वांच्या प्रार्थनांमध्ये माझे संपूर्ण कुटुंब असू द्या.”( Actress Shilpa Shetty Family tested Corona positive)

शिल्पाचा चाहत्यांना संदेश

या पोस्टमधील अभिनेत्रींनी सामान्य लोकांना देखील संदेश दिला आहे, अभिनेत्रीने लिहिले की, “आपण कोरोना पॉझिटिव्ह असो वा नसो, कृपया आपण सर्वजण मास्क घाला, स्वतःच्या स्वच्छतेची काळजी घ्या आणि सुरक्षित राहा. आणि मुख्य म्हणजे, स्वत:ला मानसिकदृष्ट्या सकारात्मक ठेवा.”

शिल्पा शेट्टीच्या कुटूंबाआधी कार्तिक आर्यन, अक्षय कुमार, आमिर खान, भूमी पेडणेकर, आशिष विद्यार्थी यांसह अनेक बॉलिवूड सेलिब्रिटीज कोरोना पॉझिटिव्ह झाले होते. मुंबईत कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांमुळे चित्रपट व मालिकांचे शूटींग थांबवण्यात आले आहे. ज्यामुळे मनोरंजन उद्योगावरही मोठा परिणाम झाला आहे.

(Actress Shilpa Shetty Family tested Corona positive)

हेही वाचा :

Photo : जॅकलिन फर्नांडिसचा मुक्या प्राण्यांसाठी पुढाकार, YOLO ची नवी मोहीम

‘पंगा क्वीन’वर आणखी एक नवं संकट, टीएमसीच्या प्रवक्त्याने कंगना रनौत विरोधात दाखल केली तक्रार

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI