AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

श्वेता तिवारी हिने मुलगी पलकबद्दल केला मोठा खुलासा, म्हणाली, माझ्यासोबत तिनेही…

अभिनेत्री श्वेता तिवारी ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो शेअर करताना श्वेता तिवारी दिसते. विशेष म्हणजे श्वेता तिवारी ही तिच्या बोल्डलूकमुळे नेहमीच चर्चेत असते. श्वेता तिवारी हिने मोठा काळ अभिनय क्षेत्रामध्ये नक्कीच गाजवला आहे.

श्वेता तिवारी हिने मुलगी पलकबद्दल केला मोठा खुलासा, म्हणाली, माझ्यासोबत तिनेही...
Shweta Tiwari
| Updated on: Aug 16, 2024 | 2:47 PM
Share

अभिनेत्री श्वेता तिवारी हे नेहमीच चर्चेत असणारे एक नाव आहे. श्वेता तिवारीची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. श्वेता तिवारी हिने मोठा काळ अभिनय क्षेत्रामध्ये गाजवला आहे. श्वेता तिवारी हिने काही दिवसांपूर्वीच स्पष्ट केले की, आपण शोमध्ये आता काम करणार नाहीत. आता इतके तास सतत शुटिंग करणे आणि आठवड्यातून एकही दिवस आराम न करणे हे होणे शक्य नाही. याशिवाय शूटिंगचे लोकेशनही दूर असल्याने मुलांना वेळ देऊ शकत नसल्याचे श्वेता तिवारी हिने म्हटले. श्वेता तिवारी ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. नेहमीच खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते.

श्वेता तिवारी हिची मुलगी पलक तिवारी हिने काही दिवसांपूर्वीच बॉलिवूडमध्ये पर्दापण केले आहे. विशेष म्हणजे थेट सलमान खान याचा किसी का भाई किसी की जान या चित्रपटात काम करण्याची संधी ही श्वेता तिवारीच्या लेकीला मिळालीये. अनेकांना पलक तिवारी हिचा अभिनय आवडल्याचे देखील बघायला मिळाले. आता नुकताच श्वेता तिवारी हिने एक मुलाखत दिलीये.

या मुलाखतीमध्ये श्वेता तिवारी हिने मुलीबद्दल मोठे खुलासे केले आहेत. श्वेता तिवारी म्हणाली की, पलकचे बालपण चांगले जावे, यासाठी मी नेहमीच प्रयत्न केले. मात्र, माझ्यासोबत काही गोष्टी पलकला देखील भोगाव्या लागल्या आहेत. मला कायमच लहानपणी पलकची काळजी वाटत. मात्र, तिने प्रत्येक गोष्ट समजून घेतली आहे.

पलकने माझ्या आयुष्यातील चांगला आणि वाईट काळ जवळून बघितला आहे. काही गोष्टींमुळे माझी मुलगी खूप जास्त ताकदवान नक्कीच बनलीये. तिने या गोष्टींवरून एक गोष्ट शिकली आहे की, जर तुम्ही स्वतःला हलक्यात घेतले नाही तर कोणीही घेणार. तुम्हाला कोणीही मदत करणार नाही. तुम्हाला काही अडचण असेल तर ती तुम्हालाच सोडवावी लागेल.

माझ्या आयुष्यातील चढउतारामुळे माझी मुलगी भावनिकदृष्ट्या खूप मजबूत झाली आहे. या सर्व परिस्थितीमुळे ती खूप खंबीर झाली आहे. श्वेता तिवारीचे पहिले लग्न हे राजा चाैधरी याच्यासोबत झाले होते. मात्र, त्यानंतर तिने त्याच्यासोबत घटस्फोट घेतला आणि अभिनव कोहली याच्यासोबत लग्न केले. मात्र, अभिनवसोबतही श्वेताचा घटस्फोट झाला. 

गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले...
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले....
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया.
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती..
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती...
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले..
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले...
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी.
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!.
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू.
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर.
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं.
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या.