अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या वडिलांवर पुण्यातील घरी चाकूहल्ला

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या वडिलांवर पुण्यातील घरी चाकूहल्ला

झटापटीत 63 वर्षीय मनोहर कुलकर्णी किरकोळ जखमी झाले आहेत. चोरीच्या उद्देशाने हल्ला झाल्याची तक्रार कुलकर्णींनी पोलिसांकडे दिली आहे.  (Actress Sonalee Kulkarni Father attacked)

अनिश बेंद्रे

|

May 25, 2021 | 2:08 PM

पुणे : प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (Actress Sonalee Kulkarni) हिच्या वडिलांवर चाकूहल्ला झाल्याचं धक्कादायक वृत्त आहे. पुण्यात सोनालीच्या वडिलांच्या राहत्या घरात घुसून माथेफिरुने चाकूने वार केले. यावेळी झालेल्या झटापटीत मनोहर कुलकर्णी जखमी झाल्याची माहिती आहे. मंगळवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास निगडीतील घरी ही घटना घडली. 24 वर्षीय अजय शेगटे याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. (Actress Sonalee Kulkarni Father Manohar Kulkarni attacked in Pune Nigadi Residence)

सोनालीच्या घरी घुसून चाकूहल्ला

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोनाली कुलकर्णीच्या वडिलांचे पुण्यातील निगडी प्राधिकरण भागातील सेक्टर क्रमांक 25 येथे घर आहे. आरोपी अजय शेगटे सकाळी अचानक सात वाजण्याच्या सुमारास त्यांच्या दारात आला. त्यावेळी सोनालीचे आई-वडील घरात होते. सोनालीच्या वडिलांनी अजयला रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र माथेफिरु अजयने त्यांच्यावर चाकूने हल्ला केला. यावेळी झालेल्या झटापटीत 63 वर्षीय मनोहर कुलकर्णी किरकोळ जखमी झाले आहेत. चोरीच्या उद्देशाने हल्ला झाल्याची तक्रार कुलकर्णींनी पोलिसांकडे दिली आहे.

सोनालीचा चाहता असल्याची चर्चा

कुलकर्णीच्या इमारतीतील रहिवाशांना याची माहिती मिळताच त्यांनी अजयला पकडले. त्यानंतर पोलिसांना तातडीने घटनास्थळी धाव घेत अजयला ताब्यात घेतले अजय आपण सोनाली कुलकर्णीचा फॅन असल्याचं सांगतो. निगडी पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

सैन्यदलातून निवृत्त डॉक्टर

सोनाली कुलकर्णीचे वडील मनोहर कुलकर्णी हे सैन्यदलातून निवृत्त झालेले डॉक्टर आहेत. त्यांनी सैन्याच्या वैद्यकीय दलात जवळपास तीस वर्षे काम केले आहे. तिच्या आई सविंदर या पंजाबी असून त्यांनी देहू रोड, पुणे येथील COD (सेन्ट्रल ऑर्डनन्स डेपो)) येथे काम केले आहे. (Actress Sonalee Kulkarni Father attacked)

सोनाली कुलकर्णीचा विवाह

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने गेल्याच आठवड्यात कुणाल बेनोडेकर (Kunal Benodekar) याच्याशी लग्नगाठ बांधली. दुबईमध्ये या दोघांचा विवाहसोहळा पार पडला. फेब्रुवारी 2020 मध्ये सोनाली कुलकर्णी आणि कुणाल बेनोडेकरचा साखरपुडा पार पडला होता. आम्ही आता एकत्र एका देशात आहोत, पुढे कधी काय होईल माहीत नाही. जगभरातली परिस्थिती पाहता आता एकमेकांची तब्येत जपून ‘लग्न’ जास्त महत्वाचं आहे ना की ‘समारंभ’. आपल्या देशात इतकी बिकट परिस्थिती असताना आम्ही कुठलंही सेलिब्रेशन करूच शकत नाही, तो खर्च वाचवून कोणाला मदत करता यावी या सारखं भाग्य नाही!, असं सोनाली कुलकर्णीने म्हटलं आहे.

संबंधित बातम्या :

PHOTO | माझे आई-बाबा भारतात, कुणालचे लंडनला, आम्ही दुबईत उरकून घेतलं, सोनाली कुलकर्णीचं लॉकडाऊन लग्न

(Actress Sonalee Kulkarni Father Manohar Kulkarni attacked in Pune Nigadi Residence)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें