PHOTO | माझे आई-बाबा भारतात, कुणालचे लंडनला, आम्ही दुबईत उरकून घेतलं, सोनाली कुलकर्णीचं लॉकडाऊन लग्न

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने, कुणाल बेनोडेकर (Kunal Benodekar) याच्याशी लग्नगाठ बांधली आहे. लंडनमध्ये या दोघांचा विवाहसोहळा पार पडला.

May 18, 2021 | 7:29 PM
Harshada Bhirvandekar

|

May 18, 2021 | 7:29 PM

मराठी मनोरंजन विश्वात ‘अप्सरा’ म्हणून प्रसिद्ध असणारी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (Sonalee Kulkarni) हिने आज (18 मे) अर्थात स्वतःच्या वाढदिवशी चाहत्यांना एक आश्चर्याचा सुखद धक्का दिला आहे.

1 / 6
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने, कुणाल बेनोडेकर (Kunal Benodekar) याच्याशी लग्नगाठ बांधली आहे. दुबईमध्ये या दोघांचा विवाहसोहळा पार पडला.

2 / 6
फेब्रुवारी 2020मध्ये सोनाली कुलकर्णी आणि कुणाल बेनोडेकरचा साखरपुडा पार पडला होता. वाढदिवसाचं निमित्त साधत लॉकडाऊनच्या काळात सोनालीनं ही गुड न्यूज सोशल मिडीयाच्या माध्यमातून चाहत्यांना दिली होती.

3 / 6
तसंच पुन्हा एकदा वाढदिवसाचं निमित्त साधत सोनालीने आनंदाची बातमी शेअर केली आहे.

4 / 6
आम्ही आता एकत्र एका देशात आहोत, पुढे कधी काय होईल माहीत नाही. जगभरातली परिस्थिती पाहता आता एकमेकांची तब्येत जपून ‘लग्न’ जास्त महत्वाचं आहे ना की ‘समारंभ’. आपल्या देशात इतकी बिकट परिस्थिती असताना आम्ही कुठलंही सेलिब्रेशन करूच शकत नाही, तो खर्च वाचवून कोणाला मदत करता यावी या सारखं भाग्य नाही!, असं सोनाली कुलकर्णीने म्हटलं आहे.

5 / 6
पुढे जेव्हा, जिथे, जसं शक्य होईल, तेव्हा, तिथे, तसं, परीवार आणि मित्रमंडळींबरोबर सगळ्या विधीनिशी आमची ड्रीम वेडिंग करूच. तोवर, आणि कायम तुमचा प्रेम आणि आशिर्वाद असूद्या, असं म्हणत तिने सर्वांचे आशीर्वाद मागितले आहेत.

6 / 6

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें