AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

2500 पेक्षा जास्त चित्रपट करणारी अभिनेत्री, जिचे चित्रपट पाहण्यासाठी तुम्हाला लागतील 6 वर्षे, 10 महिने, 20 दिवस

इंडस्ट्रीमधील अशी एक अभिनेत्री जिने 2500 पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये केलं काम. त्यांचे सर्व चित्रपट पाहण्यासाठी तुम्हाला लागतील 6 वर्षे, 10 महिने आणि 20 दिवस. कोण आहे ती अभिनेत्री?

2500 पेक्षा जास्त चित्रपट करणारी अभिनेत्री, जिचे चित्रपट पाहण्यासाठी तुम्हाला लागतील 6 वर्षे, 10 महिने, 20 दिवस
Image Credit source: Social media
| Updated on: May 22, 2026 | 5:52 PM
Share

Sukumari : आजच्या काळात एखाद्या अभिनेत्याने 100 किंवा 200 चित्रपटांमध्ये काम करणं म्हणजे मोठी कामगिरी मानली जाते. मात्र भारतीय चित्रपटसृष्टीत अशी एक दिग्गज अभिनेत्री होऊन गेली, जिने आपल्या कारकिर्दीत तब्बल 2500 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले. विशेष म्हणजे त्यांची कारकीर्द एक-दोन नाही तर तब्बल 6 दशकं चालली. ती अभिनेत्री म्हणजे सुकुमारी. भारतीय सिनेसृष्टीतील सर्वाधिक व्यस्त आणि बहुभाषिक अभिनेत्रींपैकी एक म्हणून त्यांचे नाव आजही आदराने घेतले जाते.

जर एखाद्या व्यक्तीने आजपासून सुकुमारी यांचे चित्रपट पाहण्यास सुरुवात केली आणि दररोज फक्त एक चित्रपट पाहिला तरी त्यांचे संपूर्ण चित्रपट पूर्ण पाहण्यासाठी जवळपास 6 वर्षे, 10 महिने आणि 20 दिवस लागतील. हीच बाब त्यांच्या प्रचंड मोठ्या कामगिरीची साक्ष देते.

बालवयात अभिनयात पदार्पण

सुकुमारी यांना लहानपणापासूनच अभिनय आणि शास्त्रीय नृत्याची आवड होती. केवळ दहा वर्षांच्या वयात त्यांनी ‘ओरू इरावु’ या तमिळ चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. पहिल्याच चित्रपटानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही आणि पुढे भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक चित्रपट करणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक बनल्या.

सुकुमारी यांनी केवळ मल्याळम चित्रपटसृष्टीतच नाही तर तमिळ, तेलुगू, हिंदी, ओडिया आणि बंगाली चित्रपटांमध्येही आपली वेगळी ओळख निर्माण केली. त्यांच्या भूमिका केवळ आई किंवा बहिण अशा पारंपरिक चौकटीत अडकल्या नाहीत. त्या दमदार, स्पष्टवक्ती आणि भावपूर्ण भूमिकांसाठी विशेष ओळखल्या जात होत्या. ग्रामीण भागातील साध्या महिलांपासून आधुनिक विचारांच्या स्त्रियांपर्यंत अनेकविध भूमिका त्यांनी सहजतेने साकारल्या. त्यांच्या अभिनयातील नैसर्गिकता आणि प्रभावी संवादफेक यामुळे प्रेक्षक त्यांच्याशी पटकन जोडले जात.

2013 मध्ये निधन, पण वारसा आजही जिवंत

2013 मध्ये हृदयविकाराच्या झटक्यानंतर चेन्नईतील रुग्णालयात त्यांचे निधन झाले. मात्र त्यांच्या भूमिका, अभिनयशैली आणि विक्रमी कारकीर्द आजही भारतीय सिनेसृष्टीत विशेष मानली जाते. 2500 हून अधिक चित्रपटांमध्ये काम करणे ही केवळ संख्या नाही तर अभिनयावरील निष्ठा, मेहनत आणि कलेवरील अपार प्रेमाचे जिवंत उदाहरण आहे. त्यामुळेच सुकुमारी यांचे नाव भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासात कायम सुवर्णाक्षरांनी लिहिले जाईल.

Follow Us
अंधेरीत भरधाव BEST बसच्या अपघाताचा थरार, अनेक वाहनांना उडवलं
Andheri Accident | अंधेरीत भरधाव BEST बसच्या अपघाताचा थरार, अनेक वाहनांना उडवलं, रिक्षांचा चुराडा
अजित पवार विमान दुर्घटना : CBI चौकशीवर फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
Devendra Fadnavis on Ajit Pawar Accident | अजित पवार विमान दुर्घटना : CBI चौकशीवर CM फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
कर्जमाफीने शेतकरी श्रीमंत होत नाही, पण... फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Devendra Fadnavis | कर्जमाफीने शेतकरी श्रीमंत होत नाही, पण... मुख्यमंत्री फडणवीस नेमकं काय म्हणाले?
किती पोटदुखी... किती जळजळ... शरद पवार भेटीवरून शिंदेंचा ठाकरे गटावर...
किती पोटदुखी... किती जळजळ... शरद पवार भेटीवरून उपमुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल
रमेश म्हात्रेंना मोठा झटका! कोर्टाने सुनावली पोलीस कोठडी; पक्षातूनही..
Ramesh Mhatre | डॉक्टर मारहाण प्रकरणात रमेश म्हात्रेंना मोठा झटका! कोर्टाने सुनावली पोलीस कोठडी; पक्षातूनही कारवाईचे संकेत?
सावरकरांना भारतरत्न देण्यावरून मुनगंटीवार संतापले, सरकारला घरचा आहेर
Sudhir Mungantiwar | सत्ता आली की वचन विसरलात?; सावरकरांना भारतरत्न देण्यावरून मुनगंटीवार संतापले, सरकारला घरचा आहेर
खाजेची पावडर टाकून वारकऱ्यांचे मोबाईल, पैसे लंपास; वारकऱ्याला अश्रू...
Pandharpur Wari Chori News | पालखी सोहळ्यात चोरट्यांचा सुळसुळाट! खाजेची पावडर टाकून वारकऱ्यांचे मोबाईल, पैसे लंपास; वारकऱ्याला अश्रू अनावर
सौरव सोनवणेला अटक करा, MCOCA लावा... म्हणत जनसागर रस्त्यावर
Beed kej Morcha | विलास घुले हत्या प्रकरण पेटलं! सौरव सोनवणेला अटक करा, MCOCA लावा... म्हणत जनसागर रस्त्यावर
5 कोटींचं आमिष अन् पक्षांतराची चर्चा! नाशिकच्या राजकारणात काय घडतंय?
5 कोटींचं आमिष अन् पक्षांतराची चर्चा! नाशिकच्या राजकारणात मोठं काय घडतंय? चर्चांना वेग
नगरसेवक कुठेही जाणार नाही, जे जातील... ठाकरे गटाची मोठी पोलखोल
Nashik Thackeray Nagarsevak | नगरसेवक कुठेही जाणार नाही, जे जातील त्यांना... ठाकरे गटाची पत्रकार परिषदेत मोठी पोलखोल