Trisha Kar Madhu | भोजपुरी अभिनेत्री त्रिशाकर मधुचा खासगी व्हिडीओ व्हायरल, MMS डिलीट करण्याची प्रार्थना

भोजपुरी सिनेसृष्टीतील बोल्ड अभिनेत्री म्हणून ओळख असलेल्या त्रिशाकर मधुचा (Trisha Kar Madhu) एक खासगी व्हिडीओ व्हिडीओ व्हायरल झाला. हा व्हिडीओ आता इंटरनेटवर शेअर केला जात आहे. यूट्यूब तसेच इतर माध्यमातून त्रिशाकर मधुचा तो व्हिडीओ कसा डाऊनलोड करायचा याची माहिती दिली जातेय.

Trisha Kar Madhu | भोजपुरी अभिनेत्री त्रिशाकर मधुचा खासगी व्हिडीओ व्हायरल, MMS डिलीट करण्याची प्रार्थना
Trisha Kar Madhu

मुंबई : सध्याच्या डिजिटल जगात वावरताना नेहमी दक्ष असलं पाहिजे असं या क्षेत्रातील तज्ज्ञ सांगतात. आपला कोणताही खासगी व्हिडीओ सोशल मीडियावर येणार नाही याची काळजी घेण्याचंही सांगितलं जातं. मात्र काही दिवसांपूर्वी भोजपुरी सिनेसृष्टीतील बोल्ड अभिनेत्री म्हणून ओळख असलेल्या त्रिशाकर मधुचा (Trisha Kar Madhu) एक खासगी व्हिडीओ व्हिडीओ व्हायरल झाला. हा व्हिडीओ आता मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. यूट्यूब तसेच इतर माध्यमातून त्रिशाकर मधुचा तो व्हिडीओ कसा डाऊनलोड करायचा याची माहिती दिली जातेय. हा प्रकार समोर आल्यानंतर व्हायरल व्हिडीओचे शेअरिंग थांबवण्याचे आवाहन त्रिशाकर मधुने केले आहे. (actress Trisha Kar Madhu private mms video went viral Trisha Kar appealed not to share video anywhere)

नेमका प्रकार काय आहे ?

काही दिवसांपूर्वी त्रिशाकर मधुचा एक खासगी व्हिडीओ लीक झाला. हा व्हिडीओ लीक झाल्यानंतर सगळीकडे खळबळ उडाली. हा प्रकार त्रिशाकर मधुला समजल्यानंतर तिने पोलिसांकडे रितसर तक्रार केली. मात्र, असे असले तरी हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झालाय.

त्रिशाकर मधु लीक व्हिडीओ हा कीवर्ड सर्च केला जातोय

विशेष म्हणजे हा व्हिडीओ कसा डाऊनलोड करावा याचे प्रात्यक्षिकसुद्धा यूट्यूब तसेच विविध माध्यमांवर उपलब्ध करुन देण्यात आले आहे. गुगल सर्च इंजिनवर त्रिशाकर मधु लीक व्हिडीओ हा कीवर्ड मोठ्या प्रमाणात सर्च केला जातोय. हा सर्व प्रकार समोर आल्यानंतर त्रिशाकर मधुने लोकांना पुन्हा एकदा विनंती केली आहे. कृपया कोणत्याही लिंकवर जाऊन तो व्हिडीओ पाहू नका. हा व्हिडीओ डाऊनलोड केला असेल तर तो कुठेही शेअर करु नका अशी विनंती तिने केली आहे.

बिहारचे लोक एवढे वाईट आहेत, याची मला कल्पना नव्हती

दरम्यान त्रिशाकर मधुच्या तक्रारीनंतर सायबर पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. बिहारचे लोक एवढे वाईट आहेत, याची मला कल्पना नव्हती अशा शब्दात त्रिशाकर मधुने संताप व्यक्त केलाय. हा सर्व प्रकार सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.

इतर बातम्या :

Video | ही मुलगी आहे की स्प्रिंग ! लवचिक शरीर अन् चकित करणाऱ्या कसरती एकदा पाहाच

Video | नक्कल करण्याच्या नादात मोठा घोळ, भाऊ थेट जमिनीवर आदळला, स्टंटचा मजेदार व्हिडीओ व्हायरल

Video | भररस्त्यात दोन महिलांची मारामारी, व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांच्या विविध प्रतिक्रिया

(actress Trisha Kar Madhu private mms video went viral Trisha Kar appealed not to share video anywhere)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI