AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Dostana 2 : कार्तिक आर्यनच्या एक्झिटनंतर केजोची ‘या’ कलाकारांवर नजर

कार्तिक या चित्रपटातून बाहेर पडल्यानंतर आता करण जोहर या रोलसोठी कोणाला पसंती देणार याची जोरदार चर्चा रंगू लागली आहे. (After Karthik Aryan's exit, Karan Johar is looking forward for Rajkumar Rao and Vicky Kaushal)

Dostana 2 : कार्तिक आर्यनच्या एक्झिटनंतर केजोची 'या' कलाकारांवर नजर
| Updated on: Apr 17, 2021 | 12:29 PM
Share

मुंबई : करण जोहरने 2020 मध्ये ‘दोस्ताना (Dostana)‘ या चित्रपटाच्या सिक्वलची घोषणा केली होती. या चित्रपटात कार्तिक आर्यन (Kartik Aryan), जाह्नवी कपूर (Janhavi Kapoor ) आणि लक्ष्य लालवाणी (Laksh Lalvani) या कलाकारांच्या नावांची वर्णी लागली होती. महत्त्वाची गोष्ट म्हणजे या चित्रपटाद्वारे लक्ष्य बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार आहे. मात्र शुक्रवारीच कार्तिकच्या चाहत्यांना घक्का बसेल अशी बातमी समोर आली. या माहितीनुसार कार्तिक आर्यनला चित्रपटातून काढून टाकण्यात आलं आहे. कार्तिक या चित्रपटातून बाहेर पडल्यानंतर आता करण जोहर कोणाला हा रोल देणार याची जोरदार चर्चा रंगू लागली आहे.

राजकुमार राव आणि विक्की कौशल या अभिनेत्यांचा विचार

आता सध्या चित्रपटाच्या निर्मात्यांकडून राजकुमार राव आणि विक्की कौशल या दोघांचा विचार करण्यात येत असल्याची माहिती आहे. विक्की कौशलला कोरोनानं गाठलं होतं. नुकतंच त्याचे रिपोर्ट्स निगेटिव्ह आले आहेत. कोरोना होण्यापूर्वी तो मिस्टर लेले या चित्रपटातं शुटिंग करत होता. आता तो लवकरच सेटवर परतणार आहे. याशिवाय विक्कीच्या 2 चित्रपटांवर काम सुरू आहे. आता विक्की आणि राजकुमार या दोघांमधून हा चित्रपट कोण करणार, हे निर्मात्यांनी जाहीर केल्यावरच कळेल.

कार्तिकला चित्रपटातून बाहेरचा रस्ता

रिपोर्टनुसार चित्रपटाचं 50 टक्के शूटिंग मुंबई आणि चंदीगढ येथे पूर्ण झाल्याची माहिती आहे. बॉलिवूड हंगामाच्या अहवालानुसार सुरुवातीला कार्तिकला या चित्रपटाच्या तारखा आणि शेड्युल याबाबत तक्रारी होत्या. ज्यामुळे पुढे अनेक समस्या सुरू झाल्या. यापूर्वीही असं म्हटलं जात होतं की, कार्तिकने या चित्रपटाचं शूटिंग कित्येक महिने पुढे ढकललं होतं. तर, हा चित्रपट सोडून त्याने राम माधवानीच्या ‘धमाका’ या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले होते, त्यामुळे करण त्याच्यावर चिडला होता.

कोरोनामुळे करण गप्प!

वृत्तानुसार, बर्‍याच दिवसांपासून कार्तिक कोरोना व्हायरसच्या साथीमुळे शूटिंग पुढे ढकलण्याविषयी बोलत होता. त्याला सुरक्षेची पूर्ण काळजी घ्यायची इच्छा होती, यामुळे करण जोहरने देखील त्याला शूटबद्दल विचारले नाही. पण, जेव्हा त्याने ‘धमाका’चे चित्रीकरण पूर्ण केले, तेव्हा करण जोहर त्याच्यावर संतापला. त्यांनी अनेक बैठका घेतल्या ज्यात करण जोहरनेही आपला संताप व्यक्त केला. ज्यानंतर कार्तिक आणि करण यांच्यात वादावादी झाली. शशांक खेतानचा ‘वॉरियर’ हा चित्रपट शाहिद कपूरला देण्यात आल्यानंतर देखील कार्तिक धर्मा प्रॉडक्शनवर चिडला होता. शाहिदने हा चित्रपट नाकारला असला, तरी ही भूमिका कार्तिककडे गेली नाही (Clashes between Karan Johar and Kartik Aaryan actor leaves the film).

कार्तिक आर्यनसाठी कंगनाचं खास ट्विट

या विषयावर कंगना रनौत पुढे आली असून तिने कार्तिक आर्यनचं समर्थन करणारं ट्विट केलंय. कंगनाने कार्तिकला सांगितलं की घाबरू नको. कंगनानं ट्वीट केलं की, ‘कार्तिक आर्यन केवळ आपल्या परिश्रमामुळे इथपर्यंत आला आहे आणि तो पुढेही उत्तम काम करत राहील. पापा जो आणि त्याच्या नेपो टोळीला एकच विनंती आहे की कार्तिकला सोडून द्या, त्याला सुशांतप्रमाणे त्रास देऊ नका. ‘

संबंधित बातम्या

Photo: गौहर खानच्या महागड्या बॅगची किंमत किती?; जरा, गौर किजीए जनाब!

Photo: खणांची साडी, निरागसता आणि निखळ सौंदर्य; मृण्मयी देशपांडेचे हे फोटो पाहिलेत?

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.