Aggabai Sunbai | सुझेन आणि सोहम प्रेमप्रकरण शुभ्रासमोर येणार! आसावरी यावेळी कोणाची साथ देणार?

आता शुभ्राला आणखी एक धक्का बसणार आहे.  कारण सोहम आणि सुझेनचं प्रेमप्रकरण लवकरच तिच्या समोर येणार आहे. त्यानंतर शुभ्रा हा धक्का पचवू शकेल का?

Aggabai Sunbai | सुझेन आणि सोहम प्रेमप्रकरण शुभ्रासमोर येणार! आसावरी यावेळी कोणाची साथ देणार?
सुझेन आणि सोहम प्रेमप्रकरण शुभ्रासमोर येणार!
Harshada Bhirvandekar

| Edited By: अनिश बेंद्रे

Apr 29, 2021 | 8:30 AM

मुंबई : झी मराठीवरील ‘अग्गबाई सूनबाई’ (Aggabai Sunbai) या मालिकेला प्रेक्षकांचा भरगोस प्रतिसाद मिळत आहे. या मालिकेत शुभ्राचं रूप खूप वेगळं दाखवण्यात आलं आहे. सध्या मालिकेत दाखवत असलेली ही शुभ्रा थोडीशी बुजरी आहे.  ती एका मुलाची आई आहे, तिला मुलाची काळजी आहे. मी करते ते बरोबर, की नाही हा भाव तिच्या मनात सतत असतो. या मालिकेत आसावरीने घराची सूत्र हाती घेतली आहेत. सोहम तिचा राईट हॅन्ड आहे, अभिजीत राजेंनी घरची जबाबदारी स्वीकारली आहे. शुभ्रा आणि अभिजित दोघांमध्ये बाबा आणि मुलीचं नातं आहे. बबडूची (मुलाची) पूर्ण जबाबदारी असल्याने शुभ्रा सध्या घरातच आहे. ती अतिशय प्रोटेक्टिव्ह आहे.  शुभ्रा अशी आहे त्याच्या मागचं कारण मुलाच्या म्हणजेच बबडूच्या जन्माच्यावेळेस निर्माण झालेली गुंतागुंत आणि सोहम सोबत संसार टिकवण्यासाठीची तिची धडपड (Aggabai Sunbai latest update shubhra will know about Soham and sussanne affair).

आता शुभ्राला आणखी एक धक्का बसणार आहे.  कारण सोहम आणि सुझेनचं प्रेमप्रकरण लवकरच तिच्या समोर येणार आहे. त्यानंतर शुभ्रा हा धक्का पचवू शकेल का? असा प्रश्न रसिक प्रेक्षकांना पडला आहे. या सगळ्यात आसावरी आणि अभिजित मात्र सुनेच्या बाजूने उभे राहणार आहेत हे नक्की. मनाने खचलेल्या शुभ्राच्या आयुष्यात आता लवकरच आणखी एक नवी व्यक्ती येणार आहे.

पाहा व्हिडीओ

 (Aggabai Sunbai latest update shubhra will know about Soham and sussanne affair)

नवा ‘बबड्या’ नवे कारनामे?

‘अग्गबाई सासूबाई’ या मालिकेत अभिनेता आशुतोष पत्की ‘बबड्या’ अर्थात ‘सोहम कुलकर्णी’ हे पात्र सकारात होता. मात्र, आताच्या नव्या मालिकेत म्हणजे ‘अग्गबाई सासूबाई’च्या सिक्वेलमध्ये ‘सौमित्र’ म्हणून गाजलेला अभिनेता अद्वैत दादरकर हा ‘सोहम कुलकर्णी’ साकारत आहे. अद्वैत साकारत असलेला ‘सोहम’ हा जुन्या ‘सोहम’ प्रमाणे तिरसट आणि हेकेखोर आहे. पण, तो घाबरट मुळीच नाही. बेधडकपाने चुकीची कामे करणारी व्यक्तीरेखा असून, यात काहीशी नकारात्मक छटा देखील आहे. ‘शुभ्रा’, ‘अभिजित राजे’, ‘आसावरी’, ‘आजोबा’ आणि चिमुकला ‘बबडू’ असं सुखी कुटुंब असतानाही तो सुझेन नावाच्या एका मुलीच्या प्रेमात पडला आहे.

या मुलीला त्याने आपली सेक्रेटरी म्हणून कामावर ठेवून घेतले आहे. इतकेच नाही तर, एरव्ही आई आणि बायकोसमोर, शांत आणि सुस्वभावी दिसणारा हा सोहम त्यांची पाठ फिरताच एका नव्या अवतारात प्रकट होतो. या अवतारातच तो सगळी गैरकृत्य करतो.

बायकोने घरात राहावं, अशी अपेक्षा बाळगणारा हा नवरा मात्र स्वतः स्वैराचार करत आहे. तेव्हा आता जुन्या शुभ्राने जसं तिच्या नवऱ्याला वठणीवर आणलं तसं ही शुभ्रा देखील या बबड्याला वठणीवर आणेल का?, असा प्रश्न रसिक प्रेक्षकांना पडला आहे. अर्थात ही मालिका नुकतीच सुरु झाली आहे आणि प्रेक्षकांना पुढे काय पाहायला मिळणार, हे हळूहळू उलगडत जाणार आहे.

(Aggabai Sunbai latest update shubhra will know about Soham and sussanne affair)

हेही वाचा :

VIDEO | “तू बुधवार पेठेतील ** आहेस” इन्स्टाग्राम युझरच्या कमेंटवर मानसी नाईकचं लाईव्ह उत्तर

PHOTO | ‘पप्पी दे पारू’नंतर स्मिता गोंदकर चमकणार ‘साजणी तू’ गाण्यात!

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें