ऐश्वर्या रायने ‘या’ 5 हॉलिवूड चित्रपटांमध्ये केलंय काम; तिच्या सौंदर्यापुढे तर हॉलिवूड अभिनेत्रीही फेल
ऐश्वर्या राय बच्चन केवळ बॉलिवूडपुरती मर्यादित नाही. तिच्या सौंदर्याची आणि अभिनयाची जादू हॉलिवूडमध्येही पाहायला मिळाली. या चित्रपटांमधील तिचा अभिनय देखील चाहत्यांना तेवढाच भावला होता. जाणून घेऊयात ऐश्वर्याने काम केलेले हॉलिवूडचे ते चित्रपट कोणते?

ऐश्वर्या राय हे बॉलिवूडमधील एक मोठं नाव आहे. तिला चित्रपटसृष्टीतील सर्वात प्रतिभावान अभिनेत्रींपैकी एक मानले जाते. ऐश्वर्या तिच्या अभिनयाप्रमाणेच तिच्या सौंदर्यासाठी ओळखली जाते. ऐश्वर्याच्या सौंदर्याची जादू ही फक्त बॉलिवूडमध्येच नाही तर हॉलिवूडमध्ये देखील पाहायला मिळाली. होय, ऐश्वर्याने हॉलिवूडमध्ये काम केलं आहे. तिने हॉलिवूडच्या अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे.याबद्दल फार कमी जणांना माहित असेल.
दरम्यान आज 1 नोव्हेंबर रोजी ऐश्वर्या राय बच्चन तिचा वाढदिवस साजरा करत आहे. ऐश्वर्या राय बच्चनने तिच्या कारकिर्दीत अनेक हिट चित्रपट दिले आहेत. चला जाणून घेऊयात की ऐश्वर्याने काम केलेल्या हॉलिवूड चित्रपटांची नावे.
द मिस्ट्रेस ऑफ स्पाइसेज
2006 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘द मिस्ट्रेस ऑफ स्पाइसेस’चे दिग्दर्शन पॉल मायेडा बर्गेस यांनी केले होते. पॉल मायेडा बर्गेस ही एक अमेरिकन पटकथालेखिका आणि दिग्दर्शक आहे. या चित्रपटात ऐश्वर्या राय बच्चनने टिलोची भूमिका केली होती. या चित्रपटात अनुपम खेर देखील दिसले होते. या चित्रपटाचे आयएमडीबी रेटिंग 5.5 आहे.
द लास्ट लीजन
द लास्ट लिजन हा 2007 चा ऐतिहासिक अॅक्शन अॅडव्हेंचर चित्रपट आहे जो अमेरिकन दिग्दर्शक, पटकथा लेखक आणि निर्माते डग लेफ्लर यांनी दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटात ऐश्वर्या राय बच्चनने मीराची भूमिका केली आहे. या चित्रपटाचे आयएमडीबी रेटिंग 5.4 आहे.
ब्राइड अँड प्रेजुडिस
ब्राइड अँड प्रेज्युडिस हा 2004 चा भारतीय रोमँटिक कॉमेडी-ड्रामा चित्रपट आहे जो भारतीय वंशाचे ब्रिटिश दिग्दर्शक गुरिंदर चढ्ढा यांनी दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटात ऐश्वर्या राय बच्चनने ललिता बक्षीची भूमिका केली होती. या चित्रपटाचे IMDb रेटिंग 6.2 आहे.
View this post on Instagram
द पिंक पैंथर 2
‘द पिंक पँथर २’ हा एक अमेरिकन कॉमेडी-रहस्यमय चित्रपट आहे. 2006 मध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट हॅराल्ड झ्वार्ट यांनी दिग्दर्शित केला होता. या चित्रपटात ऐश्वर्या राय बच्चन सोनियाची भूमिका साकारत आहे. या चित्रपटाचे आयएमडीबी रेटिंग 5.6 आहे.
प्रोवोक्ड
प्रोव्होक्ड हा चित्रपट एका सत्य घटनेवर आधारित आहे. हा चित्रपट किरणजीत अहलुवालिया यांच्या कथेवर आधारित आहे. ऐश्वर्या या चित्रपटात किरणजीत अहलुवालियाची भूमिका साकारत आहे. या चित्रपटाचे आयएमडीबी रेटिंग 6.4 आहे.
