AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aaradhya Bachchan : आराध्याचा तो व्हिडीओ पाहून लोकांना आठवले बिग बी; संस्कार तर….

ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांची लाडकी लेक आराध्या बच्चन बरीच चर्चेत असते. काही दिवसांपूर्वीच ती आईसोबत दुबईतील एका पुरस्कार सोहळ्यात दिसली, मात्र तेथे चियां विक्रमची भेट घेतनाचा व्हिडीो पाहून आराध्याला खूप ट्रोल करण्यात आलं. मात्र त्यानंतर तिचा आणखी एक व्हिडीओ समोर आला जिथे तिने एका अभिनेत्याला वाकून नमस्कार केला. एवढंच नव्हे तर आराध्याचा आणखी एक जुना व्हिडीओ व्हायरल झाला असून तो पाहून अनेकांना तिच्या आजोबांची, बिग बी यांचीच आठवण आली.

Aaradhya Bachchan : आराध्याचा तो व्हिडीओ पाहून लोकांना आठवले बिग बी; संस्कार तर....
| Updated on: Sep 21, 2024 | 10:18 AM
Share

अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन त्यांच्या नात्यामुळे खूप चर्चेत आहेत. गेल्या काही काळापासून त्यांच्यातील बेबनावाच्या, घटस्फोटाबद्दलच्या अनेक अफवा समोर येत आहेत. नुकतीच ऐश्वर्या दुबईत एका पुरस्कार सोहळ्यासाठी गेली होती, तेथील काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरलही झाले, मात्र त्यामध्ये तिच्या हातात लग्नाची अंगठी न दिसल्याने चाहते काळजीत पडले अन् पुन्हा घटस्फोटाच्या अफवांना उधाण आलं. SIIMA पुरस्कार सोहळ्यादरम्यानचे ऐश्वर्याचे तसेच तिची लेक आराध्याचेही व्हिडीओ समोर आले. त्यापैकी एका व्हिडीओ ती चियां विक्रमला ज्या पद्धतीने भेटली त्यामुळे बरीच ट्रोल झाली. ती खुर्चीवर बसूनच त्याला भेटली, उभीदेखील राहिली नाही, त्यामुळे अनेकांनी तिला ट्रोल केलं.

मात्र याच ॲवार्ड शो मधला तिचा आणखी एक व्हिडीओ समोर आला ज्यामध्ये आराध्याने शिवा राजकुमार याला वाकून नमस्कार केला. तो पाहून अनेकांनी तिचं कौतुक केलं. त्यानंतर आराध्याचा एक जुना व्हिडीओ व्हायरल झालाय, ती खूप लहान असतानाचा हा व्हिडीओ असून, ऐश्वर्याच्या कडेवरून उतरून तिने कुटुंबातील सदस्याला वाकून नमस्कार केला. हा व्हिडीओ पाहून अनेकांनी तिच्या संस्काराबद्दल टिपण्णी केली.

आराध्या बच्चन सिनियर्ससोबत खूप छान वागते. कोणताही मोठा कार्यक्रम असो किंवा पार्टी…ती खूप आदराने वागते. मात्र, एका व्हिडिओमुळे तिला यापूर्वी खूप ट्रोल करण्यात आले होते. पण खरी परिस्थिती वेगळीच होती. ते पाहून अमिताभ बच्चन यांच्या नातीच्या संस्कारांचे सर्वजण कौतुक करत आहेत. आराध्याचा व्हिडीओ पाहून अनेकांना बिग बी यांचा ‘सूर्यवंशम’ चित्रपट आणि त्यातील एक संवादही आठवला… ‘संस्कार उम्र से बड़े हैं इसके…!

आराध्याचा कोणता व्हिडीओ व्हायरल ?

X (आधीचं ट्विटर) वर एका यूजरने आराध्या बच्चनचा बालपणीचा व्हिडिओ शेअर केला आहे. क्लिपमध्ये ऐश्वर्या राय एका वडिलांसमोर वाकून नमस्कार करते. त्यानंतर लगेचच आराध्याही आईच्या कुशीतून उतरते आणि तीपण आजोबांना नमस्कार करते. 3 वेगवेगळ्या क्लिप एकत्र करून हा व्हिडीओ तयार करण्यात आला आहे. त्यातील पुढील क्लिप आराध्याची आहे, जी विमानतळाबाहेर कुटुंबातील सदस्याला मिठी मारत आहे आणि शेवटच्या व्हिडिओमध्ये ती धावत जाऊन तिचे वडील अभिषेक बच्चन यांना मिठी मारते. या सर्वांसोबत SIIMA ची क्लिपही जोडण्यात आली आहे. ज्यामध्ये अवॉर्ड मिळाल्यानंतर ती पहिल्यांदा आईला मिठी मारते. नंतर सुपरस्टार शिवाने राजकुमार यांना वाकून नमस्कार करते.

लोकांना आठवले बिग बी

हा व्हिडिओ पाहिल्यानंतर सर्वजण आराध्या बच्चनचे कौतुक करत आहेत. यादरम्यान अनेकांना आराध्याचे आजोबा, अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या ‘सूर्यवंशम’ चित्रपटातील संवाद आठवला : ‘संस्कार उम्र से बड़े हैं इसके’. तर दुसऱ्या युजरने लिहीलं की, बच्चन कुटुंबाने नातीवर किती चांगले संस्कार केलेत. अनेकांनी ऐश्वर्याचे कौतुकही केले. ” ती तिच्या मुलीला सगळीकडे जाते पण आराध्या इतर स्टार किड्सच्या तुलनेत खूप चांगली आहे ” असे म्हणत अनेकांनी मायलेकीचे कौतुक केले.

खरंतर आराध्या बच्चन अनेकदा आई ऐश्वर्या रायसोबत दिसते. गेल्या काही काळापासून ती संपूर्ण कुटुंबासोबत क्वचितच दिसली आहे. ऐश्वर्या कुठेही गेली तरी ती तिच्यासोबत असते. यावरून बरेच ट्रोलिंग झाले आहे. ऐश्वर्या रायने एका मुलाखतीत सांगितले होते की, तिच्या मुलीच्या जन्मापासून इतर गोष्टी तिच्यासाठी दुय्यम आहेत, तिची प्राथमिकता आराध्या बच्चन आहे.

मला ताकदीची गरज नाही.. मुनगंटीवारांच्या वक्तव्यावर फडणवीस काय म्हणाले?
मला ताकदीची गरज नाही.. मुनगंटीवारांच्या वक्तव्यावर फडणवीस काय म्हणाले?.
काही गोष्टी बोलल्या नाही तर..पराभवानंतर नितेश राणे चव्हाणांच्या भेटीला
काही गोष्टी बोलल्या नाही तर..पराभवानंतर नितेश राणे चव्हाणांच्या भेटीला.
मुंबईत ठाकरेंचा उत्सव, दणक्यात युतीची घोषणा होणार, राऊतांकडून अपडेट
मुंबईत ठाकरेंचा उत्सव, दणक्यात युतीची घोषणा होणार, राऊतांकडून अपडेट.
शिंदेंचा माणूस पुण्याच्या दिशेने, भाजप-शिवसेनेत युती घडवण्यासाठी वेग
शिंदेंचा माणूस पुण्याच्या दिशेने, भाजप-शिवसेनेत युती घडवण्यासाठी वेग.
चर्चेसाठी वेळ द्या....कोण करतंय विनवणी? दादांच्या NCPची नाशकात हतबलता
चर्चेसाठी वेळ द्या....कोण करतंय विनवणी? दादांच्या NCPची नाशकात हतबलता.
सत्तार, हिंदू देव-देवता अन् मामू...दानवेंचा संजय शिरसाटांवर हल्लाबोल
सत्तार, हिंदू देव-देवता अन् मामू...दानवेंचा संजय शिरसाटांवर हल्लाबोल.
गळ्यात सोन्याचं कमळ,नगराध्यक्षा हेमलता सावजींच्या मंगळसूत्राची चर्चा
गळ्यात सोन्याचं कमळ,नगराध्यक्षा हेमलता सावजींच्या मंगळसूत्राची चर्चा.
मी सेलिब्रेशन केलं नाही...मालवणमधील विजयानंतर निलेश राणे काय म्हणाले?
मी सेलिब्रेशन केलं नाही...मालवणमधील विजयानंतर निलेश राणे काय म्हणाले?.
आईचा विजय लेकाला मोठा आनंद, प्रणिता भालके विजयी अन् शौर्यने थोपटले दंड
आईचा विजय लेकाला मोठा आनंद, प्रणिता भालके विजयी अन् शौर्यने थोपटले दंड.
कोकाटेंची आमदारकी वाचली, शिक्षेला स्थगिती मिळाल्यानं 'सर्वोच्च' दिलासा
कोकाटेंची आमदारकी वाचली, शिक्षेला स्थगिती मिळाल्यानं 'सर्वोच्च' दिलासा.