AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रायगडावर आजही न्याय होतो, सिनेमा बंद पाडून दाखवा..; प्रसिद्ध अभिनेत्याने सुनावले खडेबोल

रायगडावर आजही न्याय होतो, चित्रपट बंद पाडून दाखवा.. असं थेट आव्हान प्रसिद्ध अभिनेत्याने दिलं आहे. रायगडावर नुकताच या चित्रपटाशी संबंधित भव्यदिव्य कार्यक्रम पार पडला. त्यावेळी या अभिनेत्याने खडेबोल सुनावले आहेत.

रायगडावर आजही न्याय होतो, सिनेमा बंद पाडून दाखवा..; प्रसिद्ध अभिनेत्याने सुनावले खडेबोल
रायगडावरून अभिनेत्याचं थेट आव्हानImage Credit source: Instagram
| Updated on: Jan 06, 2026 | 11:01 AM
Share

दिग्पाल लांजेकर लिखित आणि दिग्दर्शित ‘रणपती शिवराय स्वारी आग्रा’ या चित्रपटाचा भव्यदिव्य कार्यक्रम नुकतात पार पडला. यावेळी चित्रपटातील सर्व कलाकार तिथे उपस्थित होते. त्याचसोबत चित्रपटातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेवरून पडदा उचलण्यात आला. अभिनेता अभिजीत श्वेतचंद्र यामध्ये महाराजांची भूमिका साकारणार आहे. याच कार्यक्रमातील अभिनेते अजय पूरकर यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ते “आमचा चित्रपट बंद करून दाखवा” असं थेट आव्हान देताना दिसत आहेत. अजय पूरकर यांच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.

“रायगडावर आजही न्याय होतो..”

कार्यक्रमात अजय पूरकर यांना जेव्हा मंचावर बोलावलं गेलं, तेव्हा ते म्हणाले, “आम्ही अजूनही सर्वजण मानतो की, रायगडावर न्याय होतो बरं का! जे समाजासाठी काम करू इच्छितात, जे चांगलं काम करू इच्छितात, त्यांच्या वाटेत काटे पसरवणारी अनेक लोकं असतात. ती सगळ्यांच्याच नशिबी असतात. चांगलं काम करणाऱ्या टीमच्या नशिबी तर असतातच. तर त्या सगळ्यांना हे उत्तर आहे की, छत्रपती शिवाजी महाराज हे आजही आहेत, पुढेही राहणारच आहेत. म्हणून मी म्हटलंय की रायगडावर न्याय होतो बरं का! कोणीही या गैरसमजुतीत राहू नये की हे काम बंद पडू शकतं, बंद पाडू शकतो. असं काही होत नाही. आम्ही खंबीरपणे इथे उभे आहोत आणि करायचे असतील तर अजूनही प्रयत्न करा. आज तुमच्या माध्यमातून मी हे सांगतोय, फक्त नावं घेत नाहीये, एवढंच आहे.”

अजय पूरकर यांनी कोणाला हे आव्हान दिलंय हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. परंतु चित्रपट निर्मितीदरम्यान अडथळे निर्माण करणाऱ्यांना अजय यांनी थेट इशारा दिल्याचं समजतंय. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. ‘रायगडावर न्याय होतो हे वाक्यच डोळ्यात पाणी आणणारं आहे,’ असं एकाने म्हटलंय. तर ‘नाव घ्यायची हिंमत दाखवा, का विरोध करतायेत त्यांची पण बाजू समजेल मग,’ असं दुसऱ्याने लिहिलंय. ‘धार्मिक चित्रपट येऊ लागली की लोकांच्या पोटात दुखू लागतं. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास तुम्ही जगाला माहीत करून देत आहात. हे काम कौतुकास्पद आहे,’ अशीही कमेंट एका युजरने केली.

बावनकुळेंच्या भाषणादरम्यान घुसला भाजपचा बंडखोर, स्टेजवर आला अन्...
बावनकुळेंच्या भाषणादरम्यान घुसला भाजपचा बंडखोर, स्टेजवर आला अन्....
शिंदेंचा गेम करण्यासाठी भाजप-काँग्रेसची युती? हर्षवर्धन सपकाळ म्हणाले
शिंदेंचा गेम करण्यासाठी भाजप-काँग्रेसची युती? हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.
केसानं गळा कापला, मनसेचे मनीष धुरीही नाराज? थेट राज ठाकरेंकडे तक्रार
केसानं गळा कापला, मनसेचे मनीष धुरीही नाराज? थेट राज ठाकरेंकडे तक्रार.
फडणवीस संतापले अन् स्पष्टच म्हणाले, काँग्रेस-MIM सोबत आघाडी कधीही...
फडणवीस संतापले अन् स्पष्टच म्हणाले, काँग्रेस-MIM सोबत आघाडी कधीही....
भाजपसोबत नो, नेव्हर...जलील यांचा मोठा निर्णय; थेट नगरसेवकांनाच आदेश
भाजपसोबत नो, नेव्हर...जलील यांचा मोठा निर्णय; थेट नगरसेवकांनाच आदेश.
भ्रष्टाचाराच्या गोष्टी फडणवीसांनी करूच नये, राज ठाकरे यांचा घणाघात
भ्रष्टाचाराच्या गोष्टी फडणवीसांनी करूच नये, राज ठाकरे यांचा घणाघात.
अंबरनाथमध्ये धक्कादायक युती! शिंदेंविरोधात भाजपची काँग्रेस,NCP शी युती
अंबरनाथमध्ये धक्कादायक युती! शिंदेंविरोधात भाजपची काँग्रेस,NCP शी युती.
अकोटमध्ये भाजपची MIM शी हातमिळवणी, बहुमतासाठी BJP ची रणनिती नेमकी काय?
अकोटमध्ये भाजपची MIM शी हातमिळवणी, बहुमतासाठी BJP ची रणनिती नेमकी काय?.
पुणे मनपा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांचा भव्य रोड शो
पुणे मनपा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांचा भव्य रोड शो.
महायुतीकडून निवडणुकीपूर्वी प्रचाराचा झंझावत; फडणवीस, शिंदे, दादा कुठ?
महायुतीकडून निवडणुकीपूर्वी प्रचाराचा झंझावत; फडणवीस, शिंदे, दादा कुठ?.