‘अजेय: द अनटोल्ड स्टोरी ऑफ ए योगी’ सिनेमावरुन सेंसॉर बोर्डाला नोटीस, काय आहे प्रकरण?
'अजय: द अनटोल्ड स्टोरी ऑफ अ योगी' हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. हा चित्रपटावरुन बॉम्बे हायकोर्टाने सेन्सॉर बोर्डाला नोटीस पाठवली आहे.

गेल्या काही दिवसांपासून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या जीवनावर आधारित ‘अजेय: द अनटोल्ड स्टोरी ऑफ ए योगी’ हा सिनेमा चर्चेत आहे. या चित्रपटाचा काही दिवसांपूर्वीच टीझर प्रदर्शित करण्यात आला होता. आता या चित्रपटासंदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे. बॉम्बे हायकोर्टाने सेन्सॉर बोर्डाला नोटीस पाठवली आहे. या चित्रपटाला मान्यता मिळण्यात होणारा विलंब हा मनमानी असल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे.
काय आहे आरोप?
बार अँड बेंचने त्यांच्या अधिकृत एक्स अकाऊंटवर ‘अजेय: द अनटोल्ड स्टोरी ऑफ ए योगी’ सिनेमाबाबत अपडेट दिली आहे. ‘बॉम्बे हाय कोर्टाने चित्रपटाला मान्यता मिळण्यात मनमानी करत विलंब केल्यामुळे सेन्सॉर बोर्डाला नोटीस बजावली आहे. ‘अजेय: द अनटोल्ड स्टोरी ऑफ ए योगी’ हा चित्रपट उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या जीवनप्रवासावर प्रकाश टाकणारा आहे. तसेच हा सिनेमा द माँक हू बिकम चीफ मिनिस्टर या पुस्तकावर आधारित आहे’ या आशयाची पोस्ट करण्यात आली आहे.
#Bombay High Court issues notice to CBFC in a petition alleging arbitrary delay in certifying the film ‘Ajey: The Untold Story of a Yogi’ , inspired by the book ‘The Monk Who Became Chief Minister’ purportedly based on UP CM Yogi Adityanath’s life.#BombayHC… pic.twitter.com/bbMmhHcgic
— Bar and Bench (@barandbench) July 15, 2025
बॉम्बे हायकोर्टाने या प्रकरणी गंभीर दखल घेत सीबीएफसीला नोटीस बजावली आहे. ‘अजेय: द अनटोल्ड स्टोरी ऑफ ए योगी’ हा चित्रपट योगी आदित्यनाथ यांच्या जीवनावर आधारित असल्याने तो राजकीय आणि सामाजिक दृष्ट्या संवेदनशील मानला जात आहे. शंतनू गुप्ता यांनी लिहिलेल्या ‘द माँक हू बिकम चीफ मिनिस्टर’ या पुस्तकापासून प्रेरित असलेला हा चित्रपट त्यांच्या संन्यासापासून ते मुख्यमंत्रीपदापर्यंतच्या प्रवासाला चित्रित करतो.
कधी प्रदर्शित होणार सिनेमा?
‘अजय: द अनटोल्ड स्टोरी ऑफ अ योगी’ हा चित्रपट १ ऑगस्ट २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट योगी आदित्यनाथ यांचा एका साध्या कुटुंबातून मोठा नेता बनण्यापर्यंतचा प्रवास दाखवतो. चित्रपटात अभिनेता अनंत जोशी योगी आदित्यनाथ यांची भूमिका साकारत आहे. टीझर पाहिल्यानंतर प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबद्दल खूप उत्साह आहे. केवळ अनंत जोशीच नाही तर इतर अनेक बडे कलाकार चित्रपटात दिसणार आहेत. यात दिनेश लाल यादव (निरहुआ), परेश रावल, पवन मल्होत्रा, अजय मेंगी, राजेश खट्टर, गरिमा विक्रांत सिंह आणि सरवर आहुजा सारखे कलाकार आहेत. हा चित्रपट लोकांना किती आवडतो आणि बॉक्स ऑफिसवर तो किती मोठा हिट ठरतो हे पाहणे मनोरंजक ठरेल.
