Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘छावा’चा ट्रेलर पाहून मराठी अभिनेत्याकडून खंत व्यक्त; नेटकरी म्हणाले ‘स्वत: इंग्रजी झाडतोय अन्..’

'छावा' या चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेसाठी मराठी कलाकार निवडायला पाहिजे होता, असं मत एका मराठी अभिनेत्याने मांडलं आहे. त्यावर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. कलाकार कोणताही असो महाराजांची किर्ती सर्वत्र पसरतेय, हे महत्त्वाचं असल्याचं नेटकऱ्यांनी म्हटलंय.

'छावा'चा ट्रेलर पाहून मराठी अभिनेत्याकडून खंत व्यक्त; नेटकरी म्हणाले 'स्वत: इंग्रजी झाडतोय अन्..'
विकी कौशलImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jan 27, 2025 | 9:11 AM

अभिनेता विकी कौशलची मुख्य भूमिका असलेल्या ‘छावा’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटात विकीने छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. ट्रेलरमधील त्याच्या अभिनयाचं जोरदार कौतुक होत आहे. मात्र महाराजांच्या भूमिकेसाठी मराठी कलाकाराची निवड झाली असती, तर चांगलं वाटलं असतं, अशी प्रतिक्रिया एका मराठी अभिनेत्याने दिली आहे. ‘मन उडु उडु झालं’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेला अभिनेता अजिंक्य राऊतने हे मत मांडलं आहे.

विकी कौशलच्या ‘छावा’ या चित्रपटाच्या ट्रेलरबद्दल तुझं काय मत आहे, असा प्रश्न त्याला विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना तो म्हणाला, “ट्रेलर तर खूपच कमाल आहे. विकी कौशल हा अत्यंत प्रतिभावान कलाकार आहे. परंतु, महाराजांची भूमिका करण्यासाठी मराठी अभिनेत्याला निवडलं पाहिजे होतं, अशी माझी इच्छा आहे. राष्ट्रीय स्तरावरच्या या चित्रपटात इतक्या मोठ्या पडद्यावर ती भूमिका पाहणं एक वेगळाच अनुभव असता. कदाचित मराठी इंडस्ट्री आणि मराठी कलाकार म्हणून आपण कुठे तरी कमी पडतोय. लहान तोंडी मोठा घास पण प्रेक्षक म्हणून आणि मराठी इंडस्ट्रीचा प्रतिनिधी म्हणून मला असं वाटतं की ती भूमिका एखाद्या मराठी कलाकाराने साकारायला पाहिजे होती किंवा आगामी काळात मराठी कलाकाराने अशा भूमिका साकाराव्यात. चंदु चॅम्पियन असो, मुंज्या असो किंवा महाराजांची भूमिका असो.. मराठी व्यक्तीने अशा भूमिका केल्या पाहिजेत असं मला वाटतं.”

हे सुद्धा वाचा

अजिंक्यने मांडलेल्या या मतावर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत. ‘मी सहमत आहे, चित्रपट हिंदी असला तरी 50-60 टक्के तरी मराठी कलाकारांना घेतलं पाहिजे होतं’, असं एकाने लिहिलं. तर ‘मराठी कलाकार पॅन इंडियाचं यश मिळवू शकत नाहीत. महाराजांची किर्ती सर्वत्र पोहोचणं महत्त्वाचं आहे’, असं दुसऱ्याने म्हटलंय. या व्हिडीओमध्ये अजिंक्य अधून मधून इंग्रजी बोलत असल्याने त्यावरूनही नेटकऱ्यांनी टोला लगावला आहे. ‘स्वत: मराठी असून इंग्रजी झाडततोय आणि कलाकार हा कलाकार असतो मग तो मराठी असो किंवा हिंदी. महाराजांचा इतिहास जगासमोर येणं महत्त्वाचं आहे’, असं आणखी एका युजरने लिहिलं आहे. आणखी एका नेटकऱ्याने म्हटलंय, ‘मराठी-हिंदी-नॉन मराठी काय चालू आहे? चित्रपटाची कास्टिंग लोकांच्या मतांवरून नाही तर प्रतिभेवरून होते. कोणत्याच मराठी कलाकाराने या भूमिकेसाठी अर्ज केला नसेल किंवा त्यांची निवड झाली नसेल याची मला खात्री आहे.’ तर दुसऱ्या युजरने लिहिलंय, ‘आपण इथे मराठी का अमराठी अभिनेता हा भेद करण्यापेक्षा अभिनय, मांडणी किती छान असेल हे पहावं. संकुचित वृत्तीपेक्षा थोडे व्यापक विचार करावेत.’

खोक्याच्या बायकोने केला मोठा खुलासा, म्हणाली..
खोक्याच्या बायकोने केला मोठा खुलासा, म्हणाली...
'हा विषय आता संपवा'; औरंगजेबाच्या कबरीवर चंद्रकांत खैरे काय म्हणाले?
'हा विषय आता संपवा'; औरंगजेबाच्या कबरीवर चंद्रकांत खैरे काय म्हणाले?.
युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड; कार्यकर्ते आक्रमक
युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड; कार्यकर्ते आक्रमक.
धनंजय मुंडेंची आमदारकी 100 टक्के जाणारच; करुणा शर्मा यांचा दावा
धनंजय मुंडेंची आमदारकी 100 टक्के जाणारच; करुणा शर्मा यांचा दावा.
वाढत्या उष्णतेने सोलापूरकरांचे हाल बेहाल
वाढत्या उष्णतेने सोलापूरकरांचे हाल बेहाल.
'होळी खेळताना त्यांना माझ्या भावाचे..' - धनंजय देशमुख
'होळी खेळताना त्यांना माझ्या भावाचे..' - धनंजय देशमुख.
खोक्याला बावी गावात आणलं; घटनास्थळावर कसून चौकशी सुरू
खोक्याला बावी गावात आणलं; घटनास्थळावर कसून चौकशी सुरू.
आता घरकुलांना पाच ब्रास मोफत वाळू मिळणार; बावनकुळेंनी दिली माहिती
आता घरकुलांना पाच ब्रास मोफत वाळू मिळणार; बावनकुळेंनी दिली माहिती.
करुणा शर्मा खोक्याला कसं ओळखता? सांगितली 'ती' घटना
करुणा शर्मा खोक्याला कसं ओळखता? सांगितली 'ती' घटना.
राणेंचे जुने व्हिडिओ काढा, हलालचं मटण खाताना दिसतील; वडेट्टीवारा टोला
राणेंचे जुने व्हिडिओ काढा, हलालचं मटण खाताना दिसतील; वडेट्टीवारा टोला.