Video | सारा अली खानची शायरी ऐकून अक्षय कुमारच्या डोळ्यात आले पाणी! 

अक्षय कुमार आणि सारा अली खान सध्या आग्रात ‘अतरंगी रे’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.

Video | सारा अली खानची शायरी ऐकून अक्षय कुमारच्या डोळ्यात आले पाणी! 

दिल्ली : अक्षय कुमार आणि सारा अली खान सध्या आग्रात ‘अतरंगी रे’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या शूट दरम्यान अक्षयची काही फोटो व्हायरल झाली होती. सोमवारी ताजमहाल येथे साराने अक्षय कुमार सोबत शूट केले. तेथून तिने अक्षयच्या शाहजहांच्या अवतारची झलकही चाहत्यांना दाखवली. सारा जेव्हा नवीन ठिकाणी जाते त्यावेळी त्याठिकाणाबद्दलच्या आठवणी चाहत्यांसोबत शेअर करत असते. ताजमहालला भेट देऊनही तिने असेच काही केले. (Akshay Kumar and Sara Ali Khan’s Agra shooting Atarangi Re starte)

 

View this post on Instagram

 

A post shared by Sara Ali Khan (@saraalikhan95)

चाहत्यांसाठी तिने एक खास व्हिडिओ तयार केला आहे. ताजमहाल चाहत्यांना दाखवताना तिने एक शायरी तयार केली मात्र, तिचीही शायरी ऐकल्यानंतर अक्षयच्या डोळ्यातून पाणीच आले आणि या व्हिडिओत तो हासताना देखील दिसत आहे. शेवटी अक्षय म्हणतो की, प्रयत्न करा प्रयत्न करणारे कधीच हारत नाहीत. सारा अली खानने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ती अक्षय कुमारची तिच्या चाहत्यांशी ओळख करून देत आहे.

अक्षय कुमारच्या ‘अतरंगी रे’ या चित्रपटाचं शूटिंग आग्रामध्ये सुरू आहे. या चित्रीकरणाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. या चित्रपटात दाक्षिणात्य सुपरस्टार धनुष आणि सारा अली खान मुख्य भूमिकेत आहेत. सारा अली खानचा आगामी चित्रपट ‘कुली नंबर वन’ 25 डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे सध्या सारा ‘अतरंगी रे’ या चित्रपटाचं शूटिंग करतेय. सोबतच सध्या ड्रग्ज प्रकरणामुळे ‘हीरोपंती 2’या चित्रपटातून साराचं नाव काढून टाकलं असल्याची चर्चा आहे. सुत्रांच्या माहितीनुसार अक्षय या चित्रपटात एक छोटाशी भूमिका साकारणार आहे आणि या भूमिकेसाठी त्यानं चांगलीच रक्कम घेतली आहे.

संबंधित बातम्या : 

वाढदिवसाच्या पार्टीत गोविंदाचा पत्नीसोबत डान्स, पाहा व्हिडीओ

अर्जुन रामपालच्या घरी सापडलेलं ट्रेमाडॉल औषध नेमकं काय?

‘हे’ आहेत बॉलिवूडमधील सर्वाधिक मानधन घेणारे टॉप 5 अभिनेते, जाणून घ्या कोणाचं मानधन किती

(Akshay Kumar and Sara Ali Khan’s Agra shooting Atarangi Re starte)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI