AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Drishyam 3 : ‘दृश्यम 3’ मधून अक्षय खन्ना बाहेर, नव्या चेहऱ्यासह शूटिंग कधी होणार सुरू ?

Drishyam 3 : अजय देवगणाच्या 'दृश्यम 3'ची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत आहेत. या चित्रपटाच्या शूटिंगचं मुंबई शेड्यल पूर्ण होत आलं असून आता लवकरच सगळी टीम गोव्याला जाणार आहे. तिथे नव्या मेंबरसोबत चित्रपटाचं पुढं शूटिंग पूर्ण होणार आहे.

Drishyam 3 : 'दृश्यम 3' मधून अक्षय खन्ना बाहेर,  नव्या चेहऱ्यासह शूटिंग कधी होणार सुरू ?
Drishyam 3
| Updated on: Dec 29, 2025 | 3:10 PM
Share

पुढल्या वर्षात अर्थात 2026 मध्ये अनेक मोठे, महत्वाचे चित्रपट बॉक्स ऑफीसवर रिलीज होणार आहेत, त्यापैकीचएक म्हणजे अजय देवगणचा ‘दृश्यम 3’ (Drishyam 3)  . हा या चित्रपटाचा तिसरा भाग असून प्रेक्षक त्याची आतुरतेने वाट बघत आहेत. मात्र गेल्या काही दिवसांपासून हा चित्रपट खूप चर्चेत आहे. 2 ऑक्टोबर 2026 हा पिक्चर रिलीज होणार असल्याची घोषणा करण्यात आली. चित्रपटाच्या घोषणेपासून, त्याच्या कलाकारांबद्दल बऱ्याचा बातम्या समोर आल्या आहेत. मात्र अक्षय खन्नाने (Askahaye Khanna) हा चित्रपट करण्यास नकार दिल्याने बरीच खळबळ माजली, मेकर्सनी त्याच्यावर अनेक आरोपही केले. अखेर आता नव्या कास्टची एंट्री झाली असून चित्रपट आता शूटिंगच्या पुढील टप्प्यात प्रवेश करणार आहे, आणि नवीन कलाकार हे नवं शेड्यूलही जॉईन करणार आहेत.

दृश्यम या त्याच्या क्लासिक चित्रपटाच्या तिसऱ्या भागासह अजय देवगण पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे, चित्रपटाची घोषणा झाल्यापासून प्रेक्षक या चित्रपटासाठी खूप उत्सुक आहेत. चित्रपटाचे चित्रीकरण मुंबईत सुरू होते, पण आता हे शेड्यूल लवकरच संपणार आहे, त्यानंतर संपूर्ण टीम गोव्याला रवाना होईल. चित्रपटातील अनेक महत्त्वाची दृश्यं गोव्यात चित्रित केली जाणार आहेत, ज्यासाठी चित्रपटाचा नवा चेहरा म्हणजेच जयदीप अहलावत देखील उपस्थित राहणार आहे.

कधी संपणार शूटिंग ?

रिपोर्ट्सनुसार, फेब्रुवारीच्या अखेरीस गोव्यात चित्रपटाचे शूटिंग पूर्ण होणार आहे. अजय देवगण व्यतिरिक्त, तब्बू, श्रिया सरन आणि रजत कपूर हे देखील चित्रपटाचा महत्वाचा भाग आहेत. पण पार्ट 2 प्रमाणे, अक्षय खन्ना या चित्रपटाचा भाग नसेल. अभिषेक पाठक दिग्दर्शित करत असलेल्या दृश्यम 3 बद्दल आणि अक्षय खन्नाबद्दल खूप चर्चा होत आहे. खरंतर, अक्षय खन्ना चित्रपटाच्या दुसऱ्या भागात एका महत्त्वाच्या भूमिकेत होता. त्याचप्रमाणे तो तिसऱ्या भागातही दिसणार होता. मात्र अचानक त्याने हा चित्रपट सोडल्याची माहिती समोर आली.

  Akshaye Khanna : 10-20 कोटी नव्हे, अक्षय खन्नाने ‘दृश्यम 3’साठी मागितली इतकी फी ! का फिस्कटली बोलणी ?

अक्षय खन्ना सध्या त्याच्या धुरंधर चित्रपटाच्या यशाचा आनंद घेत आहे. सुरुवातीला त्याच्या फीच्या मागणीमुळे तो दृश्यम 3 मधून बाहेर पडत असल्याची बातमी समोर आली. पण,फीच्या मागणीव्यतिरिक्त, त्याच्या इतर अनेक मागण्या होत्या, त्या पूर्ण करण्यात आल्या होत्या असा खुलासा चित्रपटाच्या निर्मात्यांनी केला होता. पण तरीही अक्षय चित्रपटातून बाहेर पडला. आता त्याच्या जागी जयदीप अहलावत हा महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.

Follow Us
राहुल गांधींकडून पेपरफुटीचा मुद्दा उपस्थित
राहुल गांधींकडून पेपरफुटीचा मुद्दा उपस्थित; मोदींवर दुहेरी भूमिकेचा आरोप
छात्रों की गूंज कार्यक्रमात प्रत्येकी ३५ हजार रुपये वाटप
नवनाथ बन यांचा दावा, छात्रों की गूंज कार्यक्रमात प्रत्येकी ३५ हजार रुपये वाटप
चित्रा वाघ यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
चित्रा वाघ यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल:
कार्यकर्ता तसेच विद्यार्थिनींनी साकारली राहुल गांधींची सुंदर रांगोळी
राहुल गांधींच्या पुणे दौऱ्याला उस्फुर्त प्रतिसाद! कार्यकर्ता तसेच विद्यार्थिनींनी सकारली सुंदर रांगोळी
पुण्यात राहुल गांधींना मुस्लिम तरुणांकडून खास भेट...
कार्यकर्त्यांचा उत्साह! पुण्यात राहुल गांधींना मुस्लिम तरुण देणार छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती
पुण्यात राहुल गांधींची पदाधिकाऱ्यांसोबत बैठक; महाराष्ट्रातील राजकारणाब
पुण्यात राहुल गांधींची पदाधिकाऱ्यांसोबत बैठक; महाराष्ट्रातील राजकारणाबाबत चर्चा, अगामी काळात...
राहुल गांधींचं पुण्यात पदाधिकाऱ्यांकडून स्वागत, कार्यक्रमाची...
राहुल गांधींचं पुण्यात पदाधिकाऱ्यांकडून स्वागत, कार्यक्रमाची जय्यत तयारी
सणासुदीपूर्वी चंद्रपूरमध्ये साखरेचे भाव गगनाला, सर्वसामान्यांचे बजेट
सणासुदीपूर्वी चंद्रपूरमध्ये साखरेचे भाव गगनाला, सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले
देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप: राहुल गांधींच्या...
देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप: राहुल गांधींच्या प्रचारासाठी इन्फ्लुएंसर्सना तब्बल...
Abdul Sattar: मराठा आरक्षणावर अब्दुल सत्तारांचे मोठे विधान;
Abdul Sattar: मराठा आरक्षणावर अब्दुल सत्तारांचे मोठे विधान; जरांगेंना चर्चेतून न्याय देणार