AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आलिया भट्टने लग्नाच्या तीन वर्षांनी आडनाव का बदलले? म्हणाली ‘मला एकटं वाटून घ्यायचं नाहीये’

आलिया भट्टने लग्नाच्या 3 वर्षांनी तिचं नाव बदललं आहे. सध्या तिच्या बदललेल्या आडनावाची चर्चा सर्वत्र आहे.  शिवाय ती स्वत:याबाबत किती उत्सुक आहे हे देखील दिसून येते.  आलियाने यामागचे कारणही स्पष्ट केले आहे.

आलिया भट्टने लग्नाच्या तीन वर्षांनी आडनाव का बदलले? म्हणाली 'मला एकटं वाटून घ्यायचं नाहीये'
aliya bhattaImage Credit source: Instagram
| Updated on: Jun 13, 2025 | 2:13 PM
Share

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आलिया भट्ट कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. चाहते आलियाच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्याबद्दल जाणून घेण्यास खूप उत्सुक असतात. आता आलिया भट्ट तिच्या आडनावाबद्दल चर्चेत आली आहे. खरंतर, आलियाने सुमारे 3 वर्षांपूर्वी रणबीर कपूरशी लग्न केले होते, परंतु त्यानंतर तिने सोशल मीडियावर तिचे आडनाव बदलले नाही, जे सहसा काही लोक आणि सेलिब्रिटी करतात.

आलियाने लग्नाच्या तब्बल 3 वर्षानंतर तिचे आडनाव बदलले

आलियाने लग्नाच्या तब्बल 3 वर्षानंतर तिचे आडनाव बदलले आहे. अलिकडेच आलिया भट्टच्या ब्लॉगमध्ये, हॉटेल कर्मचाऱ्यांनी आलिया कपूर असे लिहून आलिया भट्टचे स्वागत केल्याचे दिसले. याची झलक आलियाच्या ब्लॉगमध्ये पाहायला मिळते. ब्लॉगमध्ये आलियाने हॉटेलच्या स्वागत फलकाकडे कॅमेरा दाखवताच, तिथे आलिया कपूर असे लिहिलेले दिसत आहे. फोटोवरून, आलियाचे चाहते अंदाज लावत आहेत की आलियाने तिचे आडनाव बदलण्याची प्रक्रिया पूर्ण केली आहे.

कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये तिच्या बदललेल्या आडनावाची चर्चा 

काही दिवसांपूर्वी आलिया कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये गेली होती आणि यादरम्यान तिचा तयारी करतानाचा एक व्हिडिओ आहे जो तिने तिच्या यूट्यूब चॅनलवर शेअर केला आहे. आता या व्हिडिओमधील एक क्लिप खूप व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये, आलिया कपूर तिच्या बसलेल्या खोलीतील एलसीडीवर लिहिलेले आहे. आलियाने आता कपूर हे आडनाव करून घेतले आहे याचा हा एकमेव संकेत आहे.

मला वेगळ पडायचं नाही

दरम्यान एका मुलाखतीत आलियाने खुलासा केला होता की, तिचे स्क्रीन नेम नेहमीच आलिया भट्ट असेल, परंतु कागदपत्रांवर ती अधिकृतपणे तिचे नाव ‘आलिया भट्ट-कपूर’ असे बदलणार आहे. तिच्या पासपोर्टवरील नाव अपडेट करण्याबद्दल बोलताना ती म्हणाली, “मला ते करायला आनंद होत आहे.” आलिया पुढे म्हणाली की, ती बऱ्याच काळापासून हा बदल करण्याचा विचार करत होती, परंतु तिच्या व्यस्त वेळापत्रकामुळे तिला ते करण्यासाठी वेळ मिळाला नाही. ती म्हणाली की “आता आपल्याला मुल आहे आहे. कपूर कुटुंब एकत्र प्रवास करत असताना मला भट्ट व्हायचे नाहीये तुम्हाला माहिती आहे का? कारण मला एकटेपणा किंवा वेगळेपणा वाटून घ्यायची नाही,”. तिने यापूर्वी कपिल शर्माच्या शो आणि करण जोहरच्या चॅट शोमध्ये स्वतःला आलिया भट्ट कपूर असे संबोधले आहे.

आलिया आणि रणबीर यांचे लग्न एप्रिल 2022 मध्ये झाली होती. दोघांची भेट ब्रह्मास्त्र चित्रपटाच्या सेटवर झाली होती . इथेच दोघांचे प्रेम झाले आणि नंतर लग्न झाले. दोघांनाही राहा नावाची मुलगी आहे जिचा जन्म नोव्हेंबर 2022 मध्ये झाला.

आलियाच्या कामाबद्दल बोलायचं तर…

आलियाच्या चित्रपटांबद्दल बोलायचे झाले तर, ती शेवटची गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या ‘जिगरा’ चित्रपटात दिसली होती. आता ती यशराज फिल्म्सच्या ‘अल्फा’ या गुप्तहेर चित्रपटात दिसणार आहे ज्यामध्ये तिच्यासोबत शर्वरी वाघ मुख्य भूमिकेत आहे. याशिवाय, ती संजय लीला भन्साळी यांच्या ‘लव्ह अँड वॉर’ या चित्रपटातही दिसणार आहे ज्यामध्ये रणबीर कपूर आणि विकी कौशल देखील तिच्यासोबत असणार आहेत.

नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला
नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा.
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स.
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका.
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका.
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी.
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक.
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.