आलियासोबत 200 बॅकग्राऊंड डान्सर्स, भन्साळींच्या ‘गंगूबाई काठियावाडी’त भव्यदिव्य गाणं

गंगूबाई काठियावाडी या सिनेमातील आलियाचा लुक आणि तिचे काही पोस्टर्स जारी करण्यात आले आहेत. संजय लीला भन्साळी दिग्दर्शित या सिनेमात आलिया एका वैश्यालयाची मालकिनची भूमिका साकारत आहे.

आलियासोबत 200 बॅकग्राऊंड डान्सर्स, भन्साळींच्या 'गंगूबाई काठियावाडी'त भव्यदिव्य गाणं

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट सध्या दोन प्रोजेक्टवर काम करत आहे (Alia Bhatt To Shoot Two Dance Songs). तिचे चाहते सध्या तिच्या या सिनेमांची मोठ्या आतुरतेने वाट पाहत आहेत. पहिला सिनेमा हा ब्रह्मास्त्र आहे आणि दुसरा सिनेमा गंगूबाई काठियावाडी आहे. ब्रह्मास्त्रचा आतापर्यंत फक्त लोगो रिव्हील करण्यात आला आहे. गंगूबाई काठियावाडी या सिनेमातील आलियाचा लुक आणि तिचे काही पोस्टर्स जारी करण्यात आले आहेत. संजय लीला भन्साळी दिग्दर्शित या सिनेमात आलिया एका वैश्यालयाची मालकिनची भूमिका साकारत आहे (Alia Bhatt To Shoot Two Dance Songs).

तब्बल तीन महिने शूटिंग केल्यानंतर आता सिनेमाची शूटिंग जवळपास पूर्ण झाली आहे. पण, सिनेमातील आलियाचं काम अद्याप पूर्ण झालेलं नाही. संजय लीला भन्साळी कुठल्याही वस्तूला लार्जर दॅन लाईफ दाखवण्यासाठी ओखळले जातात. त्यांच्या सिनेमातील गाणी जेवढ्या ग्लॅमरस अंदाजात शूट केले जातात, तसं हिंदी सिनेमात फार कमी पाहायला मिळतं.

2002 मध्ये प्रदर्शित झालेला सिनेमा ‘देवदास’चं गाणं ‘डोला रे डोला’ असेल किंवा 2015 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘बाजीराव मस्तानी’चं ‘पिंगा’ हे गाणं असेल, संजय भन्साळी यांच्या सिनेमातील गाणी ही नेहमी आयकॉनिक असतात. सध्याच्या बातम्यांनुसार, संजय लीला भन्साळी यांनी आपल्या या सिनेमात काही खास डान्स नंबर टाकणार आहेत ज्याचं शूटिंग फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यात सुरु होईल (Alia Bhatt To Shoot Two Dance Songs).

200 पेक्षा जास्त बॅकग्राऊंड डान्सर्स

मिड डेच्या एका रिपोर्टनुसार, “आलियाला थोडा ब्रेक देण्यात आला आहे. त्यांना दोन गाण्यांच्या तयारीसाठी वेळ मिळाली आबे. यापैकी एक टिपिकल भन्साळी नंबर असेल. ज्याला अत्यंत लॅविश अंदाजात 200 बॅकग्राऊंड डान्सर्ससोबत शूट केलं जाईल. सिनेमाच्या या गाण्याला कामाठीपुराच्या डुप्लीकेट सेटवर शूट केलं जाणार आहे. हा सेट गोरेगावच्या फिल्म सीटीमध्ये शूट करण्यात आलं आहे”.

Alia Bhatt To Shoot Two Dance Songs

संबंधित बातम्या :

भन्साळींच्या ‘गंगुबाई’ मागे वादाचा ससेमिरा, आणखी एका कायदेशीर नोटिसीशी सामना!

गंगूबाई काठियावाडी चित्रपटावरुन वादाचा धुरळा, आलिया भट्टचं म्हणणं काय?

Published On - 1:01 pm, Tue, 2 February 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI