गंगूबाई काठियावाडी चित्रपटावरुन वादाचा धुरळा, आलिया भट्टचं म्हणणं काय?

संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) यांचे चित्रपट आणि वाद हे समीकरण नवे नाही. त्यांचा कुठल्याही चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी वाद होतोच.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 9:37 AM, 13 Jan 2021
संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) यांचे चित्रपट आणि वाद हे समीकरण नवे नाही. त्यांचा कुठल्याही चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी वाद होतोच. आता यावेळी शूटिंगदरम्यान गंगूबाई काठियावाडी (Gangubai Kathiawadi) या चित्रपटाच्या अडचणी वाढल्या आहेत. यासर्व प्रकरणावर आलिया भट्ट संजय लीला भन्साळी यांना भेटायला गेली होती.
बॉलिवूडची अभिनेत्री आलिया भट्ट सध्या तिच्या आगामी ‘गंगूबाई काठियावाडी’ चित्रपटाच्या मुंबईत शूटिंग करत आहे. अलियाला चित्रपटाच्या टीमबरोबर मुंबईत स्पॉट केले होते.
चित्रपट हुसेन जैदी (Hussain Zaidi) यांच्या माफिया क्वीन्स ऑफ मुंबई या पुस्तकावर आधारित आहे. या चित्रपटात आलिया भट्ट मुख्य भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटाचे शूटिंग सध्या मुंबईत सुरू आहे.
गंगूबाईच्या कुटुंबियांनी 22 डिसेंबर रोजी संजय लीला भन्साळी, आलिया भट्ट आणि हुसेन कैदी विरोधात गुन्हा दाखल केला होता. गंगूबाई काठियावाडी यांच्या कुटुंबियांना चित्रपटाबद्दल काही आक्षेप आहेत.
गंगूबाई काठियावाडी चित्रपटात आलिया व्यतिरिक्त अजय देवगण पाहुणा कलाकार म्हणून दिसणार आहे. चित्रपटात तो आलियाच्या गुरूची भूमिका साकारणार आहे.
हा चित्रपट फाळणीच्या आधी आणि नंतरची कथा देखील दाखवण्यात आली आहे. हुसेन जैदी यांच्या माफिया क्वीन्स ऑफ मुंबई या पुस्तकात असे सांगितले गेले आहे की, गांगुबाई हे 60 च्या दशकात मुंबई माफियाचे एक मोठे नाव होते.