AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aishwarya Rai : नणंद-भावजयीत विस्तव जात नाही.. श्वेता-ऐश्वर्यामध्ये काय बिनसलं ? बच्चन कुटुंबात काय घडतंय ?

बॉलीवूडमधील लोकप्रिय कपल ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या प्रेमाबद्दल सर्वांनाच माहीत आहे, पण गेल्या काही काळापासू हे दोघे वेगळ्याचा कारणांमुळे चर्चेत आहेत. ऐश्वर्या -अभिषेक यांच्यात मतभेद असून ते एकत्र राहत नाही, लवकरच घटस्फोट घेणार अशा एक ना दोन, वेगवेगळ्या बातम्या सतत समोर येत असतात. त्यांच्या घटस्फोटांच्या चर्चा दरम्यान चाहते अनेकवेळेस जया बच्चन आणि श्वेता यांच्या जुन्या व्हिडीओजवर चर्चा करतात. श्वेता हिला पहिल्यापासूनच वहिनी ऐश्वर्या आवडत नाही असा अनेकांचा दावा आहे, अनेक घटनांवरून ते सिद्ध होत असल्याचं लोकांचं म्हणणं आहे.

Aishwarya Rai : नणंद-भावजयीत विस्तव जात नाही.. श्वेता-ऐश्वर्यामध्ये काय बिनसलं ? बच्चन कुटुंबात काय घडतंय ?
Image Credit source: social media
| Updated on: Sep 23, 2024 | 10:31 AM
Share

अभिनेत्री ऐश्वर्या राय नेहमीच चर्चेत असते, कधी तिच्या कामामुळे, तर कधी मुलगी आराध्यामुळे. मात्र गेल्या काही दिवसांपासून ऐश्वर्या ही तिच्या नात्यामुळे, लग्नामुळे चर्चेत आहे. लाडकी लेक आराध्याला दिलेल्या संस्कारांमुळे लोकं ऐश्वर्याचं कौतुक करतात, पण अभिषेक बच्चन याच्याशी घटस्फोट होणार असल्याच्या, बेबनावाच्या बातम्यामुळे चाहते काळजीत आहेत. या जोडप्याबद्दल लोक बऱ्याच अशा गोष्टी नोटीस करतात ज्यामुळे या अफवांना आणखीनच उधाण येतं. सासरच्यांशी ऐश्वर्याचं नातं कसं आहे ? असा प्रश्न अनेक चाहत्यांना पडतो. सोशल मीडियावरील काही व्हिडीओमधून लोकांना त्याचं उत्तरही मिळतं. याच व्हायरल क्लिपदरम्यान बच्चन कुटुंबाची लेक, श्वेता बच्चन ही देखील ट्रोल झाली आहे. श्वेताने अनेकवेळा पब्लिक इव्हेंट्समध्ये ऐश्वर्याला इग्नोर केलं, तिला जी वागणूक दिली ते पाहून चाहते तिच्यावर चांगलेच भडकलेत.

खरंतर ऐश्वर्या राय आणि श्वेता नंदा यांचं नातं काही चांगलं नाहीये. लग्नानंतर काही वर्षांतच दोघींमध्ये मतभेद असल्याचं, अंतर असल्याचं दिसून आलं. दोघीही एकमेकांबद्दल बोलणं टाळता, एवढंच काय कधी फारशा एकत्रही दिसत नाहीत. अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्यातील भांडणाच्या, घटस्फोटाच्या अफवा येतात तेव्हा श्वेता बच्चन नंदा हीच कारणीभूत असल्याच्याही चर्चा होतात. अनेक प्रसंगांमधून त्या दोघींच्या नात्यातील दरी दिसून आली.

श्वेताला बिलकूल आवडत नाही ऐश्वर्या वहिनी !

  1. त्यातला पहिला प्रसंग आहे पॅरिस फॅशन वीकचा, श्वेता नंदाची मुलगी नव्या नवेली नंदा हिने फॅशन वीकमध्ये पदार्पण केले. यावेळी श्वेता बच्चन ही आई जया बच्चनसोबत आपल्या मुलीला सपोर्ट करण्यासाठी आली होती. यानंतर श्वेता बच्चनने आपल्या मुलीसाठी एक खास पोस्ट शेअर केली. खरंतर ऐश्वर्या राय आणि नव्या हिने पॅरिस फॅशन वीकमध्ये एकाच ब्रँडसाठी रॅम्प वॉक केला होता. मात्र ्से असूनही श्वेताने कुठेही ऐश्वर्याचा उल्लेख केला नाही, तिने फक्त श्वेताचं कौतुक केलं. यावरून चाहत्यांनी श्वेता बच्चनला खूप ट्रोल केले. असं वारंवार का घडतं ? असा सवालही अनेकांनी विचारला.
  2. अनेक सेलिब्रिटी करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ या टॉक शोचा भाग बनतात. या शोमध्ये श्वेता बच्चनही तिचा भाऊ अभिषेक बच्चनसोबत पोहोचली होती. यादरम्यान तिला विचारण्यात आले की, अभिषेक आणि ऐश्वर्यामध्ये कोण स्टार आहे ? तेव्हा तिने तत्काळ भावाचं, अभिषेकचं नाव घेतलं. त्याचवेळी जेव्हा अभिषेक बच्चनला विचारण्यात आले की, तो कोणाला सर्वात जास्त घाबरतो, तेव्हा अभिनेता आई म्हणाला. मात्र श्वेता त्यात मध्येच बोलली आणि तिने उत्तर दिली की बायको ( तो बायकोला जास्त घाबरतो).
  3. एका मुलाखतीदरम्यान श्वेता बच्चनला विचारण्यात आले की, ऐश्वर्या रायची कोणती सवय तिला आवडत नाही? यावर तिने उत्तर दिलं की, ती कॉल उचलायला आणि मेसेजला उत्तर देण्यासाठी खूप वेळ लावते. तिची ही सवय मला बिलकूल आवडत नाही. मात्र त्यावेळी श्वेताने ऐश्वर्याचं कौतुकही केलं होतं. पण कोणत्याही मुलाखतीत ऐश्वर्याबद्दल बोलणं श्वेता टाळते, हे अनेक वेळा दिसून आलंय.
  4. त्यातच सोशल मीडियावर एक जुना व्हिडिओ व्हायरल झाला. त्यामध्ये संपूर्ण बच्चन कुटुंब एका इव्हेंटसाठी पोहोचले. अमिताभ बच्चन, श्वेता नंदा, अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय पापाराझींसाठी पोज देताना दिसता. त्याचवेळी फोटोग्राफर ऐश्वर्याला सोलो फोटांसाठी रिक्वेस्ट करतात. मात्र ते ऐकून श्वेता तोंड वेंगाडत तिकडून निघून जाण्याचा प्रयत्न करते. हा व्हिडीओ जुना असला तरी आधीही व्हायरला झाला होता आणि आताही बऱ्याच चर्चेत आहे. हीच घर तोडण्यासाठी कारणीभूत आहे, अशी कमेट चाहत्यांनी केली होती.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.