AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बिग बींनी सोडला होता भारत, 6800 किमी दूर असलेल्या या देशात झाले स्थायिक

अमिताभ बच्चन यांनी १९६९ मध्ये ‘सात हिंदुस्तानी’ या चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली, जी ५६ वर्षांनंतर आजही सुरू आहे. पण बिग बी यांच्या कारकिर्दीत एक असे वळण आले होते, जेव्हा त्यांनी अभिनय सोडला होता आणि भारतही सोडून गेले होते

बिग बींनी सोडला होता भारत, 6800 किमी दूर असलेल्या या देशात झाले स्थायिक
Amitabh BachchhanImage Credit source: Tv9 Bharatvarsh
| Updated on: May 12, 2025 | 10:32 PM
Share

हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेता अमिताभ बच्चन यांनी आपल्या उत्कृष्ट अभिनयाने जगभरातील चाहत्यांची मने जिंकली आहेत. बिग बी यांना बॉलिवूडमध्ये अभिनेता म्हणून काम करताना पाच दशकांहून अधिक काळ झाला आहे. वयाची ८२ वर्षे ओलांडल्यानंतरही त्यांचे चित्रपटांवरील प्रेम कमी झालेले नाही. मात्र, आता त्यांनी वेगळा निर्णय घेतला आहे. त्यांनी थेट देश सोडला आहे.

करिअरच्या शिखरावर बॉलिवूडपासून दूर गेले बिग बी

अमिताभ बच्चन यांनी १९६९ मध्ये ‘सात हिंदुस्तानी’ या चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली, जी आज ५६ वर्षांनंतरही सुरू आहे. पण त्यांच्या कारकिर्दीत एक असा क्षण आला, जेव्हा त्यांनी अभिनय सोडला आणि भारतही सोडला होता. त्यावेळी सुमारे दोन वर्षे ते भारतापासून ६,८०० किलोमीटर दूर स्वित्झर्लंडमध्ये एकटे राहिले होते. हा खुलासा त्यांचे मित्र आणि दिग्गज अभिनेते रजनीकांत यांनी केला होता. वाचा: एकत्र फिरले, नूडल्स-आईस्क्रीम खाल्ले; शारीरिक संबंधानंतर बॉयफ्रेंडनेच जे केलं ते पाहून पोलिसांनाही बसला धक्का

अमिताभ आणि रजनीकांत यांचे मैत्रीचे नाते

अमिताभ आणि रजनीकांत हे एकमेकांच चांगले मित्र आहेत. रजनीकांत अमिताभ यांचा खूप आदर करतात आणि त्यांना आपले आदर्श मानतात. तर दक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांच्याबद्दल अमिताभ यांच्या मनातही खूप प्रेम आहे. दोन्हीही दिग्गजांनी मोठ्या पडद्यावर एकत्र काम केले आहे.

२०२४ मध्येही दोघे मोठ्या पडद्यावर एकत्र दिसले होते. त्यांनी ‘वेट्टैयन’ या चित्रपटात एकत्र काम केले, जो १० ऑक्टोबर २०२४ रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान एका मुलाखतीत रजनीकांत यांनी अमिताभ यांचे एक मोठे रहस्य उघड केले. ते म्हणाले, “आपल्या कारिअरच्या शिखरावर, जेव्हा ते ५७-५८ वर्षांचे होते. तेव्हा अमितजी कंटाळले होते.”

दोन वर्षे स्वित्झर्लंडमध्ये एकटे राहिले

बिग बी हे बॉलिवूडला वैतागले होते आणि त्यामुळे त्यांनी आपला देशही सोडला. त्यानंतर ते परदेशात गेले. रजनीकांत पुढे म्हणाले, “त्यांनी स्वित्झर्लंडमध्ये एक अपार्टमेंट खरेदी केले आणि तिथे एकटे राहू लागले.” बिग बी तिथे राहून आपली सर्व कामे स्वतः करायचे. सुमारे दोन वर्षे परदेशात राहिल्यानंतर ते पुन्हा भारतात परतले.

मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.