AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जेव्हा एक मार्ग बंद होतो..; अवघ्या 152 भागांमध्ये गुंडाळली मालिका, अमोल कोल्हेंची भावूक पोस्ट

अमोल कोल्हे यांनी 'मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले' ही मालिका बंद होण्याच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर एक अत्यंत भावूक व्हिडीओ पोस्ट केला आहे. येत्या 14 जूनपासून ही मालिका बंद होणार आहे. त्यावर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.

जेव्हा एक मार्ग बंद होतो..; अवघ्या 152 भागांमध्ये गुंडाळली मालिका, अमोल कोल्हेंची भावूक पोस्ट
अमोल कोल्हे आणि मधुराणी प्रभुलकरImage Credit source: Instagram
| Updated on: Jun 05, 2026 | 9:23 AM
Share

स्टार प्रवाह वाहिनीवर अवघ्या काही महिन्यांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आलेली ‘मी सावित्रीबाई ज्योतीराव फुले’ ही मालिका अचानक बंद करण्यात येत आहे. या मालिकेचा टीआरपी कमी असल्याने वाहिनीने ती बंद करण्याचा निर्णय घेतल्याचं समजतंय. टीआरपीच्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी या वाहिनीने नुकतीच आठ नवीन मालिकांची घोषणा केली. त्याचवेळी अमोल कोल्हे आणि मधुराणी प्रभुलकर यांच्या मुख्य भूमिका असलेली ‘मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले’ ही मालिका अवघ्या 152 भागांमध्ये गुंडाळली. यासंदर्भात आता अमोल कोल्हे यांनी सोशल मीडियावर अत्यंत भावूक पोस्ट लिहिली आहे.

अमोल कोल्हे यांनी एक व्हिडीओ शेअर केला असून त्यात सुरुवातीला मालिकेतील एक दृश्य पहायला मिळतंय. ‘सगळंच संपलंय सावित्री..’ असं ज्योतिराव फुले सावित्रीबाईंना म्हणतात. तेव्हा सावित्रीबाईंच्याही डोळ्यात अश्रू तरळतात. ‘जेव्हा एक मार्ग बंद होतो तेव्हा कुठेतरी नवी सुरुवात खुणावत असते. थोडंसं थांबणं आवश्यक असतं. जरा निवांत होणं गरजेचं असतं. पुन्हा नव्याने गणितं मांडण्यासाठी, नव्या जोमाने झेपावण्यासाठी,’ असं कॅप्शन त्यांनी या व्हिडीओला दिलं आहे. मालिका संपतेय पण गोष्ट सुरूच राहणार, असंही अमोल कोल्हेंनी या व्हिडीओमध्ये म्हटलंय. व्हिडीओत पुढे ते गाईंसोबत निवांत वेळ घालवताना, त्यांना कुरवाळताना दिसत आहेत. अमोल कोल्हेंच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. ही मालिका बंद करू नका, अशी विनंती अनेकांनी केली आहे.

अमोल कोल्हेंचा व्हिडीओ-

View this post on Instagram

A post shared by Dr. Amol Kolhe (@amolrkolhe)

‘सावित्रीबाई फुले’ मालिका म्हणजे आपल्या गौरवशाली इतिहासाचा आरसा आहे. आजच्या पिढीला याची खूप गरज आहे. ही मालिका बंद न करता पुढे चालू ठेवावी, ही नम्र विनंती,’ अशी मागणी एकाने केली. तर ‘शेवटी नेहमी सत्याचा विजय होतो. आपण करत असलेलं कार्य हे आज घरघरात गेलं आहे. साऊ जोतीचे विचार कधीच संपणार नाही, उलट ती ज्योत अजून झळकत राहील,’ असं दुसऱ्याने लिहिलं आहे. ‘समाजाला सकारात्मक विचार देणाऱ्या मालिका दुर्मिळ असतात. मी सावित्रीबाई जोतीराव फुले ही त्यापैकीच एक आहे. अशा प्रेरणादायी कथा थांबू नयेत, मालिका सुरू ठेवा,’ अशी विनंती नेटकऱ्यांनी केली आहे.

14 जून 2026 पासून ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. टीआरपीचं कारण देत अवघ्या पाच महिन्यात ही मालिका बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या मालिकेच्या जागी ‘सुना येती घरा’ ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Follow Us
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात..
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात दिलासा
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे जरांगे पाटलांना...
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे मनोज जरांगे पाटील यांना आवाहन
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन...
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन; रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या नेतृत्त्वात...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला नेत्याचं मोठं विधान
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीट...
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीटद्वारे केला खुलासा!
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर... जरांगे पाटलांची प्रतिक्रिया...
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर...  आंदोलनाविषयी मनोज जरांगे पाटलांची मोठी प्रतिक्रिया!
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं...
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची जरांगेंवर...
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची मनोज जरांगेंवर अजब कविता