VIDEO : अलग मेरा ये रंग है… अमृता फडणवीसांचं नवं गाणं रिलीज

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचं नवं गाण नुकतंच रिलीज करण्यात (Amruta Fadnavis New Song) आले.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 14:03 PM, 8 Mar 2020
VIDEO : अलग मेरा ये रंग है... अमृता फडणवीसांचं नवं गाणं रिलीज

मुंबई : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचं नवं गाण नुकतंच रिलीज करण्यात (Amruta Fadnavis New Song) आले. अलग मेरा रंग है..असे गाण्याचे बोल आहेत. अॅसिड हल्ल्यातील पीडित महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी हे गाणं गायलं आहे. सध्या सोशल मीडियावर अमृता फडणवीसांचं हे गाणं चागलंच गाजत आहे.

“अलग मेरा ये रंग है, मेरी खुदसेही जंग है, जीत जाऊ ऐ खुदा, अगर तु मेरे संग है,” असे या गाण्याचे बोल (Amruta Fadnavis New Song) आहेत. अॅसीड पीडितांसोबत अमृता फडणवीसांचं हे गाणं चित्रीत झालं आहे. अवघ्या 4 तासांपूर्वी हे गाणं  रिलीज झालं आहे. हे गाणं आतापर्यंत 5 लाख, 92 हजार 298 लोकांनी ऐकले आहे.

पहाटेच्या शपथविधीवर अमृता फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया

जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने अमृता फडणवीसांचे हे नवी गाणं रिलीज झालं आहे. Face can be destoryed but not the soul अशी या गाण्याची टॅगलाईन आहे. म्हणजेच “केवळ चेहरा नष्ट होऊ शकतो पण मन कधीही नाही,” असे या टॅगलाईनवरुन स्पष्ट करायचं आहे. या गाण्याचे पोस्टरही अमृता फडणवीसांनी पोस्ट केलं होतं.

अमृता फडणवीसांनी संगीत क्षेत्रातून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. अमृता फडणवीस नेहमी कुठल्या ना कुठल्या कारणामुळे सोशल मीडियावर चर्चेत असतात. या गाण्यामुळे केवळ अॅसिड हल्ल्यातील पीडित महिला नव्हे, तर प्रत्येक महिला या गाण्यामुळे प्रोत्साहित होईल, अशी प्रतिक्रिया अमृता फडणवीस यांनी (Amruta Fadnavis New Song) दिली.

पाहा व्हिडीओ :