माझ्यासाठी देवेंद्रनी अनेक गोष्टी सहन केल्या : अमृता फडणवीस

"देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी माझ्यासाठी अनेक गोष्टी सहन केल्या, ते नेहमी माझ्या पाठीशी उभे राहिले", असं अमृता फडणवीस म्हणाल्या.

माझ्यासाठी देवेंद्रनी अनेक गोष्टी सहन केल्या : अमृता फडणवीस

मुंबई : राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस (Amruta Fadnavis Special Interview) यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने ‘टीव्ही 9 मराठी’शी खास संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक राजकीय विषयांवर त्यांची मतं व्यक्त केली. शिवाय, “देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी माझ्यासाठी अनेक गोष्टी सहन केल्या, ते नेहमी माझ्या पाठीशी उभे राहिले”, असंही त्या म्हणाल्या.

बांगड्या भरण्याबाबतच्या (Amruta Fadnavis Special Interview) वक्तव्यावरुन देवेंद्र फडणवीस आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्यात चांगलाच वाद रंगला होता. या वादावर अमृता फडणवीस यांनी ट्विटरवरुन आदित्य ठाकरेंवर टीकाही केली होती.

हेही वाचा : आधी आदित्य ठाकरेंचा ‘रेशीम कीडा’ उल्लेख, आता रश्मी ठाकरेंबद्दल अमृता फडणवीस म्हणतात….

याच मुद्यावर बोलताना अमृता फडणवीस म्हणाल्या, “देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या माणसाला ज्यांनी महिला सक्षमीकरणासाठी कायम आवाज उठवला, अशा माणसाला महिलांची माफी मागायला सांगितली, हे मला पटलं नाही. देवेंद्रनी माझ्यामुळे अनेक गोष्टी सहन केल्या, तरी ते नेहमी माझ्या पाठीशी उभे असतात.”

काय आहे प्रकरण?

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला उद्देशून बांगड्यांवरुन केलेल्या वक्तव्याला पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी उत्तर दिलं होतं. देवेंद्र फडणवीस यांनी माफी मागावी अशी विनंती आदित्य ठाकरे यांनी केली आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या आंदोलनादरम्यान आझाद मैदानातील भाषणावेळी शिवसेनेवर हल्लाबोल केला होता. वारिस पठाण यांच्या वक्तव्याचा निषेध करताना, ‘शिवसेनेने बांगड्या घातल्या असतील, आम्ही नाही असं म्हटलं होतं’. त्याला आदित्य ठाकरे यांनी उत्तर दिलं होतं.

आदित्य ठाकरे यांनी ट्विट करुन माफी मागण्याची विनंती केली होती. “देवेंद्र फडणवीसजी, सहसा मी प्रत्युत्तर देत नाही. कृपया बांगड्यांबाबतच्या विधानाबाबत माफी मागा. सर्वात शक्तिशाली असा महिलावर्ग बांगड्या परिधान करतो. राजकारण चालूच राहील, पण ही मानसिकता बदलायला हवी. किमान माजी मुख्यमंत्र्यांकडून तरी अशी अपेक्षा नाही” असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं होतं.

अमृता फडणवीसांचं आदित्य ठाकरेंना उत्तर

‘रेशमी किड्याला आयुष्यातील ‘उपहास’ कधीच समजणार नाही, कारण पूर्वजांनी विणलेल्या सुखासीन ‘रेशमी’ आयुष्याचा उपभोग घेतच त्यांची भरभराट होते. देवेंद्र फडणवीसजी, तुमच्या संघर्षाचा आणि भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या मेहनतीचा अभिमान वाटतो’, अशा आशयाचं वक्तव्य अमृता फडणवीस यांनी आदित्य ठाकरेंच्या ट्वीटला कोट करत केलं होतं. यामध्ये आदित्य ठाकरे, पती देवेंद्र फडणवीस आणि भाजपला (Amruta Fadnavis Special Interview) त्यांनी मेन्शन केलं आहे.

संबंधित बातम्या :

पहाटेच्या शपथविधीवर अमृता फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया

इंदोरीकर महाराजांबद्दल मला खूप आदर, पण… : अमृता फडणवीस

बाळासाहेबांचं खरं स्वप्न जमिनीवर येऊन पूर्ण करा : अमृता फडणवीस

बांगड्या वाद : आधी आदित्य ठाकरेंचं फडणवीसांना उत्तर, आता अमृता फडणवीसांचा पलटवार

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *