इंदोरीकर महाराजांबद्दल मला खूप आदर, पण… : अमृता फडणवीस

इंदोरीकर महाराजांबद्दल मला खूप आदर, पण... : अमृता फडणवीस

माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी निवृत्ती महाराज इंदोरीकर यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

|

Mar 07, 2020 | 4:25 PM

मुंबई : माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी निवृत्ती महाराज इंदोरीकर यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे (Amruta Fadnavis on Indorikar Maharaj). इंदोरीकर महाराजांबद्दल मला खूप आदर आहे. त्यांनी दिलेले सल्ले जीवनात उपयोगी पडतात. मात्र, इंदोरीकर महाराजांसारख्या लोकांनी महिलांचा आदर कमी होईल असं कोणतंही विधान करू नये, असं मत अमृता फडणवीस यांनी व्यक्त केलं. त्या टीव्ही 9 मराठीला दिलेल्या एक्स्क्लुझिव्ह मुलाखतीत बोलत होत्या. यात त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं.

अमृता फडणवीस म्हणाल्या, “लोकांवर प्रभाव असणाऱ्या लोकांनी आपल्या मतांचा लोकांच्या मनावर मोठा प्रभाव होतो हे लक्षात घ्यायला हवं. मी इंदोरीकर महाराज यांचे काही व्हिडीओ पाहिले आहेत. यात ते महिलांना काही प्रमाणात कमी लेखतात असं वाटलं. मला इंदोरीकर महाराजांबद्दल खूप आदर आहे. त्यांनी दिलेले सल्ले जीवनात उपयोगी पडतात. मात्र, त्यांच्यासारख्या लोकांनी महिलांचा आदर कमी होईल, असं कोणतंही विधान करु नये.”

अमृता फडणवीस यांनी आपल्या मुलाखतीत विविध विषयांवर आपली मतं व्यक्त केली. यावेळी त्यांनी आदित्य ठाकरेंवर केलेल्या टीकेवर आपण आजही ठाम असल्याचंही स्पष्ट केलं. देवेंद्र फडणवीस यांनी महिला सक्षमीकरणासाठी कायम आवाज उठवला. अशा माणसाला आदित्य ठाकरे यांनी महिलांची माफी मागायला सांगितलं हे मला पटलं नाही, असंही अमृता फडणवीस यांनी नमूद केलं.

शिवसेनेचे नेते किशोर तिवारी यांनी भैय्याजी जोशी यांना लिहिलेल्या पत्रावरही अमृता फडणवीस यांनी आपलं मत व्यक्त केलं. त्या म्हणाल्या, “प्रत्येक स्त्री वेगळी आहे. मला जे वाटतं ते मी बोलते. मी यापुढे देखील मला वाटेल ते बोलत राहिल. टीकाकारांना मी धन्यवाद देते. त्यांन मला आणखी सशक्त बनवलं. देवेंद्र फडणवीस यांना माझ्यामुळे अनेक गोष्टी सहन केल्या आहेत. मात्र, तरीही ते माझ्या पाठीशी नेहमीच उभे असतात.”

सुप्रिया सुळे आणि पंकजा मुंडे यांच्यामध्ये महिला मुख्यमंत्री होण्याचं ‘पोटेन्शियल’ आहे, असल्याचंही मत अमृता फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केलं.

नेमकं काय म्हणाले होते इंदोरीकर महाराज?

इंदोरीकर महाराजांनी आपल्या एका कीर्तनात मुलगा होण्यासाठी आणि मुलगी होण्यासाठी ठराविक दिवशी शारीरिक संबंध ठेवण्याबाबत वक्तव्य केल्याचा व्हिडीओ समोर आला होता. या व्हिडीओत इंदोरीकर म्हणाले, “स्त्री संग सम तिथीला झाला तर मुलगा होतो, विषम तिथीला झाला तर मुलगी होते आणि स्त्री संग अशीव वेळी झाला तर होणारी संतती रांगडी, बेवडी आणि खानदान मातीत घालणारी होते.”

संबंधित बातम्या  

पुत्रप्राप्तीसंदर्भात ‘ऑड-इव्हन’चं वक्तव्य भोवलं, पीसीपीएनडी नोटीससोबतच इंदुरीकरांचं कीर्तनही रद्द 

आखाडा : सम-विषम तारखेवर लिंग कसं ठरतं? लोकांना हसवणारे इंदुरीकर महाराज अडचणीत

इंदुरीकर महाराजांविरोधात गुन्हा दाखल होण्याची शक्यता

इंदुरीकर महाराजांचा वाढदिवस सोहळा, सेना, भाजप, राष्ट्रवादी, काँग्रेसचे नेते एकाच रथात

निवडणूक लढवण्याच्या चर्चेवर इंदुरीकर महाराजांची कीर्तनातून टोलेबाजी

Amruta Fadnavis on Indorikar Maharaj

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें