विकी जैनने सनासोबत नॅशनल टीव्हीवर केली अशी गोष्ट; व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी केली अंकिताची कीव

अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि विकी जैन या जोडीचा दररोज नवीन ड्रामा बिग बॉसच्या घरात पहायला मिळतोय. नुकताच लाइव्ह फीडमधील विकीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये सना रईस खान आणि त्याच्यातील जवळीक पाहून नेटकरी भडकले आहेत.

विकी जैनने सनासोबत नॅशनल टीव्हीवर केली अशी गोष्ट; व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी केली अंकिताची कीव
अंकिता लोखंडे, विकी जैनImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Nov 22, 2023 | 10:21 AM

मुंबई : 22 नोव्हेंबर 2023 | ‘बिग बॉस 17’मध्ये अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि तिचा पती विकी जैन चांगलेच चर्चेत आहेत. दररोज या दोघांमध्ये काहीतरी नवीन ड्रामा पहायला मिळतो. बिग बॉसच्या घरात एकीकडे अंकिताने प्रेग्नंसीची टेस्ट केली. तर दुसरीकडे नील भट्टने विकीला टक्कल असल्याचा खुलासा केला. त्यानंतर आता विकी एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. ज्यामुळे त्याच्यावर नेटकऱ्यांकडून प्रचंड टीका होतेय. बिग बॉसच्या घरात निराश असलेल्या सना रईस खानला विकी मानसिक आधार देताना दिसला. मात्र हा आधार देताना त्याने ज्यापद्धतीने तिचा हात धरला होता, त्यावरून नेटकरी भडकले आहेत. सोशल मीडियावर विकी आणि सनाचा 59 सेकंदांचा हा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

या व्हिडीओमध्ये सना अनेकदा विकीचा हात पकडण्याचा प्रयत्न करते आणि विकी तिच्याशी उत्साहाने बोलत असतो. लाइव्ह फिडमधील हा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. बिग बॉसच्या घरात विकीने अनेकदा पत्नी अंकिताचा अपमान केला, तिच्यावर ओरडला होता. पत्नीला नीट वागणूक न दिल्याने आधीच त्याच्यावर नेटकरी नाराज होते. आता त्याचा आणि सनाचा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांनी टीकेची झोड उठवली आहे.

हे सुद्धा वाचा

‘हे खूपच विचित्र आहे. हा तोच विकी आहे, ज्याला टास्कदरम्यान अंकिताने चिंटूसोबत डान्स केल्याने समस्या होती’, असं एकाने लिहिलं. तर ‘मला वाटत नाही की तो तिचा हात पकडण्याचा प्रयत्न करतोय. पण सना सतत त्याचा हात आपल्या हातात घेण्याचा प्रयत्न करतेय’, असं दुसऱ्या युजरने म्हटलंय. बिग बॉसच्या घरात जेव्हा अंकिताला मानसिक आधाराची गरज होती, तेव्हा मात्र विकीने तिची साथ दिली नाही, असाही मुद्दा काहींनी उपस्थित केला. ‘अंकिताचा पती काहीच कामाचा नाही’, अशा शब्दांत नेटकऱ्यांनी टीका केली.

पहा व्हिडीओ

बिग बॉसच्या घरात अंकिता आणि विकी यांच्यात सतत भांडणं झालेली पहायला मिळाली. या दोघांच्या भांडणांबद्दल अभिनेत्री काम्या पंजाबी, देवोलीना भट्टाचार्जी यांनीसुद्धा प्रतिक्रिया दिली होती. काम्याने तिच्या पोस्टमध्ये लिहिलं होतं, ‘मला अंकिता खरंच आवडते पण असं वाटतंय की तिने या शोमध्ये यायला पाहिजे नव्हतं. पतीसोबत तर नक्कीच नाही. तिला आणि विकीला फार उशीर होण्याआधी हा खेळ समजू दे अशी आशा करते.’

‘गोपी बहू’ ऊर्फ देवोलीना हिनेसुद्धा एक्सवर (ट्विटर) पोस्ट लिहित विकीवर निशाणा साधला होता. ‘पती-पत्नीमध्ये मतभेद होतच असतात. परंतु दररोज पत्नीचा अपमान करणे, तिला वाईट वागणूक देणं हे अजिबात मनोरंजक नाही आणि हा खेळाचा भागसुद्धा होऊ शकत नाही’, असं तिने म्हटलं होतं.

Non Stop LIVE Update
राहुल गांधींची ट्रेन कशी? त्याला फक्त इंजिन अन् डब्बे..फडणवीसांची टीका
राहुल गांधींची ट्रेन कशी? त्याला फक्त इंजिन अन् डब्बे..फडणवीसांची टीका.
कोल्हेंचं अजित दादांच्या टीकेला प्रत्युत्तर, कार्यसम्राट की नटसम्राट..
कोल्हेंचं अजित दादांच्या टीकेला प्रत्युत्तर, कार्यसम्राट की नटसम्राट...
शरद पवार महायुतीत येणार? 4 जूननंतर... प्रफुल्ल पटेलांचं मोठं वक्तव्य
शरद पवार महायुतीत येणार? 4 जूननंतर... प्रफुल्ल पटेलांचं मोठं वक्तव्य.
नारायण राणे वेडा माणूस, त्याचा चेहरा..., ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
नारायण राणे वेडा माणूस, त्याचा चेहरा..., ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
... हा नारायण राणेंचा अपमान नाही का? वैभव नाईक यांचा उपरोधीक टोला
... हा नारायण राणेंचा अपमान नाही का? वैभव नाईक यांचा उपरोधीक टोला.
73 वर्षीय तरूण उमेदवार लोकसभेच्या रिंगणात, मी निवडून आलो तर...
73 वर्षीय तरूण उमेदवार लोकसभेच्या रिंगणात, मी निवडून आलो तर....
जरांगे पाटील 4 जूनपासून उपोषणाला बसणार? मराठा आरक्षणासाठी दिली डेडलाईन
जरांगे पाटील 4 जूनपासून उपोषणाला बसणार? मराठा आरक्षणासाठी दिली डेडलाईन.
तुम्हाला कार्यसम्राट खासदार पाहिजे की नटसम्राट..दादांची कोल्हेंवर टीका
तुम्हाला कार्यसम्राट खासदार पाहिजे की नटसम्राट..दादांची कोल्हेंवर टीका.
किडनीत शिंदे गट, लिव्हरमध्ये...निंबाळकरांचा मल्हार पाटलांना खोचक टोला
किडनीत शिंदे गट, लिव्हरमध्ये...निंबाळकरांचा मल्हार पाटलांना खोचक टोला.
दोन दिवस प्रतीक्षा, नाहीतर सांगलीतून विशाल पाटील अपक्ष म्हणून लढणार?
दोन दिवस प्रतीक्षा, नाहीतर सांगलीतून विशाल पाटील अपक्ष म्हणून लढणार?.