AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पती विकी जैनवर अंकिताला संशय; म्हणाली “घरातील सर्व CCTV फुटेज तपासून..”

बिग बॉसच्या घरात 100 दिवस राहिल्यानंतर विकी जैनचा प्रवास संपला. बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर लगेच त्याने मैत्रिणींसोबत पार्टी केली. अंकिताने विकीवर संशय व्यक्त करत म्हटलंय की घरी गेल्यानंतर ती सर्वांत आधी सीसीटीव्ही फुटेज तपासणार आहे.

पती विकी जैनवर अंकिताला संशय; म्हणाली घरातील सर्व CCTV फुटेज तपासून..
Vicky Jain and Ankita Lokhande Image Credit source: Instagram
| Updated on: Jan 25, 2024 | 10:39 AM
Share

मुंबई : 25 जानेवारी 2024 | ‘बिग बॉस 17’ हा टेलिव्हिजनवरील सर्वांत लोकप्रिय शो लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. येत्या 28 जानेवारी रोजी बिग बॉसचा ग्रँड फिनाले पार पडणार आहे. मुनव्वर फारुकी, मन्नारा चोप्रा, अभिषेक कुमार, अंकिता लोखंडे आणि अरुण माशेट्टी या पाच जणांमध्ये सध्या विजेतेपदासाठी चुरस रंगली आहे. बिग बॉसच्या घरात 100 दिवस राहिल्यानंतर विकी जैनचा प्रवास नुकताच संपला. शोमध्ये एकत्र असतानाच विकी जैन आणि अंकिता लोखंडे यांच्यात सतत भांडणं व्हायची. आता विकीने बिग बॉसचं घर सोडल्यानंतर अंकिताने थेट त्याच्यावर संशय व्यक्त केला आहे. नुकत्याच एका एपिसोडमध्ये अंकिता म्हणाली की बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर सर्वांत आधी ती पाच दिवसांचे सीसीटीव्ही फुटेज तपासणार आहे.

विकी जेव्हा बिग बॉसच्या घरातून बाहेर पडत होता, तेव्हा अंकितानं त्याला बजावलं होतं की एकटा-एकटाच पार्टी करू नकोस. बिग बॉसच्या नुकत्याच एका एपिसोडमध्ये पहायला मिळालं की जेव्हा अंकिता, मुनव्वर, मन्नारा, अभिषेक आणि अरुण हे बिग बॉसच्या अँथम साँगवर डान्स केल्यानंतर बसतात, तेव्हा अंकिताला विकीची आठवण येते. तेव्हा अभिषेक तिला चिडवत म्हणतो, “यावेळी विकी भाई झोपायला जात असेल का?” त्यावर अंकिता त्याला म्हणते, “मला असं वाटतंय की तो पार्टी करत असेल.” तेव्हा मन्नारा आणि अभिषेक तिला सांगितात की विकी भाईने तर त्याच्या सर्व मित्रमैत्रिणींना घरी पार्टीसाठी बोलावलं आहे. हे ऐकून अंकिता चिडून म्हणते, “माझ्या घरी येण्याची परवानगी कोणालाच नाही. मी घरी जाऊन सीसीटीव्हीची पूर्ण रेकॉर्डिंग तपासेन. या पाच दिवसांत घरी कोण कोण आलं होतं, ते मी पाहीन.” अंकिताचं हे बोलणं ऐकून मन्नाराला आश्चर्यचकीत होते. तेव्हा अंकिता तिची बाजू सावरत मन्नारा म्हणते, “जर असं काही घडलं तरच, जर मला संशय आला तरच मी सीसीटीव्ही फुटेज तपासेन.”

View this post on Instagram

A post shared by ColorsTV (@colorstv)

बिग बॉसच्या घरात विकी आणि अंकिता सतत एकमेकांसोबत भांडताना दिसले. विकीची आई जेव्हा बिग बॉसच्या घरात गेली, तेव्हा त्यांनीसुद्धा सून अंकितालाच बरंवाईट सुनावलं होतं. यावरून सोशल मीडियावर बरीच टीका झाली होती. इतकंच नव्हे तर करण जोहरनेही विकीला त्यावरून फटकारलं होतं. बिग बॉसमुळे अंकिता आणि विकीचा घटस्फोट होईल की काय, असा प्रश्न चाहत्यांच्या मनात निर्माण झाला.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.