First Look : अल्लू सिरीशकडून प्री-लुक पोस्टर शेअर करत आगामी चित्रपटाची घोषणा!

बीसीडीनंतर दोन वर्षांनी अल्लू सिरीशनं (Allu Sirish) आपल्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. (Announcing the upcoming movie by sharing a pre-look poster from Allu Sirish!)

  • Updated On - 2:32 pm, Fri, 28 May 21
First Look : अल्लू सिरीशकडून प्री-लुक पोस्टर शेअर करत आगामी चित्रपटाची घोषणा!

मुंबई : एबीसीडीनंतर दोन वर्षांनी अल्लू सिरीशनं (Allu Sirish) आपल्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. गुरुवारी प्रदर्शित करण्यात आलेल्या या प्री-लुक पोस्टरनं प्रेक्षकांच्या उत्साहाला उधाण आलं आहे. काही वेळातच चाहत्यांद्वारे #Sirish6 ट्रेंड होण्यास सुरुवात झाली आहे.

राकेश ससी यांंचं दिग्दर्शन

चित्रपटाच्या या प्री-लुकमध्ये एका गहन दृश्यात एक युगुल दिसतं आहे, सोबतच या पोस्टरमध्ये कलाकारांची नावं आहेत, टॉलीवुड पोस्टरचा विचार करता, हा एक रेफ्रेशिंग अनुभव आहे. चित्रपटात अल्लू सिरीश (Allu Sirish) सोबत अनु इमैनुएल (Anu Emmanuel) असून ‘विजेता’ (Vijetha) फेम राकेश ससी (Rakesh Sasi) यांचे दिग्दर्शन आहे. जीए2 पिक्चर्स (GA2 Pictures) द्वारा निर्मित, या चित्रपटाला अल्लू अरविंद (Allu Aravind) यांनी प्रस्तुत केले आहे.

पाहा पोस्टर

 

View this post on Instagram

 

A post shared by Allu Sirish (@allusirish)

तेलुगु आणि मल्याळम चित्रपटातील अल्लू सिरीशची कामगिरी

अल्लू सिरीश, नुकताच एका गाजलेल्या हिंदी सिंगल व्हिडीओ ‘विलायती शारब’ मध्ये दिसला होता जे काही वेळातच प्रचंड व्हायरल झाले आणि बघता बघता त्याने 100 मिलियन व्ह्यूजचा आकडा पार केला. चाहत्यांच्या प्लेलिस्टमध्ये ते अजुनही आपली जागा कायम ठेवून आहे. एबीसीडीशिवाय अल्लू सिरीशचा आणखी एक चित्रपट ओक्का क्षनम (Okka Kshanam) हिंदीत ‘शूरवीर’ या नावाने डब करण्यात आला आहे. तेलुगु आणि मल्याळम चित्रपटातील अल्लू सिरीशची कामगिरी चाहत्यांच्या मनात घर करून आहे आणि म्हणूनच त्याचे चाहते त्याच्या नव्या चित्रपटाची आतुरतेने वाट पहात आहेत. या प्री-लुक पोस्टरने तर चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचवली आहे.

संबंधित बातम्या

Lookalike : धकधक गर्लच्या या 5 कार्बन कॉपीज, एक तर हॉलिवूडमधील मोठा चेहरा

Photo : 17 साल बाद… फ्रेंड्सचं रियुनियन, पाहा कलाकारांचं बदललेलं रुप

Photo : TRP च्या यादीतून ‘इंडियन आयडॉल’ आऊट, ‘ये रिश्ता क्या कहलाता हैं’ची बाजी

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI