AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kirron Kher | किरण खेर यांना कोरोनाची लागण; ट्विट करत प्रकृतीबाबत दिली माहिती

बॉलिवूडशिवाय किरण खेर यांनी टीव्ही इंडस्ट्रीमध्येही आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांनी ‘प्रतिमा’, ‘गुब्बारे’, ‘इसी बहाने’ यांसारख्या मालिकांमध्ये काम केलं. या व्यतिरिक्त त्यांनी ‘इंडियाज गॉट टॅलेंट’ या शोच्या परीक्षकपदाची धुराही सांभाळली आहे.

Kirron Kher | किरण खेर यांना कोरोनाची लागण; ट्विट करत प्रकृतीबाबत दिली माहिती
Kirron KherImage Credit source: Facebook
| Updated on: Mar 21, 2023 | 8:13 AM
Share

मुंबई : ज्येष्ठ अभिनेत्री किरण खेर यांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. त्यांनी ट्विट करत चाहत्यांना याविषयीची माहिती दिली. 20 मार्च रोजी किरण खेर यांनी ट्विटरवर आपल्या प्रकृतीबाबतची माहिती दिली. त्याचप्रमाणे त्यांच्या संपर्कात आलेल्यांना कोरोना चाचणी करण्याचं आवाहन त्यांनी केलं. कोरोनाची लक्षणं दिसू लागल्यानंतर त्यांनी चाचणी केली. ही चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांनी हे ट्विट केलं. ‘मी कोविड-19 पॉझिटिव्ह आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्यांनी लगेचच आपली कोविड-19 ची चाचणी करून घ्यावी’, असं त्यांनी लिहिलंय.

किरण खेर यांच्या या पोस्टनंतर चाहते त्यांच्या प्रकृतीविषयी काळजी व्यक्त करत आहेत. अनेकांनी त्यावर कमेंट करत किरण यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना केली आहे. याआधी 2021 मध्ये किरण खेर यांना रक्ताचा कर्करोग झाला होता. मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात त्यांच्यावर उपचार पार पडले. मल्टिपल मायलोमा या रक्ताच्या कर्करोगाचं त्यांना निदान झालं होतं. यावर पूर्ण उपचार घेत त्यांनी यशस्वीरित्या मात केली.

कर्करोगावरील उपचार पूर्ण झाल्यानंतर त्यांनी बरेच महिने आराम करण्याला प्राधान्य दिलं. पूर्णपणे बऱ्या झाल्यानंतरच त्यांनी छोट्या पडद्यावर कमबॅक केलं. ‘इंडियाज गॉट टॅलेंट’ या शोमध्ये या परीक्षक म्हणून पुन्हा सक्रिय झाल्या होत्या. किरण खेर या उत्तम कलाकारच नाहीत, तर चांगल्या राजकारणीदेखील आहेत.

पंजाबमध्ये जन्मलेल्या किरण खेर यांनी चंडीगडमधून पदवी संपादन केली. अभ्यासादरम्यान किरण यांचा कल अभिनयाकडे होता. पदवीनंतर त्या चंदीगडमधील थिएटरमध्ये दाखल झाल्या. त्यानंतर त्यांनी आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात ‘आसरा प्यार’ या पंजाबी चित्रपटातून केली. यानंतर त्यांनी ‘सरदारी बेगम’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं.

किरण खेर यांनी बर्‍याच चित्रपटात आईची भूमिका साकारली आहे. संजय लीला भन्साळीच्या ‘देवदास’मध्ये किरणने ऐश्वर्या रायच्या आईची भूमिका साकारली होती. या पात्राने त्यांना बॉलिवूडमध्ये एक वेगळी ओळख मिळवून दिली. यानंतर, ‘वीर-झारा’, ‘ओम शांती ओम’, ‘हम-तुम’, ‘रंग दे बसंती’ अशा बर्‍याच चित्रपटांमध्ये त्या आईच्या भूमिकेत दिसल्या आणि प्रत्येक वेळी प्रेक्षकांकडून त्यांना खूप प्रेम मिळालं.

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.