AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विवाहित असतानाही किरणच्या प्रेमात पडले अनुपम खेर; वाचा त्यांची लव्हस्टोरी!

अभिनेते अनुपम खेर (Anupam Kher) आणि किरण खेर (Kirron Kher) यांची प्रेमकथा बॉलिवूड (Bollywood) चित्रपटाच्या कथेपेक्षा कमी नाही. जेव्हा, दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले, तेव्हा दोघंही आधीच विवाहित होते.

विवाहित असतानाही किरणच्या प्रेमात पडले अनुपम खेर; वाचा त्यांची लव्हस्टोरी!
Anupam Kher and Kirron KherImage Credit source: Instagram
| Updated on: Mar 07, 2022 | 7:30 AM
Share

अभिनेते अनुपम खेर (Anupam Kher) आणि किरण खेर (Kirron Kher) यांची प्रेमकथा बॉलिवूड (Bollywood) चित्रपटाच्या कथेपेक्षा कमी नाही. जेव्हा, दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले, तेव्हा दोघंही आधीच विवाहित होते. आपापल्या लग्नात नाखूष किरण आणि अनुपम खेर यांना एकमेकांमध्ये आनंद दिसला आणि दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. किरण आणि अनुपम यांची चंदीगडमध्ये भेट झाली होती. थिएटरदरम्यान दोघंही एकमेकांचे खूप चांगले मित्र झाले. दोघांनाही एकमेकांबद्दल सर्व काही माहित होतं, पण हे माहित नव्हतं की ही मैत्री नंतर प्रेमात बदलणार आहे. आपलं नशीब आजमावण्यासाठी किरण 1980 मध्ये मुंबईत आल्या होत्या. यावेळी त्यांची भेट व्यावसायिक गौतम बेरीशी झाली आणि त्या त्यांच्या प्रेमात पडल्या. दोघांचं लग्न झालं आणि त्यांना मुलगा झाला. किरण आणि गौतमच्या मुलाचं नाव ‘सिकंदर’ आहे.

गौतम आणि किरणचा प्रेम विवाह होता, पण या नात्यात त्या खुश नव्हत्या. त्यांनी आपलं थिएटर चालू ठेवलं. दुसरीकडे अनुपम खेर यांचंही लग्न झाले होतं आणि तेही आपल्या लग्नात आनंदी नव्हते. एकदा अनुपम खेर आणि किरण कोलकात्यात एका नाटकासाठी गेले होते. या भेटीदरम्यान दोघांनीही एकमेकांविषयी प्रेम अनुभवलं. प्रेमाची जाणीव झाल्यानंतर अनुपम खेर यांनी मनातलं बोलण्यात जास्त वेळ घालवला नाही. एक दिवस ते किरणच्या घरी गेले आणि त्यांना सांगितलं की, मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे. तेव्हाच अनुपम यांनी किरणबद्दलचं आपलं प्रेम व्यक्त केलं. किरण यांनी पती गौतमला आणि अनुपम खेर यांनी त्यांच्या पत्नीला घटस्फोट दिला आणि दोघांनी 1985मध्ये एकमेकांशी लग्न केलं.

View this post on Instagram

A post shared by Anupam Kher (@anupampkher)

1984 साली वयाच्या 29व्या वर्षी अनुपम यांनी सिनोप्सिस या चित्रपटात 65 वर्षीय व्यक्तीची भूमिका साकारली, तेव्हा त्यांना प्रथमच प्रसिद्धी मिळाली. 1985 ते 1988 या काळात त्यांनी बर्‍याच चित्रपटांमध्ये काम केलं, मात्र त्यांना यश मिळू शकलं नाही. मात्र त्यानंतर अनुपम यांनी तेजाब या चित्रपटात धमाकेदार अभिनय केला आणि त्यांच्या या व्यक्तिरेखेनं लोकांनी मनं जिंकली. त्यानंतर अनुपम यांनी अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केलं. राम लखन, चांदनी, परिंदा, चालबाज, दिल, बीटा आणि डर यासारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली. हम आपके हैं कौन, दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे आणि कुछ कुछ होता है या चित्रपटांमध्ये त्यांनी आपल्या कॉमिक अवतारातून चाहत्यांची मनं जिंकली.

हेही वाचा : 

“पावनखिंड पाहिला का?”; ‘झुंड’चं कौतुक करणाऱ्या जितेंद्र जोशीला नेटकऱ्याने प्रश्न विचारताच म्हणाला..

‘आग ऐसी लगाई मजा आ गया’ नागराज मंजुळेंच्या ‘झुंड’वरील हे Memes पोट धरून हसवतील!

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...