AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Virat Kohli-Anushka Sharma : चेहऱ्यावर हसू, घट्ट मिठी… विराट-अनुष्का मुलांसह पोहोचले घरी, नातवंडांना पाहून आजी खुश! Video

विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी, अनुष्का शर्मा आणि विराट कोहली हे वृंदावनमधील प्रेमानंद महाराजांच्या आश्रमात गेले होते. आता त्यांचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल झाला असून लेक वामिका आणि मुलगा अकाय या दोघासंह विराट-अनुष्का त्यांच्या घरी गेले. नातवंडाना पाहून आजीही खूप खुश झाली.

Virat Kohli-Anushka Sharma : चेहऱ्यावर हसू, घट्ट मिठी... विराट-अनुष्का मुलांसह पोहोचले घरी, नातवंडांना पाहून आजी खुश! Video
अनुष्का शर्मा-विराट कोहलीImage Credit source: social media
| Updated on: May 15, 2025 | 9:14 AM
Share

बॉलिवूड आणि क्रिकेट जगतातील फेमस सेलिब्रिटींच्या जोड्या या नेहमीच प्रकाशझोतात असतात. क्रिकेटव विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांची जोडीही त्यांच्यापैकीच एक असून ते फेमस सेलिब्रिटी कपलपैकी आहेत. ते फक्त त्यांच्या कामासाठीच नव्हे तर जोडीदार म्हणून आणि आई-वडील म्हणूनही त्यांची खास ओळख असून सतत प्रकाशझोतात असले तरी त्यांनी त्यांच्या मुलांना मात्र लाईमलाइटपासून आणि पापाराझींपासून बरंच दूर ठेवलं आहे. भारताचा स्टार क्रिकेटर असेलल्या विराट कोहलीन नुकतीच कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. सोमवारी सोशल मीडियावरून हा निर्णय जाहीर केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी तो आणि अनुष्का शर्मा वृंदावनमधील आश्रमात स्पॉट झाले. प्रेमानंद महाराजांचे आशीर्वाद घेऊन त्यांच्याशी संवादही साधाल, त्यांच्या भेटीचा व्हिडीओ बराच व्हायरल झाला.

त्यानतंर आता विराट-अनुष्काचा आणखी एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर गाजत आहे. संपूर्ण कुटुंबासह असलेला त्यांचा हा व्हिडीओ समोर आला असून तो पाहून तुमच्या चेहऱ्यावरही हसू फुलेल.

आई-बाबांसह अकाय-वामिका पोहोचले आजीच्या भेटीला

या व्हिडिओमध्ये, अनुष्का-विराट, त्यांची मुलं वामिका-अकाय आणि अनुष्काची आई असे सगळेच दिसत आहेत. पांढरा टीशर्ट आणि ब्लॅक कलरची फुलपँट घातलेल्या अनुष्काच्या कडेवर तिचा लेक अकाय होता. गाडीतून खाली उतरल्यावरच अनुष्काला तिच्या आईने घट्ट मिठी मारली, दोघींच्याही चेहऱ्यावर हसू होतं, त्यानंतर अनुष्काच्या आईने हसतच त्यांच्या नातवाला अकायला जवळ घेतलं. तर त्यांच्या मागे उभी असलेली छोटी वामिकाही आजीला पाहून खुश असून हसतच टाळ्या वाजवत होती. तर या सर्वांच्या मागे ग्रे रंगाचा टीशर्ट घातलेला विराटही व्हिडीओत दिसत असून तो कामात व्यस्त होता. त्या पाचही जणांचा व्हिडीओ सोशल मीडियावर बराच व्हायरल झाला असून विराट-अनुष्काच्या चाहत्यांनी त्यावर लाईक्सचा भरपूर वर्षाव केलाय.

मुलांचा चेहरा न दाखवण्याचा निर्णय

विराट आणि अनुष्का त्यांच्या मुलांबद्दल खूप खाजगी आहेत, परंतु काही अशा झलक समोर येतात, ज्या चाहत्यांना खूप आवडतात. गेल्या वर्षी कोहलीच्या वाढदिवशी अनुष्काने विराटचा एक खास फोटो पोस्ट केला होता ज्यामध्ये त्याने वामिका आणि अकाय दोघांनाही हातात धरले होते. पण, विराट आणि अनुष्का यांनी अद्याप त्यांच्या मुलांचे चेहरे जगाला दाखवलेले नाहीत. त्यांनी दोघांनाही लाईमलाइटपासून दूरच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

अकायच्यावेळी अनुष्काही लाईमलाइटपासून राहिली दूर

वामिकाच्यावेली अनुष्का विराटने प्रेग्नन्सी जाहीर केली होती आणि ती कामातही व्यस्त होती. मात्र दुसऱ्या बाळाच्या वेळी, गरोदरपणात अनुष्का लोकांच्या नजरेपासून दूर राहिली. तिच्या आयुष्यातील त्या टप्प्यातील एकही फोटो माध्यमांमध्ये समोर आला नाही, फक्त अकायचा जन्म झाल्यानंतर दोघांनीही सोसल मीडियावरून ही बातमी शेअर केली होती.

अनुष्का-विराटचे लग्न

बराच काळ एकमेकांना डेट केल्यानंतर अनुष्का आणि विराट यांनी 2017 साली एका भव्य समारंभात लग्न केले. 2021 साली त्यांची मुलगी वामिका आणि त्यानंतर फेब्रुवारी 2024 मध्ये त्यांचा मुलगा अकाय याचा जन्म झाला. आपल्या मुलांचे फोटो काढू नयेत, अशी विनंती अनुष्का आणि विराट कोहली यांनी अनेक वेळा पापाराझींना केली आहे. त्यांच्या इच्छेचा आदर करत, भारतीय माध्यमांनी त्यांचे मोठ्या प्रमाणात पालन केले आहे, त्यांच्या सहकार्याबद्दल त्यांना या जोडप्याकडून भेटवस्तू देखील मिळाल्या आहेत.

काही गोष्टी बोलल्या नाही तर..पराभवानंतर नितेश राणे चव्हाणांच्या भेटीला
काही गोष्टी बोलल्या नाही तर..पराभवानंतर नितेश राणे चव्हाणांच्या भेटीला.
मुंबईत ठाकरेंचा उत्सव, दणक्यात युतीची घोषणा होणार, राऊतांकडून अपडेट
मुंबईत ठाकरेंचा उत्सव, दणक्यात युतीची घोषणा होणार, राऊतांकडून अपडेट.
शिंदेंचा माणूस पुण्याच्या दिशेने, भाजप-शिवसेनेत युती घडवण्यासाठी वेग
शिंदेंचा माणूस पुण्याच्या दिशेने, भाजप-शिवसेनेत युती घडवण्यासाठी वेग.
चर्चेसाठी वेळ द्या....कोण करतंय विनवणी? दादांच्या NCPची नाशकात हतबलता
चर्चेसाठी वेळ द्या....कोण करतंय विनवणी? दादांच्या NCPची नाशकात हतबलता.
सत्तार, हिंदू देव-देवता अन् मामू...दानवेंचा संजय शिरसाटांवर हल्लाबोल
सत्तार, हिंदू देव-देवता अन् मामू...दानवेंचा संजय शिरसाटांवर हल्लाबोल.
गळ्यात सोन्याचं कमळ,नगराध्यक्षा हेमलता सावजींच्या मंगळसूत्राची चर्चा
गळ्यात सोन्याचं कमळ,नगराध्यक्षा हेमलता सावजींच्या मंगळसूत्राची चर्चा.
मी सेलिब्रेशन केलं नाही...मालवणमधील विजयानंतर निलेश राणे काय म्हणाले?
मी सेलिब्रेशन केलं नाही...मालवणमधील विजयानंतर निलेश राणे काय म्हणाले?.
आईचा विजय लेकाला मोठा आनंद, प्रणिता भालके विजयी अन् शौर्यने थोपटले दंड
आईचा विजय लेकाला मोठा आनंद, प्रणिता भालके विजयी अन् शौर्यने थोपटले दंड.
कोकाटेंची आमदारकी वाचली, शिक्षेला स्थगिती मिळाल्यानं 'सर्वोच्च' दिलासा
कोकाटेंची आमदारकी वाचली, शिक्षेला स्थगिती मिळाल्यानं 'सर्वोच्च' दिलासा.
जेजुरीत भंडाऱ्यानं आगीचा भडका उडाला, प्रत्यक्षदर्शीनं सांगितल घडल काय?
जेजुरीत भंडाऱ्यानं आगीचा भडका उडाला, प्रत्यक्षदर्शीनं सांगितल घडल काय?.