एक्स गर्लफ्रेंड मलायकाचा भन्नाट डान्स पाहून अर्जून कपूरची बोलती बंद, म्हणाला, सध्या मी…
अर्जून कपूर आणि भूमी पेडणेकर इंडियाज बेस्ट डान्सर वर्सेस सुपर डान्सर चॅम्पियन का टशनच्या ग्रँड फिनालेला गेले होते. त्या शोच्या ग्रँड फिनाले अभिनेत्री मलायका अरोरा हीने तिच्या बेस्ट गाण्यांवर भन्नाट नृ्त्य केले. हा डान्स पाहून अर्जून कपूर याची तर बोलती बंद झाली

बॉलिवूडचे अनोखे कपल म्हणता येईल असे अर्जून कपूर आणि मलायका अरोरा यांनी स्वतंत्र होण्याचा निर्णय जरी घेतला असला तरी अधूनमधून त्यांची भेट होते तेव्हा त्यांची मैत्रीच्या भावना कायम असल्याचे वारंवार नजरेस येते. अर्जुन आणि मलायका अरोरा यांचे ब्रेकअपनंतर देखील त्यांच्यातील मैत्री कायम टिकून असून दोघेही एकमेकांना आदर करतात. अर्जून कपूर त्याचा आगामी चित्रपट ‘हसबंड की बीवी’ च्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. अर्जून त्याच्या या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी मलायका अरोरा हीचा डान्स रियालिटी शोत गेला होता. त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहे.
अर्जून कपूर झाला असा रिएक्ट
मलायका हिचा भन्नाट डान्स पाहून शोच्या साऱ्या जजेसनी स्टँडिंग ओव्हेशन दिले,त्यानंतर जेव्हा अर्जून कपूर याला विचारले गेले की मलायकाचा डान्स कसा वाटला तेव्हा तो म्हणाला की,’ माझी तर अनेक वर्षे बोलतीच बंद झाली आहे. परंतू मी आता शांत बसू इच्छीत आहे. माझी सर्व फेव्हरेट गाणी आज मला ऐकायला मिळाली. मलायका हिला देखील माहिती आहे की ही गाणी मला किती आवडतात.’
येथे पाहा पोस्ट –
View this post on Instagram
अर्जून कपूर पुढे म्हणाला की खूप चांगले वाटले तू लाईफ असे सेलिब्रेट करत आहेस हे पाहून, मलायका हिला या डान्ससाठी ट्रॉफी मिळायला हवी…
अर्जून कपूर आणि मलायका अरोरा अनेक वर्षे एकमेकांना डेट करीत होते. परंतू गेल्या वर्षांपासून हे दोघे वेगळे झाले. ब्रेकअपनंतर देखील अर्जून मलायका हिला कठीण प्रसंगात तिच्या सोबत उभा राहीला आहे. मलायका हिच्या वडीलांचे निधन झाले तेव्हा अर्जून कपूर सगळं विसरुन तिच्या सोबत सर्वकाळ होता. त्याने संकटात देखील त्याची मैत्री कायम असल्याचे दाखवले. एवढेच काय ब्रेकअप नंतर ही अर्जून कपूरने मलायाका सोबतचे फोटो डिलिट केलेले नाहीत.