Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Salman Khan: 45 मिनिटं सर्वांचा श्वास रोखला, विमानात पसरला सन्नाटा, सलमान खानचा मृत्यूशी जेव्हा झाला सामना

बॉलीवूडचा सुपरस्टार सलमान खान हा पहिल्यांदाच पॉडकास्टवर बोलला आहे. त्याने एका पॉडकास्टला दिलेल्या मुलाखतीत अनेक रंजक किस्से सांगितले आहेत. सलमान खान याचा भाचा अरहान खान आणि त्याच्या काही मित्रांना 'दम बिर्याणी' नावाचे पॉडकास्ट सरु केले आहे

Salman Khan: 45 मिनिटं सर्वांचा श्वास रोखला, विमानात पसरला सन्नाटा, सलमान खानचा मृत्यूशी जेव्हा झाला सामना
Follow us
| Updated on: Feb 09, 2025 | 9:16 PM

अभिनेता सलमान खान मुलाखती दरम्यान हेडफोन लावण्याच्या विषयावर बोलत होता. त्याने अरबाज याचा मुलगा अरहान आणि त्याच्या मित्रांना सल्ला दिला की कधीही दोन्ही कानांना हेडफोन लावणे चुकीचे आहे. एक कान कायम आजूबाजूला काय चालले आहे याचा अंदाज येण्यासाठी मोकळा ठेवावा असा सल्ला सलमान याने आपल्या भाच्याला दिला. त्यावेळी त्याने श्रीलंकेतून विमानातून येतानाचा भयानक अनुभव शेअर केला.

अचानक टर्बुलेंस सुरु झाला –

आम्ही श्रीलंकेहून आईफा सोहळ्यावरुन परतत असताना एक भयानक अनुभव आला. सगळेच मजामस्ती हसत खिदळत असताना आमचे विमान अचानक टर्बुलेंसमध्ये आले आणि आमचे विमान गड गड गड असा आवाज करीत हळू लागले. सर्वांना वाटले की काही प्रॉब्लेम नाही. नंतर पुन्हा तसे होऊ लागले. हे ४५ मिनिटे सुरु होते. सर्व लोक शांत बसले होते. सलमान आणि त्याचे सहकारी एका प्रायव्हेट जेटमधून परतत असताना हा भयानक अनुभव आल्याचे त्याने पॉडकास्टमध्ये सांगितले.

माझ्या सोबत सोहेल देखील होता. एकाच कुटुंबातील आम्ही दोघे जण. इतर कलाकार देखील होते.  मी सोहेलकडे पाहीले तर तो आरामात घोरत होता. मी एअरहोस्टेस्टकडे पाहीले तर ती येशूची प्रार्थना करीत होती. तेव्हा मला धोक्याची कल्पना आली. पायलट देखील त्रस्त झाला होता. वरुन ऑक्सिजन मास्क खुलले होते. मी मनात म्हणालो की हे तर मी चित्रपटात पाहीले होते. आता प्रत्यक्ष जीवनात पहात होतो. ४५ मिनिटे ही सिच्युएशन होती असे सलमान यावेळी म्हणाला.

हे सुद्धा वाचा

विमान लॅण्ड झाल्यावर जीवात जीव आला..

त्यानंतर सर्वकाही ठीक झाले. विमान सुरळीत उडू लागले. तेव्हा सगळ्यांचा जीव भांड्यात पडला. सर्वांच्या चेहऱ्यावर पुन्हा हसु आले.नंतर सर्व सामान्य झाले पुन्हा विमान हलू लागले.हे दहा मिनिटे झाले. त्यानंतर पुन्हा सगळे शांत झाले.त्यानंतर विमान लँड होईपर्यंत एकाच्याही तोंडून शब्द फुटला नाही. जसे विमानाच्या बाहेर पाऊल पडले पुन्हा सगळ्याचे चाल बदलली आणि सगळे धाडसी बनले असे सलमान यावेळी म्हणाला.

नाशिकमध्ये रिक्षा चालकाची गुंडागिरी; व्हिडिओ व्हायरल
नाशिकमध्ये रिक्षा चालकाची गुंडागिरी; व्हिडिओ व्हायरल.
ऐवढा मोठा तो नाही, जेवढा दाखवला गेला..; खोक्याबद्दल धसांच मोठं विधान
ऐवढा मोठा तो नाही, जेवढा दाखवला गेला..; खोक्याबद्दल धसांच मोठं विधान.
सुरेश धस खोक्याच्या घरी पोहोचले, कुटुंबाने सांगितली आपबिती
सुरेश धस खोक्याच्या घरी पोहोचले, कुटुंबाने सांगितली आपबिती.
'राऊतांच्या मेंदूचे दोन तुकडे झालेत अन्...', भाजप नेत्याची टीका
'राऊतांच्या मेंदूचे दोन तुकडे झालेत अन्...', भाजप नेत्याची टीका.
आधी शिंदे-दादांना मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली अन् आता म्हणताय, 'मी तर..'
आधी शिंदे-दादांना मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली अन् आता म्हणताय, 'मी तर..'.
चंद्रकांतदादांच्या ऑफरवर विशाल पाटील म्हणाले, 'विचार वेगळे असले तरी..'
चंद्रकांतदादांच्या ऑफरवर विशाल पाटील म्हणाले, 'विचार वेगळे असले तरी..'.
प्रकरणाला वेगळं वळण देण्याचा प्रयत्न सुरू; धनंजय देशमुखांचा आरोप
प्रकरणाला वेगळं वळण देण्याचा प्रयत्न सुरू; धनंजय देशमुखांचा आरोप.
राणेंवर कारवाई करा, ठाकरेंचा नेता भडकला, 'त्या' वक्तव्यावरुन CMला पत्र
राणेंवर कारवाई करा, ठाकरेंचा नेता भडकला, 'त्या' वक्तव्यावरुन CMला पत्र.
औरंगजेब आव्हाडांचा दैवत? जितूमियाँ म्हणत शिवसेनेच्या खासदाराचा घणाघात
औरंगजेब आव्हाडांचा दैवत? जितूमियाँ म्हणत शिवसेनेच्या खासदाराचा घणाघात.
औरंगजेबाच्या कबरी जवळ बंदोबस्त वाढवला
औरंगजेबाच्या कबरी जवळ बंदोबस्त वाढवला.