Rakhi Sawant : 58 वर्षांच्या पाकिस्तानी मुफ्तींशी लग्न करण्यासाठी राखी सावंत तयार, मेहर म्हणून केली मोठी मागणी
अभिनेत्री राखी सावंत सध्या तिच्या तिसऱ्या लग्नामुळे खूपच चर्चेत आली आहे. राखी पाकिस्तानाची सून होण्यास तयार झाली आहे. तिने तिसऱ्यांदा लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. पाकिस्तानचे मौलाना मुफ्ती अब्दुल कवी यांनी राखीला लग्नासाठी प्रपोज केले आहे. मात्र आता राखी देखील लग्नासाठी एक मोठी अट घातली आहे.

अभिनेत्री राखी सावंत आपल्या उटपटांग हरकती आणि वादगस्त वक्तव्यांमुळे कायम प्रसिद्धीच्या झोतात असते. गेल्या काही दिवसांपासून तिच्याशी लग्न करायला एक पाकिस्तानी मुफ्ती तयार झाल्याने ती पुन्हा चर्चेत आहे. आता ती पाकिस्तानची सून होणार का याकडे साऱ्यांचं लक्ष लागले आहे. आधी पाकिस्तानचे अभिनेते डोडी खान यांनी तिच्याशी लग्नगाठ बांधायला तयारी दर्शविली आहे. परंतू प्रकरण वाढत चालले पाहून तिने एक व्हिडीओ शेअर करीत निकाह करण्यास नकार दिला. आता तर पाकिस्तानातील एक मौलाना तिच्या लग्न करायला एका पायावर तयार झाले आहे. परंतू राखी सावंत हीने देखील लागलीच होकार दिला आहे. परंतू एक अटही घातली आहे.
पाकिस्तानचे मौलाना मुफ्ती अब्दुल कवी यांनी अभिनेत्री राखी सावंत हीच्या निकाह करण्याची इच्छा जाहीर केली आहे, परंतू आता राखी सावंत तिचे हे तिसरे लग्न करण्यासाठी तयार देखील झाली आहे. परंतू निकाहचा करण्यापूर्वी तिने अट देखील अजब टाकली आहे. ही अट म्हणजे आपला मेहर समजा असेही ती म्हणाली.
एका खाजगी चॅनलला दिलेल्या इंटरव्यूह दरम्यान राखी सांवत हीने मुफ्ती अब्दुल कवी यांच्या बोलणं केले आहे. आपली अट देखील सांगितली आहे. जर ते माझ्याशी निकाह करण्यासाठी राजी आहेत तर त्यांना माझी ही अट पाळावी लागले. मुफ्ती यांच्याकडे अभिनेत्री राखी सावंत हिने एक मागणी केली आहे. ती म्हणाली की माझ्यावर ६ ते ७ कोटीचं छोटेसे कर्ज आहे. ते तुम्ही फेडायला तयार आहात आहे. यावर मुफ्ती यांनी लगेच होकार देत आतापासून ते कर्ज तुमचे नाही माझे आहे असे सांगून सर्वांनाच आश्चर्यचकीत केले आहे.




पाकिस्तानाची सून बनण्यास राखी राजी
राखी सावंत हिला विचारले की ती मुफ्ती साहेबांशी निकाह करायला राजी आहे का त्यावर तिने उत्तर दिले की आधी कसे बोलू, त्यांचे वय तरी कळायला हवे किती आहे. राखीने मुफ्ती यांच्याबद्दलची अधिकची माहिती मागतली आहे.यावर लागलीच मुफ्ती यांनी या मुलाखती उत्तर दिले की माझं एकदाच निकाह झाला आहे. माझे वय ५८ आहे. आणि मी पणजोबा बनलोय. या प्रेमाच्या गोष्टी आहे. प्रत्यक्षात भेटून बोलूयात…
राखीची मेहर म्हणून मोठी मागणी
मुफ्ती साहेबांचे वय ऐकल्यानंतर राखी म्हणाली की ते म्हणतात की आदमी आणि घोडा कभी बुढा नही होता. पुढे राखी म्हणाले की निकाहच्या बदल्यात मेहरमध्ये मुफ्ती साहेबांकडून पाकिस्तान आणि हिंदूस्थानची दोस्ती देखील हवीय..या साठी मी माझं सर्वस्व द्यायला तयार आहे.मौलानानी राखी सांवत निकाह केला तर हे देखील वचन पूर्ण होईल असे म्हटले आहे..