‘हेरा फेरी ३’ ची घोषणा, दिग्दर्शक प्रियदर्शन यांची पोस्ट चर्चेत

सध्या अक्षय कुमार, तब्बू आणि परेश रावल यांच्यासोबत 'भूत बंगला'या चित्रपटाच्या चित्रीकरणात दिग्दर्शक प्रियदर्शन बिझी आहेत. हा चित्रपट पुढील वर्षी एप्रिल महिन्यात रिलीज होत आहे. त्यानंतर प्रियदर्शन हेरा फेरी ३ चे काम सुरु होणार आहे. 'हेरा फेरी ३' चाहत्यांसाठी केवळ एक चित्रपट नाही तर एक इमोशन आहे. आशा आहे की हेराफेरीच्या आधीच्या भागांप्रमाणेच तिसरा भाग देखील चाहत्यांचे हृदय काबीज करण्यात यश मिळवेल.

'हेरा फेरी ३' ची घोषणा, दिग्दर्शक प्रियदर्शन यांची पोस्ट चर्चेत
Follow us
| Updated on: Feb 04, 2025 | 11:20 PM

३० जानेवारी २०२५ रोजी रोजी दिग्दर्शक प्रियदर्शन यांच्या ६८ व्या वाढदिवसानिमित्त त्यांनी इंस्टाग्रामवर एक पोस्ट टाकीत पुन्हा ‘हेरा फेरी -३’ बनविण्याची इच्छा जाहीर केली आहे. त्यांनी इंस्टाग्रामच्या पोस्टमध्ये लिहीलंय की तुमच्या शुभेच्छासाठी धन्यवाद अक्षय, बदल्यात तुम्हाला एक गिफ्ट देऊ शकतो. मी ‘हेरा फेरी ३’ करण्यास तयार आहे. तुम्ही तयार आहात काय ? अक्षय कुमार, सुनील शेट्टी आणि परेश रावल?

यावर लागलीच अक्षयने देखील त्याच्या ‘वेलकम’चा पॉप्युलर मीम ‘मिरेकल, मिरेकल’ असे दिग्दर्शक प्रियदर्शन यांच्या इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर करत लिहीले की सर तुमचा जन्मदिवस आणि मला माझ्या आयुष्यातील सर्वात मोठे बक्षिस मिळाले. चला करूयात फिर थोडी ‘हेरा फेरी ३’

हेरा फेरी 3 मध्ये तब्बूची एण्ट्री ?

या बातमीने चाहते उल्हसित झाले आहेत. मग तब्बू देखील मागे कसली राहाते तिने देखील हेरा फेरीचा हिस्सा होण्याची इच्छा जाहीर केली आहे. त्यामुळे हेरा फेरीच्या चाहत्यांची उत्सुकता ताणली गेली आहे. दिग्दर्शक प्रियदर्शन यांनी ‘हेरा फेरी ३’ पुन्हा तयार करण्याची घोषणा केली तशी तब्बूने प्रियदर्शन यांच्या इंस्टाग्राम पोस्टवर लिहीले की माझ्याशिवाय हेरा फेरीची कास्ट पूर्ण होईल असे तर होऊ नाही शकत ना, हो ना प्रियदर्शन सर ?

हे सुद्धा वाचा

तब्बूनंतर हेराफेरी ( २०००) मध्ये कबीरा बनलेले गुलशन ग्रोव्हर यांनी देखील या तिसऱ्या भागाचा आपण देखील एक भाग असणार असल्याचे  जाहीर केले आहे. निर्माता फिरोज नाडियाडवाला यांच्याशी आपण कायम संपर्कात आहोत असेही त्यांनी म्हटले आहे.

‘हेरा फेरी ३’साठी १९ वर्षांची वाट?

हेरा फेरीचा दुसरा भाग ‘फिर हेरा फेरी’ सहा वर्षानंतर लगेच रिलीज झाला होता. परंतू तिसरा भाग बनविण्यासाठी सुमारे १९ वर्षे लागली आहेत. साल २०१६ मध्ये या चित्रपटाचा तिसरा भाग बनविण्याची घोषणा झाली होती. त्यावेळी त्या अक्षय ऐवजी जॉन अब्राहम आणि अभिषेक बच्चन यांना घेणार होते. सुनील शेट्टी आणि परेश रावल कायम होते. परंतू काही कारणांनी बेत बारगळला. त्यानंतर साल २०२३ मध्ये कार्तिक आर्यन याला घेऊन तिसऱ्या भागाची घोषणा झाली. परंतू या वेळी अक्षय कुमार याने या चित्रपटात इंटरेस्ट दाखविला नसल्याने प्लान चौपट झाला. त्यावेळी अक्षयला स्क्रीप्ट पसंद आली नव्हती. अक्षय बाहेर पडल्याने चाहते नाराज झाले होते. मात्र आता पुन्हा अक्षय तिसऱ्या भागात येणार असल्याने चाहते खूश झाले आहेत.

'राहुल सोलापूरकरचं तोंड फोडणाऱ्याला 1 लाख', कोणी जाहीर केलं बक्षीस?
'राहुल सोलापूरकरचं तोंड फोडणाऱ्याला 1 लाख', कोणी जाहीर केलं बक्षीस?.
'शब्द मागे घे, नाहीतर ...', आव्हाड भडकले अन् सोलापूरकरची काढली लायकी
'शब्द मागे घे, नाहीतर ...', आव्हाड भडकले अन् सोलापूरकरची काढली लायकी.
‘वेदांनुसार डॉ. भीमराव आंबेडकर हे...’, राहुल सोलापूरकर पुन्हा बरळला
‘वेदांनुसार डॉ. भीमराव आंबेडकर हे...’, राहुल सोलापूरकर पुन्हा बरळला.
'राऊतांनी ठाकरेंचा पत्ता राजकारणातून कट...', निलेश राणेंची टीका
'राऊतांनी ठाकरेंचा पत्ता राजकारणातून कट...', निलेश राणेंची टीका.
'ऑपरेशन टायगर... 100% कोकण खाली..', शिवसेनेच्या बड्या मंत्र्यांचा दावा
'ऑपरेशन टायगर... 100% कोकण खाली..', शिवसेनेच्या बड्या मंत्र्यांचा दावा.
'मला तुम्ही फार आवडता', आशा भोसलेंकडून शिंदेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा
'मला तुम्ही फार आवडता', आशा भोसलेंकडून शिंदेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा.
माझ्या वडिलांना 3 तासात संपवलं, मग..., बापाच्या न्यायासाठी लेकीची तळमळ
माझ्या वडिलांना 3 तासात संपवलं, मग..., बापाच्या न्यायासाठी लेकीची तळमळ.
हॉस्टेलवर मागवला पिझ्झा अन् 'त्या' चौघीना महिनाभर वसतिगृहात नो एन्ट्री
हॉस्टेलवर मागवला पिझ्झा अन् 'त्या' चौघीना महिनाभर वसतिगृहात नो एन्ट्री.
शिंदेंचा राजन साळवींना फोन, 'या' तारखेला पक्षप्रवेश करण्याचे आदेश?
शिंदेंचा राजन साळवींना फोन, 'या' तारखेला पक्षप्रवेश करण्याचे आदेश?.
'... तर देशमुख प्रकरणात मुंडेंना कोण अडकवणार?', धस स्पष्टच म्हणाले...
'... तर देशमुख प्रकरणात मुंडेंना कोण अडकवणार?', धस स्पष्टच म्हणाले....