AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

किती कोटींची मालकीण आहे तेंडुलकरांची सून… सचिनच्या मुलाची संपत्ती किती? थक्क करणारा आकडा समोर

Arjun Tendulkar and Saania Chandhok Marriage: अर्जुन तेंडुलकर याने सानिया चंडोक हिच्यासोबत मोठ्या थाटात लग्न केलं. आता त्यांच्याबद्दल काही खास गोष्टी जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहे. तर, अर्जुन आणि सानिया यांच्या संपत्तीचा आकडा समोर आला आहे.

किती कोटींची मालकीण आहे तेंडुलकरांची सून... सचिनच्या मुलाची संपत्ती किती? थक्क करणारा आकडा समोर
Arjun Tendulkar and Saaniya Chandhok
| Updated on: Mar 06, 2026 | 2:25 PM
Share

Arjun Tendulkar and Saania Chandhok Marriage: भारतीय क्रिकेट संघाचे माजी स्टार फलंदाज सचिन तेंडुलकर यांचा मुलगा अर्जुन तेंडुलकर याने ‘लेडीलव्ह’ सानिया चंडोक हिच्यासोबत लग्न केलं आहे. अर्जुन याने नव्या आयुष्याची सुरुवात केली आहे. सध्या त्यांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अर्जुन आणि सानिया यांच्या लग्नानंतर त्यांच्याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. आता अर्जुन आणि सानिया यांच्या संपत्तीबद्दल मोठी माहिती समोर येत आहे… तर जाणून घ्या सचिन तेंडुलकर यांची सून किती कोटींची मालकीण आहे… अर्जुन तेंडुलकर याची नेटवर्थ…

अर्जुन सध्या त्याच्या करियरची सुरुवात करत आहे. पण त्याची स्वतःची संपत्ती देखील काही कमी नाही… मुंबई इंडियन्ससोबतचा त्याचा करार प्रत्येक सिझन सुमारे 30-50 लाख रुपयांचा असण्याचा अंदाज आहे. रिपोर्टनुसार, अर्जुनची वैयक्तिक संपत्ती सुमारे 10-15 कोटी रुपये असण्याचा अंदाज आहे. शिवाय, तो मुंबईतील वांद्रे येथील वडील सचिन यांच्या 100 कोटी रुपयांच्या आलिशान बंगल्यात राहतो.

कोण आहे सानिया चंडोक?

अर्जुन याची पत्नी सानिया चंडोक कोणतं साध नाव नाही. सानिया भारतातील दिग्गज उद्योजक आणि ग्रेव्हिस ग्रुपचे (Graviss Group) अध्यक्ष रवी घई यांची नात आहे. सानियाने परदेशात व्यवसाय आणि व्यवस्थापनाचे शिक्षण घेतले आहे आणि ती तिच्या कुटुंबाच्या व्यवसायात सक्रिय भूमिका बजावते, ज्यामध्ये हॉस्पिटॅलिटी आणि लाइफस्टाइल ब्रँडचा समावेश आहे. सानियाच्या कुटुंबाने भारतात लोकप्रिय आईस्क्रीम ब्रँड बास्किन-रॉबिन्स लाँच केला.

सानिया चंडोक हिची नेटवर्थ…

सानिया एका अत्यंत प्रभावशाली व्यावसायिक कुटुंबातून येते. ग्रॅव्हिस ग्रुपचे व्यवसाय हॉस्पिटॅलिटी, अन्न आणि रिअल इस्टेटमध्ये पसरलेलं आहेत. जरी तिची नेमकी वैयक्तिक संपत्ती सार्वजनिकरित्या ज्ञात नाही, पण त्यांचा कौटुंबिक व्यवसाय लाखो कोटी रुपयांचा असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे सानियाला अर्जुनपेक्षा खूप मोठी कुटुंब संपत्ती वारशाने मिळाली आहे.

महागड्या गाड्या आणि आलिशान बंगले

तेंडुलकर कुटुंबाला नेहमीच आलिशान गाड्यांचा शौक राहिला आहे. अर्जुन अनेकदा आलिशान गाड्यांमध्ये दिसतो, ज्यामध्ये BMW i8, BMW X5 आणि Nissan GT-R सारख्या सुपरकार्सचा समावेश आहे. दरम्यान, सानिया मुंबईतील उच्च-प्रोफाइल व्यावसायिक वर्तुळाचा भाग आहे आणि ती खूप आलिशान जीवनशैली जगते.

कशी सुरु झाली अर्जुन – सानिया यांची लव्हस्टोरी?

अर्जुन आणि सानियाचे नातं बराच काळ गुप्त राहिलं. जवळच्या सूत्रांनुसार, दोघांची पहिली भेट मुंबईच्या सामाजिक वर्तुळातून झाली. त्यानंतर हळूहळू त्यांची मैत्री नात्यात बदलली आणि दोन्ही कुटुंबांनी या लग्नाला मान्यता दिली.

Follow Us
महागाईचा फटका! एलपीजी गॅसची किंमत वाढली, किंमत 3000 च्या पुढे...
महागाईचा फटका! एलपीजी गॅसची किंमत वाढली, किंमत 3000 च्या पुढे....
डोकाडिया कुटुंबाच्या मृत्यूमागचे सत्य समोर, नेमकं काय घडलं?
डोकाडिया कुटुंबाच्या मृत्यूमागचे सत्य समोर, नेमकं काय घडलं?.
8 वर्षांची प्रतीक्षा संपली, आजपासून मिसिंग लिंक सर्वसामान्यांसाठी खुला
8 वर्षांची प्रतीक्षा संपली, आजपासून मिसिंग लिंक सर्वसामान्यांसाठी खुला.
मुस्लिम लग्नपत्रिकेत छत्रपती शिवाजी महाराज-टिपू सुलतानचा उल्लेख?
मुस्लिम लग्नपत्रिकेत छत्रपती शिवाजी महाराज-टिपू सुलतानचा उल्लेख?.
मुख्यमंत्री फडणवीस- शिंदेंच्या हस्ते मिसिंग लिंकचं लोकार्पण
मुख्यमंत्री फडणवीस- शिंदेंच्या हस्ते मिसिंग लिंकचं लोकार्पण.
कोंढव्याला पाकिस्तान संबोधल्याप्रकरणी भाजप पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल
कोंढव्याला पाकिस्तान संबोधल्याप्रकरणी भाजप पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल.
मुंबईत आंतरराष्ट्रीय ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश; 1745 कोटींचा साठा....
मुंबईत आंतरराष्ट्रीय ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश; 1745 कोटींचा साठा.....
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा, सुळे अडकल्या....
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा, सुळे अडकल्या.....
मराठीचं नाव घेतल्यावर मिरच्या का झोंबतायत?, राऊतांचा फडणवीसांवर हल्ला
मराठीचं नाव घेतल्यावर मिरच्या का झोंबतायत?, राऊतांचा फडणवीसांवर हल्ला.
आता मुंबई-पुणे प्रवास सुसाट! अर्ध्या तासाची बचत, आज होणार मिसिंग लिंक
आता मुंबई-पुणे प्रवास सुसाट! अर्ध्या तासाची बचत, आज होणार मिसिंग लिंक.