Payal Kids | लेकरांचे हाल पाहून अरमान मलिकची पत्नी संतापली, थेट दिली पायल हिने ‘ही’ मोठी धमकी
अरमान मलिक आणि त्याचे कुटुंबिय हे नेहमीच चर्चेत असतात. अरमान मलिक याची तगडी फॅन फाॅलोइंगही सोशल मीडियावर बघायला मिळते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून मलिक कुटुंबिय हे नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आहे. अरमान मलिक याच्या दोन्ही पत्नींना सतत ट्रोल केले जात आहे.

मुंबई : यूट्यूबर अरमान मलिक (Armaan Malik) नेहमीच चर्चेत असलेले एक नाव आहे. फक्त अरमान मलिक हाच नाही तर त्याच्या दोन्ही पत्नी देखील चर्चेत असतात. ब्लाॅगच्या माध्यमातून हे कायमच आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असतात. विशेष म्हणजे सोशल मीडियावर मलिक कुटुंबियांची तगडी फॅन फाॅलोइंगही (Fan following) बघायला मिळते. सोशल मीडियाच्या (Social media) माध्यमातून मलिक कुटुंबिय महिन्याला कोट्यावधीच्या घरात कमाई करते. फक्त अरमान मलिक हाच नाही तर त्याच्या दोन्ही पत्नी आणि त्याच्या काही जवळच्या नातेवाईकांचे देखील चॅनल आहेत. नुकताच अरमान मलिक याच्या घरी तीन लेकऱ्यांचे आगमन झाले आहे.
अरमान मलिक याची पहिली पत्नी पायल मलिक हिने नुकताच दोन जुळ्या बाळांना जन्म दिलाय. एकाचे नाव तुबा आणि दुसऱ्याचे नाव अयान असे ठेवण्यात आले आहे. तसेच अरमान मलिक याची दुसरी पत्नी अर्थात कृतिका हिने देखील एका मुलीला जन्म दिला आहे. कृतिकाने त्याच्या मुलाचे नाव जैद ठेवले आहे.
गेल्या काही दिवसांपासून मलिक कुटुंबामध्ये वाद हा बघायला मिळत आहे. अरमान मलिक याची बहीण सपना हिने काही धक्कादायक आरोप हे पायल आणि अरमान यांच्यावर लावले आहेत. हे सर्व सुरू असतानाच आता नुकताच पायल हिच्या मुलगा अयान याची तब्येत खराब झाल्याचे बघायला मिळत आहे.
कृतिका हिला पायल म्हणते की, आपल्या बाळाला कोणीतरी नजर लावली आहे. पायल पुढे म्हणाली की, जे कोणी बाळांना नजर लावत आहेत, त्यांचे तोंड मी काळे करणार आहे. यानंतर पायल मलिक ही अयान याची नजर काढताना दिसली. सपना हिने अरमान आणि पायल तसेच कृतिका यांच्यावर आरोप केल्यानंतर त्यांनी बरेच दिवस सोशल मीडियावर ट्रोल जात होते.
अनेकांनी सपना हिची बाजू घेत थेट अरमान मलिक याच्या लहान मुलांना देखील ट्रोल केले. सतत नुकताच जन्मलेल्या लेकऱ्यांना ट्रोल केले जात असल्याने पायल आणि कृतिका यांनी सोशल मीडिया सोडण्याच्या देखील थेट निर्णय घेतला होता. कृतिका आणि पायल मलिक यांची सोशल मीडियावर मोठी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. अरमान मलिक आणि त्याचे कुटुंबिय हे नेहमीच चर्चेत असतात.
