‘अभिनेत्याशी लग्न म्हणजे…’ अर्शद वारसीशी लग्नाआधी जया बच्चन यांनी मारियाला दिला होता इशारा
अभिनेता अर्शद वारसीने मारिया गोरेट्टीशी लग्न केलं. दोघांचीही लव्हस्टोरी एखाद्या फिल्मी स्टोरीपेक्षा काही कमी नाहीये. मात्र त्यांच्या लग्नापूर्वी जया बच्चन यांनी एक मोठा इशारा मारियाला दिला होता.

बॉलिवूड अभिनेता आणि कॉमेडिअन अर्शद वारसी (Arshad Warsi) आज ज्या उंचीवर आहे, तिथे पोहोचण्यासाठी त्याने दिवसरात्र अथक मेहनत केली आहे. आज तो जिथे उभा आहे, तिथे पोहोचणं त्याच्यासाठी फार सोपं नव्हतं. पण तरीही हिंमत न हारता, आलेल्या आव्हानांचा सामना करत त्याने त्याची स्वत:ची अशी एक खास जागा तयार केली. त्याने त्याच्या करिअरमध्ये अनेक ब्लॉकबस्टर सिनेमे दिले. प्रोफेशनल आयुष्याप्रमाणे अर्शद वारसी त्याच्या खासगी आयुष्यामुळेही चर्चेत होता. तो जेवढा उत्तम अभिनेता आहे, माणूस म्हणून आणि आयुष्याचा जोडीदार म्हणूनही तो तितकाच चांगला आहे. अर्शदने मारिया गोरेट्टीशी लग्न केलं. दोघांची लव्ह स्टोरी ही एखाद्या फिल्मी कहाणीपेक्षा कमी नाही. मात्र लग्नापूर्वी त्यांना एका कास व्यक्तीकडून मोठा , महत्वाचा सल्ला मिळाला होता. खुद्द अर्शद आणि मारिया यांनीच हा खुलासा केला. ती व्यक्ती म्हणजे ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन (Jaya Bachchan) . असं काय सांगितलं त्यांनी त्या दोघांना ?
जया बच्चन यांनी मारियाला दिला मोलाचा सल्ला
दिग्गज अभिनेत्री जया बच्चन आणि शहनेशाह अमिताभ बच्चन यांचं लग्न झालं आहे. त्यांच्या विवाहाला पाच दशकांहून अधिक काळ लोटला असून ते पॉवर कपल म्हणून ओळखले जातात. यामुळेच एक अभिनेत्यासोबत संपूर्ण आयुष्य काढताना येणारी आव्हान आणि करावा लागणार त्याग याची जया बच्चन यांना पूर्णपणे जाणीव आहे. हीच गोष्ट ध्यानात ठेऊन मारिया गोरेट्टीने अर्शद वारसीशी लग्न करण्यापूर्वी जया बच्चन यांनी तिला एका खास सल्ला दिला. अर्शदने नुकतीच फिल्मज्ञानला एक मुलाखत दिली. त्यावेळी जया बच्चन यांच्याबद्दल तो बोलला.
अभिनेत्याशी लग्न करणं खूपच कठीण
अर्शद वारीस म्हणाला, ‘ जया बच्चन या अतिशय समजूतदार आहेत. एका अभिनेत्याशी लग्न करणं हे आयुष्यातील सर्वात कठीण गोष्टींपैकी एक आहे, असं त्यांनी मला आणि मारियाला सांगितलं होतं. अभिनेत्यांचा स्वभावच तसा असतो, असं मी म्हणणार नाही, पण दुर्दैवाने तुमचं कामच तुम्हाला अशा परिस्थितीत घेऊन जातं, जिथे तुम्ही सतत अतिशय आकर्षक आणि मनोरंजक लोकांच्या सहवासात असता. तुम्ही खूप देखण्या लोकांसोबत फिरत असता.
तुझी तयारी आहे का ?
पुढे अर्शद म्हणाला , ‘ जेव्हा मारिया आणि माझं लग्न होणार होतं, तेव्हा जयाजींनी मला विचारलं होतं, की तू यासाठी तयार आहेस का का?’ याचं कारण असं की, अभिनेत्याची नोकरी तुम्हाला अशा काही गोष्टी करायला भाग पाडते, ज्या एका सामान्य जोडप्यासाठी सामान्य नसतात. त्यामुळे तुम्हाला त्या अडथळ्यांवर मात करावी लागते आणि तरीही त्या व्यक्तीसोबत नाते टिकवून ठेवावे लागते. म्हणूनच तुमचं प्रेम हे सामान्य लोकांच्या प्रेमापेक्षा आणि त्यांच्या मिळणाऱ्या अटेंशनपेक्षा कितीतरी अधिक असायला हवे” असं त्यांनी सांगितल्याचं अर्शदने नमूद केल.
जया- अमिताभ यांचं लग्न
1971 साली ‘गुड्डी’ चित्रपटाच्या सेटवर अमिताभ आणि जया यांची भेट झाली, पण 1972 मध्ये ‘एक नजर’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान त्यांची चांगली मैत्री झाली आणि ओळख आणख वाढली. 1973 साली आलेला’जंजीर’ यशस्वी ठरला आणि त्यानंतर त्या दोघांनी त्याच वर्षी लग्न केलं. त्यांना श्वेता आणि अभिषेक अशी दोन मुलं, सून, जावई, नातवंडं असा परिवार आहे.
अर्शद वारसी-मारिया गोरेटी यांनी 1999 मध्ये केलं लग्न
दुसरीकडे, अभिनेता अर्शद वारसी आणि मारिया गोरेटी यांच्या पहिल्या भेटीची कहाणीही खूपच रंजक आहे. 1991 साली सेंट झेवियर्स कॉलेजमधील एका डान्स फेस्टिव्हलमध्ये अर्शद वारसी आणि मारिया गोरेटी यांची पहिली भेट झाली होती. या कार्यक्रमात अर्शद हा परीक्षक म्हणून गेला होता, तर मारिया या स्पर्धेत सहभागी झाली होती. यानंतर दोघांनी 14 फेब्रुवारी 1999 रोजी लग्न केलं. सुरुवातीला या जोडप्याने चर्चमध्ये लग्न केले आणि त्यानंतर निकाह केला. लग्नाला जवळपास 25 वर्षे पूर्ण झाल्यानंतर, जानेवारी 2024 मध्ये त्यांनी आपल्या विवाहाची अधिकृत नोंदणी केली.
अर्शदचं काम
‘मुन्ना भाई MBBS’ मधील सर्किटच्या भूमिकेने अर्शदला खरी ओळख आणि मोठी लोकप्रियता मिळवून दिली.अर्शदसाठी हे वर्ष खूप बिझी आहे. ‘वेलकम टू द जंगल’ आणि ‘धमाल 4’ हे त्याचे दोन चित्रपट रिलीज झाले. आता तो सध्या ‘जीवन बीमा योजना’ चित्रपटाच्या कामात व्यस्त असून, त्यात तो डबल रोलमध्ये झळकणार आहे.
