आर्यन खानचे अभिनयात पदार्पण केव्हा?, शाहरुखने दिले मजेशीर उत्तर म्हणाला एका घरात…
सुपरस्टार शाहरुख खानने त्याच्या चाहत्यांशी ट्वीटर ( आता एक्स ) वर गप्पा मारल्या आहेत. आणि चाहत्यांच्या अनेक प्रश्नांना आपल्या नर्मविनोदी शैलीत उत्तरे दिली आहेत. तसेच मुलाच्या शोची रिलीज डेट सरप्राईज अंदाजात सांगितली आहे.

अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान मध्यंतरी वादात सापडला होता. परंतू तो वडीलांच्या पावलावर पाऊल ठेवत अभिनयात पदार्पण करणार का या संदर्भात प्रश्नचिन्ह आहे. यात शाहरुख खान याने त्याचा प्रसिद्ध Q&A सेशन #AskSRK घेऊन ट्वीटर ( आता एक्स ) परतला आहे. या प्रश्न आणि उत्तर सेशनमध्ये शाहरुखला चाहत्यांनी अनेक प्रश्न विचारले, त्याला त्याने नेहमीच्या नर्मविनोदी शैलीत उत्तरे दिली आहेत. त्याला राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल देखील चाहत्यांनी प्रश्न विचारले. याच वेळी एका चाहत्याने त्याचा मुलगा आर्यन संदर्भात प्रश्न विचारला त्यास त्याने दिलेल्या उत्तराकडे सर्वांचे लक्ष गेले आहे.
आर्यन खान एक्टिंग डेब्यू करणार ?
शाहरुखचा मुलगा आर्यन लवकरच बॉलीवूडमध्ये दिग्दर्शक म्हणून नेटफ्लिक्सची वेब सीरीज ‘Ba**ds of Bollywood’ द्वारे पाऊल ठेवत आहे. काही महिन्यांपूर्वी याचा अनाऊन्समेंट टीझर आला होता. तेव्हा आर्यन आणि शाहरुख यांच्या जोडीला खूप पसंद केले होते. आर्यन याने या टीझरमध्ये आपल्या अभिनयाची एक झलकही दाखविली होती, ज्याने चाहते खूपच इम्प्रेस झाले होते.
यावेळी एका चाहत्याने शाहरुख याला #AskSRK सेशनमध्ये एक प्रश्न विचारला की आर्यन खानला हिरो म्हणून बॉलीवूडमध्ये केव्हा लाँच करणार ? चाहता म्हणाला की आम्ही आर्यनला एका सुपरहिरो रुपात पाहायचं आहे. त्यावर शाहरुखने मस्करीच्या अंदाजात सांगितले की जेव्हा आपण ‘Ba**ds of Bollywood’ पाहाल, तेव्हा दिग्दर्शक म्हणून त्याला प्रेम द्या. आता घरात कोणतीही स्पर्धा नकोए..!’
शाहरुखला आणखी एका चाहत्याने विचारले की या वर्षीची फेव्हरेट सिरीज कोणती? जी त्यांनी पाहिली ?या त्याने सांगितले की मी माझ्या मुलाच्या डेब्यु सिरीज बैड्स ऑफ बॉलीवुडचे काही भाग पाहिले आहेत. ते खूपच मजेदार वाटत आहेत.
आर्यन याच्या डेब्यू सीरीजची पहिली झलक केव्हा ?
#AskSRK सेशनमध्ये शाहरुख याला आर्यनच्या डेब्यु सिरीजची ‘बै**ड्स ऑफ बॉलीवुड’ संदर्भात प्रश्न विचारले. ज्यावर कंठाळून शाहरुख यानेही नेटफ्लिक्सला विचारले की अखेर चाहत्यांना सिरीजची पहिली झलक केव्हा पाहायला मिळणार ?शाहरुख याने लिहीले की मुलगा शो बनवत आहे, आणि बाप वाट पाहात आहे…नेटफ्लिक्स काय करत आहे ?
ज्यावर नेटफ्लिक्सने देखील शाहरुखला त्याच अंदाजात म्हटले की मुलाच्या शोच टीझर टाकण्यापूर्वी बापाकडून परवानगी हवी होती. आता ते फायनली ‘बैड्स ऑफ बॉलीवुड’ची पहिली झलक उद्या रविवार पासून रिलीज करणार आहेत. त्यांच्या शोचा टीझर १७ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता रिलीज केला जाणार आहे.
