त्यांनी मला कधीच…. आशिष विद्यार्थींच्या दुसऱ्या लग्नाबाबत पहिल्या पत्नीने सोडले मौन
अभिनेते आशिष विद्यार्थी यांच्या दुसऱ्या लग्नाबाबत त्यांची पहिली पत्नी राजोशी यांनी प्रथमच प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

Ashish Vidyathi Second Marriage : अभिनेते आशिष विद्यार्थी (Ashish Vidyathi) यांनी वयाच्या 60 व्या वर्षी दुसरे लग्न केले आहे. कलकत्ता येथे रुपाली बरूआ (Rupali Barua) हिच्यासोबत त्यांनी रजिस्टर मॅरेज केले. त्यांच्या या लग्नाबाबत सध्या बरीच चर्चा ऐकायला येत आहे. लोकं त्यांची पहिली पत्नी व मुलगा यांच्याबद्दलही बोलत आहेत. आशिष आणि राजोशी (Rajoshi barua) यांच्या लग्नाबद्दल आणि नात्याबद्दलही बरीच चर्चा सुरू आहे. आशिष यांनी एका व्हिडीओद्वारे या सर्व प्रश्नांबाबत उत्तरे दिली आहेत. तर दुसरीकडे राजोशी यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे.
आम्ही दोघं सहमतीने वेगळे झालो होतो आणि दोघांचाही 22 वर्षांचा प्रवास , नातं खूप छान होतं, अशी भावना राजोशी यांनी व्यक्त केली.
२ वर्षांपूर्वी झाले वेगळे
एका मुलाखतीत राजोशी या त्यांच्या पर्सनल लाईफबद्दल मोकळपणाने बोलल्या. त्या म्हणाल्या की, मी आणि आशिष 2021 साली एकमेकांपासून वेगळे झालो आणि आम्ही दोघेही आपापल्या आयुष्यात आनंदी आहोत. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये दोघांनी घटस्फोटासाठी अर्ज केला होता. आणि आता ते एकमेकांचे चांगले मित्र आहेत.
आम्ही कोणालाही सांगितलं नाही
राजोश म्हणाल्या की आम्ही आमच्या घटस्फोटाबद्दल कोणालाही सांगितलं नाही. मीडिया आणि पीआर यांना किंवा इतर कोणालाही आम्हाला काहीही सांगायचे नव्हते. आम्ही दोघेही एकमेकांचे चांगले मित्र होता आणि यापुढेही राहू. आशिषसोबत घालवलेली गेली 22 वर्ष आयुष्यातील सर्वोत्तम काळ होता, असे त्या म्हणाल्या. तुम्ही आशिष यांना याबद्दल विचारलंत तर कदाचित तेही असंच उत्तर देतील.
View this post on Instagram
आशिष हे उत्तम जोडीदार आहे आणि आम्ही एकत्र खूप प्रवास केला आहे. आमच्या बऱ्याच आवडीनिवडी जुळायच्या. आमच्या दोघांमध्ये कधी जास्त वाद मतभेद झाले नाहीत कारण आम्ही बरेचसे सारखे आहोत. आजही आम्ही तसेच आहोत. आमचा मुलगाही आमच्यासारखाच आहे. तो एक चांगली व्यक्ती आहे.
मुलाबद्दल बोलताना राजोशी म्हणाल्या की त्याला मोठं करण्यात, वाढवण्यात आशिष यांनी पूर्ण योगदान दिले. ते मुलाचे मित्र आणि गाईडही आहेत. अशा शब्दात राजोशी यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या.
आशिष यांनीही व्यक्त केले होते मत
दुसरं लग्न केल्यानंतर आशिष विद्यार्थी यांनी फेसबूकवर एक व्हिडीओ पोस्ट करत भावना व्यक्त केल्या आहेत. सध्या सर्वत्र आशिष विद्यार्थी यांच्या व्हिडीओची चर्चा आहे.. अभिनेत्याच्या व्हिडीओवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.
आशिष विद्यार्थी म्हणाले, ‘प्रत्येकाचं आयुष्य वेगळं आहे, प्रत्येकाच्या गरजा वेगळ्या असतात… पण आपल्या सर्वांच्या आयुष्यात एक गोष्ट सारखी आहे आणि ती म्हणजे आनंद.. प्रत्येकाला आनंदाने जगाचं आहे. २२ वर्षांपूर्वी माझ्या आयु्ष्यात राजोशी बरुआ आली.. पती-पत्नी म्हणून आम्ही आनंदी होतो.. पण गेल्या दोन वर्षांमध्ये आम्हाला चित्र वेगळं दिसू लागलं… आम्हाला वाटत होतं तसं भविष्य आम्हाला दिसत नव्हतं. नात्यात आलेले उतार – चढाव दूर होवू शकतात. त्यासाठी आम्ही प्रयत्न देखील केले. पण फक्त लोकांना दाखवण्यासाठी आम्ही सोबत राहिलो असतो पण खासगी आयुष्यात मात्र दुःखी असतो. ही गोष्ट आम्हाला नको होती..’
पुढे आशिष विद्यार्थी म्हणाले, ‘आम्ही सोबत राहण्याचा निर्णय घेतला पण आपले मार्ग वेगळे असतील.. असं आमचं ठरलं… बसून मार्ग काढला.. मित्र, कुटुंबासोबत आम्ही चर्चा केली.. मला एकटं राहायला आवडत नाही. मला सोबत कोणी तरी हवं आहे. वयाच्या कोणत्याही टप्प्यात एक अशी व्यक्ती भेटेल जिला मी जोडीदार बनवू शकेल… असं मला माहित होतं…’
भिनेते आशिष विद्यार्थी यांच्या दुसऱ्या लग्नाबाबत त्यांची पहिली पत्नी राजोशी यांनी प्रथमच प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
