AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वर्षभरात लोकप्रिय मालिकेनं घेतला निरोप; अभिनेत्री भावूक होत म्हणाली ‘ही गोष्ट फार मनाला लागली..’

अशोक सराफ यांची 'अशोक मा. मा' ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत आहे. या मालिकेत मुख्य भूमिका साकारलेली अभिनेत्री रसिका वखारकर हिने सोशल मीडियावर अत्यंत भावूक पोस्ट लिहिली आहे. शूटिंगच्या शेवटचा दिवसाचा अनुभव तिने सांगितला आहे.

वर्षभरात लोकप्रिय मालिकेनं घेतला निरोप; अभिनेत्री भावूक होत म्हणाली 'ही गोष्ट फार मनाला लागली..'
Ashok Saraf and Rasika WakharkarImage Credit source: Instagram
| Updated on: Jan 12, 2026 | 1:19 PM
Share

कलर्स मराठी वाहिनीवरील ‘अशोक मा. मा.’ ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. सुप्रसिद्ध लेखक आणि कलाकार चिन्मय मांडलेकर यांच्या लेखणीतून साकार झालेली ‘अशोक मा.मा.’ ही मालिका मजेदार, खुमासदार कथेमुळे चर्चेत राहिली. या मालिकेत अशोक सराफ यांच्यासह ‘कलर्स मराठी’च्या ‘पिरतीचा वनवा उरी पेटला’ या मालिकेच्या माध्यमातून घराघरांत पोहोचलेली रसिका वखारकर, नेहा शितोळे, चैत्राली गुप्ते हे कलाकारदेखील महत्त्वाच्या भूमिकेत झळकले. केदार वैद्य दिग्दर्शित या मालिकेचा प्रवास आता संपुष्टात आला आहे. यानिमित्त अभिनेत्री रसिका वखारकरने सोशल मीडियावर भावूक पोस्ट लिहिली आहे.

रसिका वखारकरची पोस्ट-

‘आणि अखेर आम्ही इथवर येऊन पोहोचलो.. आमच्या मालिकेचा शेवट. जेव्हा प्रवास संपतो तेव्हा प्रत्येक कलाकाराचं अंत:करण जड होतं, आठवणी दाटून येतात. कृतज्ञतेने भरलेला असा दिवस. पण या व्यक्तीला (अशोक सराफ) मी यापुढे दररोज भेटू शकणार नाही, ही गोष्ट मनाला फार लागली. ते फक्त सेटवर उपस्थित राहून आम्हाला सर्वांचा दिवस सकारात्मक बनवायचे. सेटवरील माझ्या शेवटच्या दिवशी मी त्यांच्या रुममध्ये आभार मानण्यासाठी गेले होते. ते जितक्या प्रेमाने, आत्मीयतेने वागायचे आणि त्यांचं फक्त निरीक्षण करून मला जे सर्वकाही शिकायला मिळालं, त्याबद्दल मला त्यांचे आभार मानायचे होते. तेव्हा मी जवळच एक कागदाचा तुकडा पाहिला आणि खऱ्या प्रशंसकाप्रमाणे त्यांचा ऑटोग्राफ मागितला. त्यांनी त्यावर ऑटोग्राफ दिला आणि स्मितहास्य केलं. तिथून निघताना ते असंकाही म्हणाले, जे माझ्यासाठी कौतुकाप्रेक्षाही अधिक आहे’, असा अनुभव तिने सांगितला.

‘त्यांनी विचारलं, ‘थांब.. तुझ्या ऑटोग्राफचं काय? तो क्षण माझ्यासोबत कायम राहील.. ते काय म्हणाले यासाठी नाही, तर ते कोण आहेत यासाठी. माझ्यासाठी अशोक सराफ हे आहेत. फक्त अप्रतिम कलाकार नाही पण त्यासोबतच सुंदर व्यक्ती, जे त्यांच्या अवतीभवती असलेल्या प्रत्येक ज्युनिअर, सीनिअरला तितक्याच आदराने आणि प्रेमाने वागवतात. काही लोक फक्त त्यांच्या कामाने नाही तर व्यक्तिमत्त्वानेही तुम्हाला प्रेरणा देतात. या अनुभवासाठी मी कायम ऋणी असेन’, अशा शब्दांत ती व्यक्त झाली.

कोस्टल रोडचं श्रेय ते राज ठाकरेंना नो स्पेस...फडणवीस काय-काय म्हणाले?
कोस्टल रोडचं श्रेय ते राज ठाकरेंना नो स्पेस...फडणवीस काय-काय म्हणाले?.
फडणवीस यांचे मुंबई लुटीच्या आरोपांना प्रत्युत्तर, आरोप फेटाळले अन्...
फडणवीस यांचे मुंबई लुटीच्या आरोपांना प्रत्युत्तर, आरोप फेटाळले अन्....
ठाकरेंनी शिंदेंना वाळीत टाकलं होतं अन्...फडणवीसांनी सगळंच सांगून टाकलं
ठाकरेंनी शिंदेंना वाळीत टाकलं होतं अन्...फडणवीसांनी सगळंच सांगून टाकलं.
लवकरच मोठा मित्र पक्षप्रवेश करणार, रवींद्र चव्हाण यांचं मोठं वक्तव्य
लवकरच मोठा मित्र पक्षप्रवेश करणार, रवींद्र चव्हाण यांचं मोठं वक्तव्य.
राज ठाकरेंच्या लाकुडतोड्या टीकेला मंत्री गिरीश महाजनांचं प्रत्युतर...
राज ठाकरेंच्या लाकुडतोड्या टीकेला मंत्री गिरीश महाजनांचं प्रत्युतर....
भाजपच्या 15 पदाधिकाऱ्यांवर कारवाई, थेट पक्षातून काढलं! अमरावतीत खळबळ
भाजपच्या 15 पदाधिकाऱ्यांवर कारवाई, थेट पक्षातून काढलं! अमरावतीत खळबळ.
कोण तो रसमलाई...भXXXव्या तुझा काय...राज ठाकरेंकडून अण्णामलाईंवर निशाणा
कोण तो रसमलाई...भXXXव्या तुझा काय...राज ठाकरेंकडून अण्णामलाईंवर निशाणा.
'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत राज ठाकरेंकडून थेट मुंबईकरांना इशारा
'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत राज ठाकरेंकडून थेट मुंबईकरांना इशारा.
....तरच नवऱ्याला जेवण द्या, पंकजा मुंडे यांचे मतदारांना अनोखे आवाहन
....तरच नवऱ्याला जेवण द्या, पंकजा मुंडे यांचे मतदारांना अनोखे आवाहन.
भाजप आमदार भिकाऱ्यांसारखे दारोदारी... प्रतिभा धानोरकरांची घसरली जीभ
भाजप आमदार भिकाऱ्यांसारखे दारोदारी... प्रतिभा धानोरकरांची घसरली जीभ.