AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘त्यापेक्षा घरी बसणं पसंत केलं..’; अशोक सराफ यांनी का घेतला होता 2 वर्षांचा ब्रेक?

'हम पांच' या लोकप्रिय मालिकेनंतर अशोक सराफ यांना अनेक ऑफर्स येत होते. तरीही त्यांनी त्यावेळी दोन वर्षांचा ब्रेक घेतला होता. यामागचं कारण त्यांनी 'मी बहुरुपी' या आत्मचरित्रात सांगितलं आहे. करिअरच्या शिखरावर असतानाही त्यांनी दोन वर्षे घरी बसणं पसंत केलं होतं.

'त्यापेक्षा घरी बसणं पसंत केलं..'; अशोक सराफ यांनी का घेतला होता 2 वर्षांचा ब्रेक?
Ashok SarafImage Credit source: Instagram
Updated on: Apr 29, 2025 | 12:34 PM
Share

अशोक सराफ हे कलाविश्वातील खूप मोठं नाव. त्यांच्या नावाला इतकं मोठं वलय प्राप्त झालंय की त्यासाठी वेगळ्या कोणत्याही ओळखीची गरज भासत नाही. अशोक सराफ यांच्या करिअरची सुरुवात, त्यांनी गाजवलेल्या भूमिका, बँकेची नोकरी आणि नट म्हणून कमावलेली प्रसिद्धी.. यांविषयी सहसा सर्वांनाच माहिती आहे. परंतु त्यांच्या करिअरमधील काही ठराविक टप्प्यांविषयी फार क्वचित लोकांना जाणीव असेल. नाटक आणि चित्रपटांनंतर अशोक सराफ यांनी टीव्हीवरील सिटकॉम ‘हम पांच’मध्ये भूमिका साकारली होती. या सिटकॉमनंतर त्यांना कामाच्या असंख्य ऑफर्स येत होत्या. पण तरीसुद्धा त्यांनी दोन वर्ष घरी बसणं पसंत केलं. त्यामागे अशोक सराफ यांचा एक वेगळा विचार होता. हा किस्सा त्यांनी ‘मी बहुरुपी’ या आत्मचरित्रात उलगडला आहे.

अनेकदा माणसांना एखाद्या व्यक्तीचं केवळ यश दिसतं. त्यामागे असलेले कठोर परिश्रम, यशापयशाचे चढउतार, क्वचित आलेली निराशा, त्यातही स्वत:च्या तत्त्वांशी ठेवलेली निष्ठा, त्यामुळे सहन करावा लागलेला त्रास फार कुणाच्या लक्षात येत नाही, असं त्यांनी या आत्मचरित्रात म्हटलंय. ‘हम पांच’ ही मालिका यशस्वी झाल्यानंतर अशोक सराफ यांना अनेक ऑफर्स येत होत्या. परंतु या ऑफर्स त्याच प्रकारच्या भूमिकांच्या होत्या. अशोकमामांना पुन्हा त्याच प्रकारचं काम करायचं नव्हतं. अखेर त्या काळात त्यांनी दोन वर्षे कोणतंही काम केलं नाही. त्यावेळी त्यांना भविष्यात काय आहे याची कल्पनाही नव्हती. तरीही हवी तशी भूमिका मिळत नाही, तोपर्यंत तडजोड म्हणून मनाविरुद्ध काहीही करण्याचं त्यांनी स्पष्टपणे नाकारलं होतं. ‘त्यापेक्षा घरी बसणं पसंत केलं’ असं त्यांनी या आत्मचरित्रात लिहिलंय.

आपल्या कामावर, अभिनयावर जिवापाड प्रेम करणाऱ्या अशोक सराफ यांनी अभिनयाच्या कुठल्या शाळेत शिक्षण घेतलेलं नव्हतं. प्रत्यक्ष काम करताच ते शिकत गेले. कधी अनुभवातून सुधारत, चुकांमधू मार्ग काढत तर कधी आपल्यापेक्षा अनुभवानं आणि वयानं मोठ्या माणसांकडून शिकत ते पुढे आले. या वाटेवर त्यांना असंख्य लोकांची मदत झाली. ही वाटचाल करताना त्यांच्या लक्षात आलं की अभिनयाचं हे क्षेत्र सोपं नाही. त्याच बराच अभ्यास करावा लागतो. या अभ्यासाच्या, परिश्रमाच्या आणि अनुभवातून मिळालेल्या शिकवणीच्या जोरावर अशोक सराफ यांनी इंडस्ट्रीत आपला ठसा उमटवला आहे.

मिरा-भाईंदरमधील मोर्चाआधीच मनसेला मोठा धक्का, तरीही....
मिरा-भाईंदरमधील मोर्चाआधीच मनसेला मोठा धक्का, तरीही.....
पहलगामचे अतिरेकी भाजपात... लाज वाटली पाहिजे.. ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल
पहलगामचे अतिरेकी भाजपात... लाज वाटली पाहिजे.. ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल.
थर्ड क्लास, मूर्ख माणूस... खैरेंनी इशारा देत पडळकरांची काढली औकात
थर्ड क्लास, मूर्ख माणूस... खैरेंनी इशारा देत पडळकरांची काढली औकात.
धक्कादायक; एकाच कुटुंबातील चौघांनी संपवलं जीवन
धक्कादायक; एकाच कुटुंबातील चौघांनी संपवलं जीवन.
संभाजीनगरात अतिक्रमण हटाव कारवाईला सुरूवात
संभाजीनगरात अतिक्रमण हटाव कारवाईला सुरूवात.
वसंत मोरेंची बांबू दाखवत भाजप खासदाराला धमकी, 'त्या' वक्तव्याचा निषेध
वसंत मोरेंची बांबू दाखवत भाजप खासदाराला धमकी, 'त्या' वक्तव्याचा निषेध.
भाजपच्या बुडाला आग लागलीय, समजू शकतो; उद्धव ठाकरेंची खोचक टीका
भाजपच्या बुडाला आग लागलीय, समजू शकतो; उद्धव ठाकरेंची खोचक टीका.
...तरच तुम्ही बाळासाहेबांचे खरे वारस, भाजप खासदारांचं ठाकरेंना चॅलेंज
...तरच तुम्ही बाळासाहेबांचे खरे वारस, भाजप खासदारांचं ठाकरेंना चॅलेंज.
संभाजीनगरच्या विट्स हॉटेलच्या मुद्यावरून विधान परिषदेत गदारोळ
संभाजीनगरच्या विट्स हॉटेलच्या मुद्यावरून विधान परिषदेत गदारोळ.
Marathi Issue: महाराष्ट्रात फक्त मराठीच,मीरा-भाईंदरमध्ये पुन्हा मोर्चा
Marathi Issue: महाराष्ट्रात फक्त मराठीच,मीरा-भाईंदरमध्ये पुन्हा मोर्चा.