AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अशोक सराफ यांच्या भीषण अपघाताचा तो प्रसंग; सीटसकट गाडीबाहेर फेकले गेले, गाडीचा चेंदामेंदा झालेला..

अशोक सराफ यांच्या गाडीचा खेड-शिवपूरजवळ भीषण अपघात झाला होता. या अपघातात त्यांचा ड्रायव्हर वाचू शकला नव्हता. तर अशोक सराफ हे सीटसकट गाडीच्या बाहेर फेकले गेले होते. आपल्या आत्मचरित्रात त्यांनी हा प्रसंग सविस्तर सांगितला आहे.

अशोक सराफ यांच्या भीषण अपघाताचा तो प्रसंग; सीटसकट गाडीबाहेर फेकले गेले, गाडीचा चेंदामेंदा झालेला..
अशोक सराफImage Credit source: Instagram
| Updated on: May 30, 2025 | 10:30 AM
Share

17 एप्रिल 1987.. ‘बडे घर की बहू’ या हिंदी चित्रपटाचं शूटिंग आटपून अशोक सराफ यांना ‘मामला पोरींचा’ या चित्रपटाच्या मुहूर्तासाठी कोल्हापूरला जायचं होतं. काम संपल्यानंतर रात्रीच्या दहा-साडेदहा वाजता ते गाडीत बसले. तेव्हा ते प्रचंड दमलेले होते. त्यामुळे थकव्याने कधी झोप लागली त्यांना कळलंच नाही. त्यानंतर जाग आली तेव्हा ते थेट पुण्याच्या संचेती हॉस्पिटमध्ये होते. तारीख होती 20 एप्रिल 1987. सुरुवातीला अशोक सराफ यांना काहीच नीट आठवत नव्हतं. नंतर जेव्हा एकेकाने हकिकत सांगितली, तेव्हा पूर्ण चित्र त्यांच्या डोळ्यांसमोर उभं राहिलं. यावेळी त्यांना त्यांच्या गाडीचा फोटोसुद्धा दाखवण्यात आला होता. चोळामोळा करून बाजूला फेकून दिलेला कागद कसा दिसतो, तशी ती गाडी दिसत होती. अपघाताच्या या प्रसंगाचा उल्लेख अशोक सराफ यांनी त्यांच्या ‘मी बहुरुपी’ या आत्मचरित्रात केला आहे.

खेड-शिवपूरजवळ सकाळी आठ वाजताच्या सुमारास अशोक सराफ यांच्या ॲम्बेसेडर गाडीचा अपघात झाला होता. त्यांच्या गाडीसमोर ट्रेलर एसटी जात होती. ट्रेलर एसटी म्हणजे एकाला एक अशा जोडलेल्या दोन एसटी बस. ड्रायव्हरला ते समजलं नाही. आपल्यासमोर एकच बस आहे असं वाटून तो ओव्हरटेक करायच्या प्रयत्नात अंदाज चुकला आणि त्याच वेळी समोरून एक ट्रक आला. अशोक सराफ यांची गाडी आणि ट्रक एकमेकांवर आदळले. या भीषण अपघातात अशोक सराफ यांचा ड्रायव्हर वाचू शकला नव्हता. तर खुद्द अशोक सराफ हे गाडीबाहेर फेकले गेले होते, सीटसकट. बहुधा म्हणूनच मी वाचलो असणार, असं ते सांगतात. कारण लोकांना सापडले तेव्हा गाडीच्या सीटवरच ते बेशुद्धावस्थेत होते.

अपघातानंतरही बराच वेळ अशोक सराफ उपचाराविना

या अपघातानंतर एका बंगाली माणसाने आणि त्याच्याबरोबरच्या काही जणांनी अशोक सराफ यांना उचललं आणि एसटी बसमधून ससून हॉस्पिटलला नेलं. ससून हॉस्पिटलमध्ये बराच वेळ कोणतेही उपचार न मिळता ते स्ट्रेचरवर तसेच पडून होते. तोवर अशोक सराफ यांचा अपघात झाल्याची बातमी सगळीकडे पसरली होती आणि रुग्णालयाबाहेर गर्दी जमू लागली होती. त्याचवेळी रुग्णालयात कल्पना कौशल नावाची एक मुलगी ससून हॉस्पिटलवर डॉक्युमेंटरी बनवण्यासाठी तिथे आली होती. तिला स्ट्रेचरवर अशोक सराफ दिसले आणि म्हणाली, “ये अशोक सराफ है. इन्हें ट्रिटमेंट नहीं मिल रही.” पुढे काय करावं ते न सुचल्याने तिने पूना गेस्ट हाऊसला फोन लावला.

अजय सरपोतदार यांनी वाचवले प्राण

त्या मुलीचा फोन अभिनेते सूर्यकांत यांनी घेतला आणि अशोक सराफ यांच्या अपघाताचा निरोप चारुदत्त सरपोतदारांना दिला. त्यानंतर चारुदत्त यांनी अजय सरपोतदार यांच्या घरी फोन केला. बातमी कळल्यावर अजय ताबडतोब ससूनला आले आणि त्यांनीच अशोक सराफ यांना संचेतीमध्ये हलवलं. कारण आणखी काही तास जर मी तिथेच पडून राहिलो असतो, तर माझं काही खरं नव्हतं, असं त्यांनी आत्मचरित्रात म्हटलंय. अजय नसता तर कदाचित मी तेव्हा वाचलो नसतो, असंही त्यांनी लिहिलंय. कारण अपघाताची केस म्हणून ससूनमध्ये अशोक सराफ यांना कोणी हात लावू देत नव्हते.

ससूनमध्ये पोहोचल्यानंतर पोलीस अजय यांना आत जाऊ देत नव्हते. कितीही विनंती केली तरी पोलीस ऐकेनात म्हटल्यावर त्यांनी कसलीही पर्वा न करता माझ्या जबाबदारीवर मी अशोक सराफ यांना घेऊन जातो, काय करायचंय ते करा.. असं म्हणून एका कोऱ्या कागदावर सही केली होती. पोलिसांच्या कामात अडथळा आणल्याची केस नंतर अजय पुढे कितीतरी वर्ष लढत होते.

मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली.
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात.
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?.
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?.
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र.
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा.
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला.