Dhurandhar : बलूचिस्तानचे लोक भारताला किती मानतात त्याचं हे उत्तम उदहारण, धुरंधर पाहून बलूच नेत्याला द्यावं लागलं स्पष्टीकरण
Dhurandhar : बलूचिस्तानचे लोक भारताला किती मानतात हे आतापर्यंत आपण ऐकून होतो. पण धुरंधर चित्रपट पाहिल्यानंतर तिथल्या बलूच नेत्याला स्पष्टीकरण द्यावं लागलं आहे. धुरंधर चित्रपटात बलूचिस्तानचा सुद्धा संदर्भ आहे. सध्या भारतात हा चित्रपट तुफान हिट ठरला आहे.

सध्या सगळीकडे धुरंधर चित्रपटाची चर्चा आहे. अक्षय खन्नाने रेहमान डकैत या बलूच गँगस्टरचा रंगवलेला रोल सोशल मीडियावर हिट ठरला आहे. साडेतीन तासाचा हा मोठा चित्रपट आहे. पण ही फिल्म प्रेक्षकांना खिळवून ठेवते. मल्टीस्टारर प्रकारात मोडणारा हा चित्रपट आहे. रणवीर सिंह, अक्षय खन्ना, अर्जुन रामपाल आणि संजय दत्त यांच्या मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटातवर आता थेट बलूचिस्तानातून प्रतिक्रिया आली आहे. बलूचिस्तानातील लीडर मीर यार बलोच यांना धुरंधर चित्रपट आवडलेला नाही. भारत-बलूचिस्तान संबंधांच चुकीच चित्रण दाखवल्याचा मीर यार बलोच यांचा आरोप आहे. आदित्य धरच्या धुरंधरने देशभक्त बलूच समूहांऐवजी गँगस्टर्सवर जास्त फोकस केलाय असं मीर यार बलोच यांचं म्हणणं आहे. बलूचिस्तानची स्वातंत्र्य चळवळ, बलूच संस्कृती आणि परंपरा या बलूच इतिहासावर खूप तोकडा रिसर्च केला आहे असं मीर यार बलोच यांनी सोशल मीडियावर पोस्टमध्ये म्हटलय.
1999 सालच्या कंदहार विमान हायजॅक प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर धुरंधर चित्रपटाचं कथानक सुरु होतं. त्यानंतर 2001 साली संसदेवरील हल्ला. भारतीय गुप्तचर विभागाचे प्रमुख अजय सान्याल हे पाकिस्तानातील दहशतवादी नेटवर्क मोडून काढण्यासाठी मोहीम आखतात. सोशल मीडियावर चित्रपटाची एक क्लिप पोस्ट करण्यात आलीय. त्यात अर्जून रामपाल आणि अक्षय खन्ना हे अल्लाहू अकबरच्या चित्रपटात घोषणा देताना दिसतायत. त्यावर मीर यार बलोच यांनी म्हटलय की, “बलोच हे धार्मिक दृष्टया इतके प्रेरित नसतात तसच भारताचं नुकसान करण्यासाठी त्यांनी ISI शी कधीच हातमिळवणी केलेली नाही“
ही सगळी सैतानी कामं ISI करते
“गँगस्ट बलूचिस्तानचं प्रतिनिधीत्व करत नाहीत. बलूच लोक स्वातंत्र्यासाठी लढत आहेत. त्यांनी मुंबईवरील 26/11 हल्ल्याचं कधीच सेलीब्रेशन केलेलं नाही. आम्ही स्वत: पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाने पीडित आहोत“ असं पोस्टमध्ये म्हटलय. “भारतविरोधी शक्तींना शस्त्रास्त्र विकतायत असं दाखवून धुरंधर चित्रपटाने बलूचिस्तानच्या स्वातंत्र्यसैनिकांना न्याय दिलेला नाही“ असं मीर यार बलोच यांनी म्हटलं आहे.
Dhurandar movie, disappointed Balochistan’s patriotic people.
Unfortunately the movie portrayed the BALOCHISTAN and INDIA relations in a negative way, focused more on gangsters than the patriotic Baloch masses and their cause.
* Balochistan is not represented by a gangster and… pic.twitter.com/NyOtngzp6T
— Mir Yar Baloch (@miryar_baloch) December 7, 2025
“बलूच स्वातंत्र्य सैनिकांना नेहमीच शस्त्रांची कमतरता होती. अन्यथा त्यांनी बऱ्याच आधी अतिक्रमण करणाऱ्या पाकिस्तानींना पराभूत केलं असतं“ असं पोस्टमध्ये म्हटलयं. “बलोच गँगस्टर्सकडे जर बनावट नोटा छापण्याइतके पैसे असते तर आज बलुचिस्तानात गरीबी नसती. ड्रग्स तस्करी, फेक करन्सी आणि शस्त्रास्त्र ही सगळी सैतानी काम ISI करते“ असं म्हटलं आहे.
