AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ए आर रेहमान यांच्या घटस्फोटाचं 28 वर्षीय तरुणीसोबत कनेक्शन? वकिलांकडून सत्य उघड

AR Rahman And Saira Banu Divorce: ए आर रेहमान आणि 'त्या' 28 वर्षीय तरुणीचं काय आहे कनेक्शन? दोघांच्या घटस्फोटाबद्दल वकिलांकडून मोठं सत्य समोर... सध्या सर्वत्र ए आर रेहमान यांच्या खासगी आयुष्याच्या चर्चा...

ए आर रेहमान यांच्या घटस्फोटाचं 28 वर्षीय तरुणीसोबत कनेक्शन? वकिलांकडून सत्य उघड
| Updated on: Nov 22, 2024 | 1:08 PM
Share

AR Rahman And Saira Banu Divorce: भारताचे लोकप्रिय व ऑस्कर विजेते संगीतकार ए आर रेहमान गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहेत. लग्नाच्या 29 वर्षांनंतर ए आर रेहमान आणि सायरा बानू यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. खुद्द ए आर रेहमान यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून घटस्फोटाची घोषणा केली. घटस्फोटाची पोस्ट व्हायरल झाल्यानंतर चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला… ए आर रेहमान यांच्या घटस्फोटाची बातमी ताजी असताना, त्यांच्या घटस्फोटाचं कनेक्शन 28 वर्षीय गिटारिस्ट मोहिनी हिच्यासोबत जोडलं जातं आहे. यावर वकील वंदना शाह यांनी देखील मोठं वक्तव्य केलं आहे.

सांगायचं झालं तर, ए आर रेहमान आणि गिटारिस्ट मोहिनी यांच्या घटस्फोटाची बातमी एकाच दिवशी समोर आल्यामुळे चर्चांना उधाण आलं. शिवाय नको त्या चर्चांनी देखील जोर धरला. अशात वंदना शाह यांच्या वक्तव्यानंतर संपूर्ण चित्र स्पष्ट झालं आहे.

नुकताच झालेल्या एका मुलाखतीत, वकील वंदना शहा यांनी सर्व चर्चा फेटाळल्या आहेत. शाह म्हणाल्या, ‘गिटारिस्ट मोहिनी हिचं ए आर रेहमान घटस्फोट प्रकरणाशी काहीही संबंध नाही. सायरा आणि मिस्टर रेहमान यांनी दोघांनी स्वतः घटस्फोटाचा निर्णय घेतला आहे…’ असं म्हणत वंदना शाह यांनी गिटारिस्ट मोहिनी आणि ए आर रेहमान यांच्या घटस्फोटाचा काहीही कनेक्शन नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

पुढे वंदना यांनी सायरा बानू यांच्या घटस्फोट प्रकरणी अद्याप पोटगीबद्दल काहीही बोलणं झालं नसल्याचं देखील सांगितलं आहे. वकील वंदना शाह यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘नात्यातील भावनात्मक तणावानंतर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे.’ दोघांच्या घटस्फोटानंतर चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला आहे.

ए आर रेहमान आणि सायरा बानू यांचा घटस्फोट…

ए आर रेहमान आणि सायरा बानू यांच्या लग्नाबद्दल सांगायचं झालं तर, 29 वर्षांपूर्वी दोघांनी लग्न केलं. 1995 मध्ये ए आर रेहमान आणि सायरा बानू यांचं लग्न झालं. दोघांनी घरच्यांच्या सहमतीने अरेंज मॅरेज केलं होतं. पण आयुष्यात कठीण वळण आलं आणि दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.

Follow Us
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा