AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लेट पण थेट, कान्समध्ये ऐश्वर्याच्या त्या कृतीने वेधलं सर्वांचं लक्ष, सौंदर्याने लावलं सर्वांना वेड

ब्युटी क्वीन म्हणून ओळख असणारी बॉलिलूडची सौंदर्य क्वीन ऐश्वर्या राय हिचा कान्समधील लूक सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

लेट पण थेट, कान्समध्ये ऐश्वर्याच्या त्या कृतीने वेधलं सर्वांचं लक्ष, सौंदर्याने लावलं सर्वांना वेड
| Updated on: May 23, 2026 | 5:49 PM
Share

फ्रान्समधील प्रतिष्ठित Cannes Film Festival 2026 मध्ये पुन्हा एकदा अभिनेत्री ऐश्वर्या राय हिने आपल्या ग्लॅमरस अंदाजाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. कान्स 2026 मधील तिचा पहिला लूक समोर येताच सोशल मीडियावर अक्षरशः खळबळ उडाली. इलेक्ट्रिक ब्लू रंगाच्या मरमेड स्टाइल गाऊनमध्ये ऐश्वर्या अत्यंत स्टायलिश आणि रॉयल दिसत होती. तिचा आत्मविश्वास, मोहक स्मितहास्य आणि रेड कार्पेटवरील तिच्या अदा पाहून चाहते पुन्हा एकदा तिच्या प्रेमात पडले आहेत.

यंदाच्या कान्समध्ये ऐश्वर्याने प्रसिद्ध डिझायनर अमित अग्रवाल यांनी डिझाइन केलेला खास स्कल्प्टेड गाऊन परिधान केला होता. या गाऊनवर बारीक सिक्वेन्स आणि आकर्षक डिझाइनिंगचे काम करण्यात आले होते. त्यामुळे तिचा संपूर्ण लूक अधिकच एलिगंट आणि इंटरनॅशनल फॅशनला साजेसा दिसत होता. गाऊनसोबत तिने मॅचिंग दुपट्टाही कॅरी केला होता, ज्यामुळे तिच्या लूकला भारतीय टच मिळाला.

चाहत्यांना दिलं फ्लाइंग किस

ऐश्वर्याच्या मेकअपनेही सर्वांचे लक्ष वेधले. ग्लोइंग स्किन, साइड पार्टेड कर्ली हेअर्स, डायमंड नेकपीस आणि सुंदर इअररिंग्समुळे तिचा लूक अधिक उठून दिसत होता. रेड कार्पेटवर चालताना गाऊन थोडा जड असल्याचे जाणवत होते. काही क्षण तिला चालताना अडचण होत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसले, मात्र तिने आपल्या आत्मविश्वासाने आणि स्टाइलने संपूर्ण परिस्थिती सहज हाताळली.

रेड कार्पेटवर ऐश्वर्या राय बच्चनने कॅमेऱ्यासमोर विविध पोझ दिल्या. चाहत्यांना फ्लाइंग किस देत तिने हार्ट इमोजीही बनवला. तिचा हा खुशमिजाज अंदाज पाहून उपस्थित लोकांमध्येही मोठा उत्साह दिसून आला. सोशल मीडियावर तिचे फोटो आणि व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून चाहते तिच्या सौंदर्याचे भरभरून कौतुक करत आहेत.

View this post on Instagram

A post shared by aishu (@aishdivaa)

माय लेकीच्या लुकची होतेय चर्चा

अनेकांनी ऐश्वर्याचा हा आतापर्यंतचा सर्वात सुंदर कान्स लूक असल्याचे म्हटले आहे. काही चाहत्यांनी ऐश्वर्या आजही इतर अभिनेत्रींपेक्षा वेगळी दिसते अशी प्रतिक्रिया दिली तर अनेकांनी तिच्या फिटनेसचेही कौतुक केले. मागील काही वर्षांच्या तुलनेत ती अधिक स्लिम आणि फ्रेश दिसत असल्याचे चाहते म्हणत आहेत.

यंदाही ऐश्वर्या आपल्या मुलीसोबत कान्समध्ये पोहोचली. मायलेकींच्या फोटोंना सोशल मीडियावर मोठी पसंती मिळत आहे. चाहत्यांना दोघींमधील सुंदर बॉन्डिंग खूप आवडते. व्यस्त शेड्यूल असूनही ऐश्वर्या मुलीसोबत वेळ घालवण्याला प्राधान्य देते, त्यामुळे तिचे केवळ अभिनेत्री म्हणूनच नाही तर एक प्रेमळ आई म्हणूनही कौतुक केले जात आहे.

Follow Us
अंधेरीत भरधाव BEST बसच्या अपघाताचा थरार, अनेक वाहनांना उडवलं
Andheri Accident | अंधेरीत भरधाव BEST बसच्या अपघाताचा थरार, अनेक वाहनांना उडवलं, रिक्षांचा चुराडा
अजित पवार विमान दुर्घटना : CBI चौकशीवर फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
Devendra Fadnavis on Ajit Pawar Accident | अजित पवार विमान दुर्घटना : CBI चौकशीवर CM फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
कर्जमाफीने शेतकरी श्रीमंत होत नाही, पण... फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Devendra Fadnavis | कर्जमाफीने शेतकरी श्रीमंत होत नाही, पण... मुख्यमंत्री फडणवीस नेमकं काय म्हणाले?
किती पोटदुखी... किती जळजळ... शरद पवार भेटीवरून शिंदेंचा ठाकरे गटावर...
किती पोटदुखी... किती जळजळ... शरद पवार भेटीवरून उपमुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल
रमेश म्हात्रेंना मोठा झटका! कोर्टाने सुनावली पोलीस कोठडी; पक्षातूनही..
Ramesh Mhatre | डॉक्टर मारहाण प्रकरणात रमेश म्हात्रेंना मोठा झटका! कोर्टाने सुनावली पोलीस कोठडी; पक्षातूनही कारवाईचे संकेत?
सावरकरांना भारतरत्न देण्यावरून मुनगंटीवार संतापले, सरकारला घरचा आहेर
Sudhir Mungantiwar | सत्ता आली की वचन विसरलात?; सावरकरांना भारतरत्न देण्यावरून मुनगंटीवार संतापले, सरकारला घरचा आहेर
खाजेची पावडर टाकून वारकऱ्यांचे मोबाईल, पैसे लंपास; वारकऱ्याला अश्रू...
Pandharpur Wari Chori News | पालखी सोहळ्यात चोरट्यांचा सुळसुळाट! खाजेची पावडर टाकून वारकऱ्यांचे मोबाईल, पैसे लंपास; वारकऱ्याला अश्रू अनावर
सौरव सोनवणेला अटक करा, MCOCA लावा... म्हणत जनसागर रस्त्यावर
Beed kej Morcha | विलास घुले हत्या प्रकरण पेटलं! सौरव सोनवणेला अटक करा, MCOCA लावा... म्हणत जनसागर रस्त्यावर
5 कोटींचं आमिष अन् पक्षांतराची चर्चा! नाशिकच्या राजकारणात काय घडतंय?
5 कोटींचं आमिष अन् पक्षांतराची चर्चा! नाशिकच्या राजकारणात मोठं काय घडतंय? चर्चांना वेग
नगरसेवक कुठेही जाणार नाही, जे जातील... ठाकरे गटाची मोठी पोलखोल
Nashik Thackeray Nagarsevak | नगरसेवक कुठेही जाणार नाही, जे जातील त्यांना... ठाकरे गटाची पत्रकार परिषदेत मोठी पोलखोल