Film Mahotsav : पहिल्या ‘प्रबोधन आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवा’त ‘खिसा’ सर्वोत्कृष्ट! ‘साईड मिरर’, ‘लगाम’ यांचाही गौरव!

राज्याचे उद्योग आणि मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली प्रबोधन गोरेगावच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्ताने पहिला प्रबोधन आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सव आयोजित करण्यात आला होता. प्रभादेवी येथी ल पु.ल. देशपांडे कला अकादमी, रवींद्र नाट्यमंदिर येथे शुक्रवारी पुरस्कार वितरण सोहळा पार पडला.

Film Mahotsav : पहिल्या ‘प्रबोधन आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवा’त ‘खिसा’ सर्वोत्कृष्ट! ‘साईड मिरर’, ‘लगाम’ यांचाही गौरव!
पहिल्या ‘प्रबोधन आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवा’त ‘खिसा’ सर्वोत्कृष्ट!

मुंबई : ‘प्रबोधन गोरेगाव’ संस्थेतर्फे आयोजित ‘प्रबोधन आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवात’ ‘खिसा’ या लघुपटाने सर्वेत्कृष्ट लघुपटाचा मान मिळवला आहे. याच लघुपटासाठी राज मोरे सर्वेत्कृष्ट दिग्दर्शक तर वेदांत क्षीरसागर सर्वोत्कृष्ट बालकलाकार ठरला आहे. मदन काळे दिग्दर्शित ‘लगाम’ या लघुपटाला दुसऱ्या क्रमांकाचे तर विराज झुंजारराव दिग्दर्शित ‘साईड मिरर’ला तिसऱ्या क्रमांकाचे बक्षीस मिळाले आहे. या सोहळ्याला प्रमुख पाहुणे अभिनेते संदीप कुलकर्णी, प्रबोधन गोरेगावचे संस्थापक व महाराष्ट्राचे उद्योग व मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई, अशोक राणे, दिग्दर्शक निखील महाजन, प्रबोधन गोरेगावचे अध्यक्ष नितिन शिंदे आदी उपस्थित होते.

प्रबोधन गोरेगावच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्ताने प्रबोधन आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवाचे आयोजन

राज्याचे उद्योग आणि मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली प्रबोधन गोरेगावच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्ताने पहिला प्रबोधन आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सव आयोजित करण्यात आला होता. प्रभादेवी येथी ल पु.ल. देशपांडे कला अकादमी, रवींद्र नाट्यमंदिर येथे शुक्रवारी पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि प्रसिध्द अभिनेते संदीप कुलकर्णी यांच्या हस्ते विजेत्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी प्रवीण खाडे दिग्दर्शित ‘ताजमहाल’ हा सामाजिक महाराष्ट्र या विषयावरील सर्वेत्कृष्ट लघुपट ठरला. तर ‘वन्स ही डिड अटीनएज पेंटिंग’ या लघुपटासाठी दीक्षा सोनावणे सर्वेत्कृष्ट अभिनेत्री ठरली. या महोत्सवात 77 मराठी लघुपटांच्या प्रवेशिका आल्या होत्या. त्यामधून 15 लघुपटांची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली होती. यातून सर्वोत्कृष्ट लघुपटाची निवड करण्यात आली आहे. यावेळी इफ्फी महोत्सवात जागतिक स्पर्धा विभागात पुरस्कार पटकावणाऱ्या ‘गोदावरी’ चित्रपटाचे दिग्दर्शक निखिल महाजन यांचा विशेष गौरव करण्यात आला.

जागतिक आंतरराष्ट्रीय महोत्सवांसाठी पाच लघुपटांची निवड

या फेस्टिवलची रचना अत्यंत वेगळी आणि अभ्यासपूर्ण केली असून आपल्या मराठी कलावंतांनी निर्माण केलेल्या कलाकृती जगभरात नावाजल्या जाव्यात या उद्देशाने ‘कान्स’, ‘ओबरहौसेन’(जर्मनी), कार्लोवी वेरी(झेक रिपब्लिक) या तीन सर्वोत्कृष्ट जागतिक आंतरराष्ट्रीय महोत्सवांमध्ये पाठविण्यासाठी पाच लघुपटांची निवड करण्यात आली. यासाठीचा सर्व खर्च व प्रक्रिया “प्रबोधन आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवा”च्या वतीने केला जाणार आहे. या महोत्सवाचे परीक्षण मोनालिसा मुखर्जी, मंदार कमलापूरकर, समीक्षक पत्रकार लेखक गणेश मतकरी, मनोज कदम व विजय कलमकर यांनी केले.

करोनाचे सर्व नियम पाळून मोजक्याच कलावंत तंत्रज्ञांच्या उपस्थित पहिल्या ‘प्रबोधन आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवाच्या’ अंतिम फेरीचे आयोजन पु. ल. देशपांडे कला अकादमी, प्रभादेवी, मुंबई येथे करण्यात आले होते. या प्रसंगी ’52 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात’ जागतिक स्पर्धा विभागात पुरस्कार मिळविणार्याग ‘गोदावरी’ या मराठी चित्रपटातील प्रमुख अभिनेते जितेंद्र जोशी यांचा विशेष सन्मान होणार होता. मात्र जितेंद्र जोशी करोनाग्रस्त असल्याने त्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे सर्वांशी संवाद साधला.

महोत्सवातील पुरस्कार विजेते लघुपट

‘खिसा’ सर्वोत्कृष्ट लघुपट – प्रथम पुरस्कार
रु. 75,000/-चे रोख बक्षिस, ट्रॉफी व प्रमाणपत्र
(रोख रक्कम दिग्दर्शक व निर्माते यांच्यात समान विभागून देण्यात येईल)

‘लगाम’ सर्वोत्कृष्ट लघुपट – द्वितीय पुरस्कार
रु. 50,000/-चे रोख बक्षिस, ट्रॉफी व प्रमाणपत्र
(रोख रक्कम दिग्दर्शक व निर्माते यांच्यात समान विभागून देण्यात येईल)

‘साईड मिरर’ सर्वोत्कृष्ट लघुपट – तृतीय पुरस्कार
रु. 25,000/-चे रोख बक्षिस, ट्रॉफी व प्रमाणपत्र
(रोख रक्कम दिग्दर्शक व निर्माते यांच्यात समान विभागून देण्यात येईल)

‘ताजमहाल’ सर्वोत्कृष्ट लघुपट सामाजिक लघुपट
(रु. 25,000/-चे रोख बक्षिस, ट्रॉफी व प्रमाणपत्र)
(रोख रक्कम दिग्दर्शक व निर्माते यांच्यात समान विभागून देण्यात येईल)

कान्स, ओबरहौसेन जर्मनी, कार्लोवी वेरी (झेक रिपब्लिक) या तीन सर्वोत्कृष्ट जागतिक महोत्सवांमध्ये पाठविण्यासाठी निवड झालेले लघुपट

1. अर्जुन / दिग्दर्शक: शिवराज वाईचळ
2. बटर चिकन / दिग्दर्शक: मयुरेश वेंगुर्लेकर
3. साईड मिरर / दिग्दर्शक: विराज झुंजारराव
4. लगाम / दिग्दर्शक: मदन काळे
5. ताजमहाल / दिग्दर्शक: प्रविण खाडे

वैयक्तिक पुरस्कार

सर्वोत्कृष्ट अभिनेता – हरीश बारस्कर – (ताजमहाल)
(रु. 10,000/-चे रोख बक्षिस, ट्रॉफी व प्रमाणपत्र)

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री दीक्षा सोनावणे – (वन्स ही डिड अ टीनएज पेंटिंग)
(रु. 10,000/-चे रोख बक्षिस, ट्रॉफी व प्रमाणपत्र)

सर्वोत्कृष्ट बालकलाकार – वेदांत क्षीरसागर – (खिसा)
(रु. 10,000/-चे रोख बक्षिस, ट्रॉफी व प्रमाणपत्र)

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक – राज मोरे – (खिसा)
(रु. 10,000/-चे रोख बक्षिस, ट्रॉफी व प्रमाणपत्र)

सर्वोत्कृष्ट पटकथालेखक – कैलास वाघमारे – (खिसा)
(रु. 10,000/-चे रोख बक्षिस, ट्रॉफी व प्रमाणपत्र)

सर्वोत्कृष्ट छायाचित्रकार – किरण जाधव – (लगाम)
(रु. 10,000/-चे रोख बक्षिस, ट्रॉफी व प्रमाणपत्र)

सर्वोत्कृष्ट संकलक मयुरेश वेंगुर्लेकर – (बटर चिकन)
(रु. 10,000/-चे रोख बक्षिस, ट्रॉफी व प्रमाणपत्र)

सर्वोत्कृष्ट ध्वनि – अनमोल भावे – (अर्जुन)
(रु. 10,000/-चे रोख बक्षिस, ट्रॉफी व प्रमाणपत्र) (Best Award for the short film ‘Khisa’ at the first ‘Prabodhan International Short Film Festival’)

इतर बातम्या

गाजराचा हलवा, संकेत म्हात्रेच्या आवाजाचा हिंदी डबिंगमध्ये जलवा! अल्लू अर्जूनसह कुणाकुणासाठी डबिंग?

फरहान अख्तर लग्नबेडीत अडकणार, मराठमोळी नवरी कोण? वाचा सविस्तर

Published On - 7:52 pm, Sat, 15 January 22

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI