फरहान अख्तर लग्नबेडीत अडकणार, मराठमोळी नवरी कोण? वाचा सविस्तर

अभिनेता फरहान अख्तर आणि मराठमोळी मॉडेल शिबानी दांडेकर विवाहबंधनात अडकणार असल्याचे समोर आले आहे. पण कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे त्यांनी काही मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे.

फरहान अख्तर लग्नबेडीत अडकणार, मराठमोळी नवरी कोण? वाचा सविस्तर
Farhan Akhtar

बॉलिवूडमध्ये सध्या लग्नाचा सपाटा सुरू झालाय. मागील काही दिवसात अनेक कलाकार लग्नबेडीत अडकल्याचे आपण पाहिले आहे. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री कतरिना कैफ आणि विकी कौशल लग्न बंधनात अडकले. गेले दोन तीन महिने याच लग्नाची चर्चा होती, अजूनही त्यांच्या लग्नाचे फोटो व्हारल होतात. आता त्यांच्यापाठोपाठ अभिनेता फरहान अख्तर (Farhan Akhtar) आणि मराठमोळी मॉडेल शिबानी दांडेकर (Shibani dandekar) विवाहबंधनात अडकणार असल्याचे समोर आले आहे. पण कोरोनामुळे (Corona) उद्भवलेल्या परिस्थितीमुळे त्यांनी काही मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. क्रिकेट अँकरींगमुळे चर्चेत आलेली शिबानी एक उत्तम डान्सर आणि सिंगरही आहे. तर फरान अख्तरला बॉलिवूडमधील ऑलराऊंतर अभिनेता म्हणून ओळखले जाते, फरानचे जिंदगी न मिलेगी दोबारा, भाग मिल्का भाग हे चित्रपट आजही चर्चेत आहेत.

मोजक्या लोकांच्या उपस्थितीत लग्न

जगता सध्या ओमिक्रॉन आणि कोरोनाने सर्वांना धडकी भरवली आहे. त्यामुळे सेलिब्रिटींच्या लग्नावरही कोरोना नियमांची मर्यादा आली आहे.फरहान आणि शिबानी गेल्या काही वर्षांपासून एकत्र राहत आहेत. कोरोनामुळे त्यांना लग्न आणखी पुढे ढकलायचे नाही. पिंकविलाने दिलेल्या वृत्तानुसार, फरहान आणि शिबानी 21 फेब्रुवारी रोजी मुंबईत रजिस्टर लग्न करणार आहेत. त्यानंतर काही मोजक्या लोकांसाठी ते रिसेप्शन ठेवणार असल्याचे म्हटले जात आहे. विकी कौशल आणि कतरीनाचाही विवाह सोहळा मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत पार पडला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shibani Dandekar (@shibanidandekar)

फरान आणि शिबानी तीन वर्षांपासून एकत्र

तीन वर्षांपूर्वी फरहान आणि शिबानी यांची भेट झाली होती. त्यानंतर ते दोघे रिलेशनशीपमध्ये होते. ते सतत एकमेकांसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसतात. त्या दोघांचे फोटो कायम चर्चेचा विषय ठरत होते. या दोघांचीही लोकप्रियाता प्रचंड आहे, त्यामुळे त्यांच्या लग्नाची उत्सुकता अनेकांना लागली आहे. बॉलिवूडमध्ये आणखी एक जोडपे लग्नबंधनात अडकत असल्याने बॉलिवूडला लगीनसराईचे दिवस आल्याचे बोलले जात आहे.

किरणचं दिग्दर्शन, आमिर निर्माता, घटस्फोटानंतरही ‘हम साथ साथ है’!

Kiran Mane : किरण माने यांच्या समर्थनार्थ ‘राधिका’ मैदानात, म्हणाली, ‘माझा त्यांना फुल्ल सपोर्ट!’

Urfi javed : काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये उर्फी जावेदचा हॉट अंदाज, फोटो पाहून चाहते घायळ

Published On - 6:33 pm, Sat, 15 January 22

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI