AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रणवीर सिंग धमकी प्रकरणात मोठा ट्विस्ट… कनेक्शन थेट पंजाब आणि हरियाणा पर्यंत

अभिनेता रणवीर सिंग याला आलेल्या धमकी प्रकरणात पोलिसांनी कसून चौकशी सुरु केली आहे. याप्रकरणी काही आरोपींना अटक देखील करण्यात आली आहे. एवढंच नाही तर, याप्रकरणाचं कनेक्शन थेट पंजाब आणि हरियाणा पर्यंत पोहोचलं आहे.

रणवीर सिंग धमकी प्रकरणात मोठा ट्विस्ट... कनेक्शन थेट पंजाब आणि हरियाणा पर्यंत
Ranveer Singh
| Updated on: Feb 21, 2026 | 10:09 AM
Share

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगला धमकी दिल्याबद्दल मुंबई गुन्हे शाखेने लॉरेन्स बिश्नोई टोळीचा सदस्य हरिचंद्र उर्फ ​​हॅरी बॉक्सर याच्याविरुद्ध लूक आउट सर्क्युलर (LOC) जारी केल्याची माहिती समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रणवीर सिंगच्या मॅनेजरला मिळालेल्या धमकीच्या व्हॉइस नोटची पडताळणी करण्यासाठी पोलिसांनी पंजाब आणि हरियाणा येथे एक पथक पाठवलं होतं. व्हॉइस नोट पाठवणाऱ्याने स्वतःची ओळख हॅरी बॉक्सर म्हणून करून 20 कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली होती. मुंबई पोलिसांना या धमकीच्या व्हॉइस नोटची माहिती मिळाल्यावर, पोलिसांनी एक पथक पंजाब आणि हरियाणा पाठवलं… तेथून व्हॉइस नोटमधील आवाज हॅरी बॉक्सरचा असल्याची पुष्टी केल्यानंतर, एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

रणवीर सिंगचे मॅनेजर विजय सुब्रमण्यम यांच्या तक्रारीवरून मुंबई सायबर पोलिसांनी हॅरी बॉक्सरविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. मुंबई पोलीस क्राईम ब्रांचच्या खंडणीविरोधी सेलसोबत मिळून या प्रकरणाचा तपास करत असल्याची माहिती देखील समोर येत आहे.  रणवीरच्या मॅनेजरच्या व्हॉट्सअ‍ॅपवर आलेल्या व्हॉइस नोटमधील आवाज हॅरी बॉक्सरचाच असल्याची पुष्टी झाल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. मात्र, यासंदर्भातील इतर ठोस पुरावे गोळा करण्याचं काम क्राइम ब्रांचकडून सुरू आहे.  रणवीरच्या मॅनेजरला अमेरिकन मोबाइल नंबरवरून धमकीचा व्हॉइस नोट पाठवण्यात आला होता.

सांगायचं झालं तर, गेल्या काही महिन्यांपासून बॉलिवूड सेलिब्रिटींना येणाऱ्या धमक्यांचं प्रमाण वाढताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी ‘बिग बॉस 13’ फेम अभिनेत्री हिमांशी खुरानाला खंडणीची मागणी करत धमकी देण्यात आली. हिमांशीकडेही 10 कोटी रुपये खंडणीची मागणी करण्यात आली होती.

बॉलिवूडचा प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेता रोहित शेट्टी याच्या मुंबईतील जुहू येथील घरावर देखील गोळीबार करण्यात आला होता. रोहित याच्या घरावर करण्यात आलेल्या गोळीबाराची जबाबदारी देखील लॉरेन्स बिश्नोई गँगने स्वीकारली. त्यानंतर अभिनेता सलमान खान याची बहिण अर्पिता खान हिचा पती आयुष शर्मा याला देखील धमकी देण्यात आलेली. त्यानंतर आयुष आणि त्याच्या कुटुंबियांच्या सुरक्षेत देखील मोठी वाढ करण्यात आली.

अभिनेता सलमान खान याला देखील अनेकदा जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या आहेत. एवढंच नाही तर, सलमान यांच्या मुंबईतील वांद्रे येथील घरावर देखील गोळीबार करण्यात आला. त्यानंतर सलमान खान याच्या सुरक्षेत देखील मोठी वाढ करण्यात आली.

ज्यांनी विरोध केला त्यांनी व्याख्यानाला यावे;अमोल कोल्हे स्पष्टच बोलले
ज्यांनी विरोध केला त्यांनी व्याख्यानाला यावे;अमोल कोल्हे स्पष्टच बोलले.
शेतकरी संतापला! थेट ट्रॅक्टरभर मका जिल्हाधिकारी कार्यालयात
शेतकरी संतापला! थेट ट्रॅक्टरभर मका जिल्हाधिकारी कार्यालयात.
भाजपाला मोठा धक्का! भिवंडी महापौर निवडणुकीत राजकीय उलथापालथ
भाजपाला मोठा धक्का! भिवंडी महापौर निवडणुकीत राजकीय उलथापालथ.
महाराष्ट्र ICUमध्ये, सत्ताधाऱ्यांनाही एक्सपायरी डेट; ठाकरे यांचा इशारा
महाराष्ट्र ICUमध्ये, सत्ताधाऱ्यांनाही एक्सपायरी डेट; ठाकरे यांचा इशारा.
एकनाथ शिंदे- राज ठाकरे भेटीवर, राज ठाकरे स्पष्टच बोलले...
एकनाथ शिंदे- राज ठाकरे भेटीवर, राज ठाकरे स्पष्टच बोलले....
संदीप देशपांडेंचं व्हॉट्सअप स्टेट्स अन् किशोरी पेडणेकरांचं मोठं विधान
संदीप देशपांडेंचं व्हॉट्सअप स्टेट्स अन् किशोरी पेडणेकरांचं मोठं विधान.
आधार-राशन कार्ड देणारी माणसं आपलीच; कारवाई कोण करणार?
आधार-राशन कार्ड देणारी माणसं आपलीच; कारवाई कोण करणार?.
मंत्रालयाच्या कंट्रोलरुममध्ये एसीबीचं पथक दाखल!
मंत्रालयाच्या कंट्रोलरुममध्ये एसीबीचं पथक दाखल!.
अमोल कोल्हे यांच्या शिवरायांवरील व्याख्यानावरून पुणे विद्यापीठात वाद
अमोल कोल्हे यांच्या शिवरायांवरील व्याख्यानावरून पुणे विद्यापीठात वाद.
सोलापूर मनपा सभेत स्वीकृत सदस्यनिवडीवरून भाजप आणि विरोधकांमध्ये गोंधळ
सोलापूर मनपा सभेत स्वीकृत सदस्यनिवडीवरून भाजप आणि विरोधकांमध्ये गोंधळ.